Saturday, 15 February 2025

मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...

 *मध्यरात्री १२ वाजता वाढदिवस साजरा करता त्यामुळे सावधान...*


   आजकाल सुरू झालेली एक विचित्र परंपरा म्हणजे रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आणि साजरा करणे. पण तुम्हाला माहित आहे का?


 *भारतीय धर्मग्रंथ हे चुकीचे मानतात*.. 


आज आम्ही तुम्हाला असे करणे किती *मोठे नुकसान* आहे हे सांगणार आहोत.कारण मोठा अनर्थ* घडू शकतो..


आजकाल कुणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो की, रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. रात्री बारा वाजता केक कापायचा असल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.अनेकदा असे दिसून येते की लोक त्यांचा वाढदिवस १२ वाजता म्हणजेच निशीथ काल (भूत काळ) मध्ये साजरा करतात. , निशीथ काल ही रात्रीची वेळ असते जी *सामान्यतः मध्यरात्री १२ ते पहाटे ३ च्या दरम्यान असते*. सामान्य लोक याला *मध्यरात्र* किंवा अध्यरात्र म्हणतात.


शास्त्रानुसार हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिशाच यांचा काळ आहे. या काळात ही शक्ती अत्यंत मजबूत होते.


आपण कोठेही राहतो, अशा अनेक शक्ती असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, परंतु ज्यांचा आपल्यावर अनेकदा *विपरित* परिणाम होतो.


 ज्यामुळे आपले जीवन विस्कळीत होते.आणि आपण दिशाहीन होतो. हे अनेकदा वाढदिवसाच्या पार्टीत घडते.  अशा भुताटकीच्या काळात केक कापून, दारू आणि मांस सेवन केल्याने अदृश्य शक्ती माणसाचे वय आणि भाग्य कमी करतात आणि दुर्दैव दार ठोठावते असते.


वर्षातील काही दिवस जसे की दिवाळी, ४ नवरात्री, जन्माष्टमी आणि शिवरात्री वगळता, निशीथ काल महानशीठ काल बनतो आणि शुभ परिणाम देतो, तर इतर वेळी तो हानिकारक प्रभाव देतो.


*शास्त्रानुसार रात्री केलेल्या मनोकामना प्रतिकूल परिणाम देतात.आणि धर्मग्रंथानुसार अग्नी विझवून सण साजरे करणे म्हणजे अंधाराची देवता असुराचे आवाहन करण्यासारखे मानले जाते.*


*हिंदू धर्मग्रंथांनुसार दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते आणि हा काळ ऋषीमुनींच्या तपश्चर्येचाही असतो.त्यामुळे या काळात वातावरण शुद्ध आणि नकारात्मकतेपासून मुक्त असते. अशा परिस्थितीत, शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी सूर्योदयानंतरच शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण रात्रीच्या वेळी वातावरणात रज आणि तम कणांचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्या वेळी दिलेल्या शुभेच्छा निष्फळ ठरतात. शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी हानिकारक ठरतात.*


🙏🏻 *कृपया हा लेख तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा*🙏🏻

*🌹💐सर्वांना शुभेच्छा 💐🌹*

डिजिटल जिंदगी : मुझे नींद ना आये…*

 *डिजिटल जिंदगी : मुझे नींद ना आये…*


विनय जोशी


हिप्नोस, ग्रीक पुराणकथांमधला झोपेचा देव. रात्रीची देवी निक्स आणि अंधाराचा देव एरेबस यांचा हा पुत्र. कुठलाही प्रकाश पोहोचू शकणार नाही अशा एका गुहेत हा पत्नी, विश्रांती आणि शांतीची देवी पासिथिया हिच्यासोबत राहतो. रात्र काळोखात बुडाली की हा कामगिरीवर निघतो. सगळ्यांवर झोपेचं रसायन शिंपडतो आणि गाढ झोपवतो. याचा मुलगा, स्वप्नांचा देव मॉर्फियस सगळ्यांना स्वप्नांच्या जगात अलगद नेऊन सोडतो. पासिथिया सगळ्यांवर शांतीचं पांघरुण घालते. आणि मग दुसऱ्या दिवशी सूर्य देव हेलिओसच्या स्वागताला सगळी मंडळी ताजीतवानी असतात, अशी ग्रीक दंतकथांमध्ये मान्यता आहे.


आजही हा दर रात्री आपल्याला झोपवायला येतो म्हणे… पण सूर्य मावळला तरी मोबाइल स्क्रीनचा लखलखाट आहे. यात रात्र आणि अंधार दोन्ही हरवलेत. त्यांच्या शिवाय हिप्नोस पोरका. तरी हा प्रयत्न करत राहतो. आपल्याला झोपवू पाहतो, पण स्क्रीनशी चिकटलेल्या डोळ्यांवर झोपेच्या रसायनाचे हंडे रिकामे करूनही फरक पडत नाही. झोप काही येत नाही. परिणामी याची बायका पोरंदेखील आपल्यावर रुसतात. गाढ झोपेअभावी स्वप्नं पडत नाहीत. विश्रांती अभावी शांती मिळत नाही. यात बिचारा हिप्नोस तरी काय करणार?


झोप ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाल संप्ररेकतज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले म्हणतात, ‘आपल्या शरीरातील जैविक घड्याळ आणि झोप लागणे – जाग येणे यांचे चक्र यांचा परस्पर संबंध आहे. मेंदूच्या तळाशी असणाऱ्या ‘हायपोथॅलॅमस’ भागात ‘सुप्रा – कायसमॅटिक- केंद्र’ या घड्याळाला नियंत्रित करते. या दैनिक तालबद्धतेला (Circadian rhythm) अनुसरून शरीरात विविध संप्ररके स्रावतात. मेलॅटोनिन, सिरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन ही संप्रेरके झोपेचं नियंत्रण करतात. दिवस मावळून रात्र होऊ लागताच आपल्या डोळ्यांमधल्या गँग्लियन पेशी अंधाराची नोंद घेतात. यातून रात्र झाल्याचा संदेश मेंदूला देतात. मेंदू स्लीप मोड ऑन करतो. ‘पिनिअल’ ग्रंथींमधून मेलॅटोनीन या संप्रेरकाची निर्मिती होऊ लागते. जसजशी याची पातळी वाढू लागते, तसतशी आपली कार्यक्षमता मंदावते. स्नायू शिथिल होऊ लागतात. डोळे जड पडू लागतात. शरीराचं तापमान कमी होऊ लागतं. रक्तदाब कमी होतो. मेलॅटोनीनने विशिष्ट पातळी ओलांडली की मेंदू झोपण्याचा हुकूम फर्मावतो आणि आपण झोपेच्या अधीन होतो. मध्यरात्री मेलॅटोनीनची सर्वोच्च पातळी असते. सकाळ होऊ लागताच ती कमी होऊ लागते. अधिवृक्क ग्रंथींमधून कॉर्टिसोल संप्रेरक स्रावू लागते. प्रकाश वाढू लागताच कॉर्टिसॉलची पातळी वाढते. याच्या वाढत्या पातळीबरोबरच रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू लागते. शरीराचं तापमान वाढतं आणि आपलं जैविक घड्याळ आपल्याला झोपेतून उठवतं.


कॉर्टिसॉल, हे ‘स्ट्रेस हार्मोन’ आहे. नव्या दिवसासाठी शरीराला तयार करण्यासाठी झोपेतून जागं झाल्यानंतर पहिल्या ३० ते ४५ मिनिटांत कॉर्टिसोलच्या पातळीत एकदम मोठी वाढ होते. भरपूर विश्रांती घेऊन ताजातवाना झालेला मेंदू आणि शरीर दिवसभर काम करायला सज्ज होतं. संध्याकाळ होऊन प्रकाश कमी होऊ लागतो तशी कॉर्टिसॉलची पातळी कमी होते आणि पुन्हा मेलॅटोनीन पाझरू लागतं. गेली लक्षावधी वर्षं हे चक्र असंच सुरळीत चालू होतं. निसर्गातील दिवस-रात्र, प्रकाश-अंधार यांच्या चक्रावर आपलं जैविक घड्याळ उत्तमपणे टिकटिकत होतं. आजच्या डिजिटल जिंदगीत मात्र या प्रक्रियेत मोठा अडथळा येतो आहे. एकतर संध्याकाळ होताच कृत्रिम प्रकाशाचा भडिमार होतो, त्यामुळे झोपेआधी मेलॅटोनीनची पुरेशी निर्मिती होत नाही. झोपेच्या वेळी सगळे दिवे मालवले तरी मेंदू झोपण्याचा सिग्नल देत नाही आणि मग झोप येत नाही म्हणून हाती घेतला जातो मोबाइल.


झोपण्याआधी मोबाइल वेगवेगळ्या कारणांनी हातात येतो. कधी दिवसभर फार पाहणं झालं नाही, जरा झोपण्यापूर्वी पाच मिनिटं बघूया बरं… अशी सबब, तर कधी गजर लावण्याचं निमित्त. ५ मिनिटांसाठी घेतलेल्या मोबाइलची २५ मिनिटं कधी होतात कळतच नाही. काहींना लाइक्स आणि कमेंटचा मोह इतका की झोपेतून उठून मोबाइल पाहिला जातो. काही निशाचर मंडळींसाठी तर रोजचं हे स्क्रीन जागरण ठरलेलं. नाइट शिफ्ट्स, लेट नाइट वर्क, अभ्यास, सबमिशन, उगाच लेट नाइट चॅटिंग आणि करायला अगदीच काही नाही तर आवडत्या वेब सीरिजचं बिंज वॉचिंग. कारणं अनेक आणि मग जागते रहो म्हणत उगाच रात्री जागवल्या जातात. दिवसभर काम करून दमलेल्या शरीराला विश्रांती हवी असते. ‘ढल गया दिन हो गयी शाम’ म्हणत मेंदूसुद्धा सगळी झाकपाक करून स्लीप मोड ऑन करायच्या तयारीत असतो. तेवढ्यात स्क्रीनमधून पाझरणारा निळा प्रकाश पाहून डोळ्यांतल्या गँग्लियन पेशी या प्रकाशाची जाणीव मेंदूला करून देतात. मेंदू गडबडतो आणि तातडीने मेलॅटोनीनचं उत्पादन रोखतो.


झोपण्याआधी उत्कंठावर्धक काही पाहिलं तर कॉर्टिसॉल तसंच गेमिंगमधून एड्रेनालाइन असे ‘स्ट्रेस हार्मोन’ स्रावू लागतात. हे संप्रेरक शरीराला सज्ज करण्याचं कार्य करत असते. परिणामी, स्लीप मोड ऑफ होऊन जातो. मोबाइल बघत मध्यरात्र उलटून जाते. आता काही मेलॅटोनीन फार स्रावू शकत नाही. मोबाइल बघत डोळे आपले उगाच ताणलेले, मेंदू उगाच शिणलेला. झोपावं असं ठरवलं तरी मेलॅटोनीनअभावी लवकर झोप लागत नाही. ‘पहाटे पहाटे मला झोप आली, मोबाइलची मगरमिठी सैल झाली’ म्हणत कसंबसं झोपावं तर या झोपेला गुणवत्ता नसते. गाढ झोपेत होणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया नीट होत नाहीत आणि दिवसभर मरगळ जाणवते. दिवसा फार वेळ मिळत नाही म्हणून झोपेआधी जरा रिलॅक्स व्हायला मोबाइल बघावा या सबबीखाली झोपण्याआधी १० – १५ मिनिटं मोबाइल बघितला जात असेल तरी सावध होण्याची गरज आहे. अमेरिकेतील स्लीप मेडिसिन एक्सपर्ट मिशेल ड्रेरुप यांच्या मते हल्ली झोपेची गुणवत्ता खालवायला स्क्रीनमधून पाझरणाऱ्या ब्ल्यू लाइटपेक्षा पाहिलेला कन्टेन्ट जास्त धोकादायक ठरतो आहे. १५ मिनिटांत २०-२५ रील्स पाहून आपण डोळे मिटतो, पण मेंदूला मात्र कामाला जुंपावं लागतं. आलेल्या सगळ्या माहितीचं पृथक्करण करणं हे त्याचं कार्य असल्याने पाहिलेल्या सगळ्या रील्सवर तो प्रक्रिया करत बसतो. वेगवेगळ्या कन्टेन्टमधून वेगवेगळ्या भावनांना सामोरं जाताना मेंदूला तशा प्रक्रिया कराव्या लागतात, परिणामी डोळे मिटले तरी मेंदू जागा राहतो आणि नीट झोप लागत नाही.


झोप आपली मूलभूत गरज आहे. दमलेलं शरीर आणि शिणलेलं मन झोपेच्या अधीन झाल्यावर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात. झोपेत ‘ग्रोथ हॉर्मोन’चं कार्य जोमाने सुरू होतं. झोपेच्या दरम्यान शरीरातील पेशी, ऊती आणि स्नायूंची दुरुस्ती होऊन शरीराची झीज भरून काढली जाते. सगळ्या स्नायूंना विश्रांती मिळते. हे हॉर्मोन वाढीच्या वयात हाडांची आणि स्नायूंची वाढ करण्यास मदत करते. झोपेत स्निग्ध पदार्थांचं ज्वलन होतं. शांत झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. भूक आणि तृप्तता यांचे संप्रेरक असणाऱ्या लेप्टिन आणि घर्लिन यांचे स्राव नियंत्रित करण्यास झोपेची मदत होते. त्यामुळे आपली पचन प्रक्रिया निरोगी राहते. झोपेत मेंदू दिवसभर गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करतो. अनावश्यक माहिती टाकून दिली जाते, महत्त्वाची माहिती स्मृतीत साठवली जाते.


शांत झोपेत होणाऱ्या या सगळ्या महत्त्वपूर्ण शरीरांतर्गत प्रक्रियांसाठी झोपण्याआधीचा स्क्रीन टाइम घातक सिद्ध होतो आहे. दुसऱ्या दिवशी वाटणारी मरगळ आणि डोळ्याखाली डार्क सर्कल इतक्यापुरतंच हे प्रकरण मर्यादित नाही. झोपेआधीच्या स्क्रीन टाइममुळे कमी स्रावणारं मेलॅटोनीन इतरही अनेक समस्यांना आमंत्रण देतं. पुरेशा मेलॅटोनीन अभावी रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. मेलॅटोनीनचा पचन प्रक्रियेवरदेखील प्रभाव असल्याने त्याच्या कमतरतेमुळे अॅसिडिटी, अल्सर, ‘इरिटेबल -बॉवेल -सिंड्रोम’ असे पचनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात. उप्साला युनिव्हर्सिटी स्वीडनमधील स्लीप सायन्स लॅबमधल्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार शांत झोपेअभावी रक्तातील घर्लिनची पातळी वाढते आणि लेप्टिनची पातळी कमी होते. असे दीर्घकाळ होत राहिल्यास लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. फीनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीन, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील आयव्ही चेउंग मेसन यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अभ्यासातील प्राथमिक निकालांनुसार रात्रीच्या स्क्रीन टाइमचा शरीरातील इन्शुलिन स्रावणावर देखील नकारात्मक परिणाम होतो. आणि यातून टाइप-२ मधुमेहाची शक्यता वाढते. कनेक्टिकट विद्यापीठाने २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, रात्री कृत्रिम प्रकाशाच्या जास्त संपर्कात राहिल्याने स्तनाचा कर्करोग, मधुमेह, नैराश्य यांचा धोका वाढतो, तसंच याचे आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम संभवतात.


स्क्रीन टाइममुळे निद्रानाशाचे मानसिक आणि बौद्धिक परिणामदेखील आहेत. विस्कळीत जैविक लयबद्धतेमुळे नैराश्य, चिंता, स्मृतिभ्रंश, बोधनक्रियेमध्ये अडथळे अशा मानसिक आजारांची शक्यतादेखील बळावते. डॉ. तुषार गोडबोले म्हणतात, आपल्या जैविक तालबद्धतेचा (Circadian rhythm) ताल बेताल करणाऱ्या रात्री झोपेच्या वेळेतील स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवण्याची तीव्र गरज आहे. यासाठी झोपण्याआधी कमीतकमी दीड तास तरी टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप अशा सगळ्या स्क्रीन्सपासून लांब राहण्याचा सल्ला ते देतात. रात्री आपली सगळी कामं आटोपताना हळूहळू प्रकाश मंदावत नेल्यास मेलॅटोनीन स्रावण्याची प्रक्रिया योग्य रीतीने होऊ शकते, असं ते नमूद करतात. बेडरूमला नो स्क्रीन झोन घोषित करून गजर लावणं, मेल चेक करणं अशी कामं आधीच करून बेडरूममध्ये जाण्यापूर्वी मोबाइल स्क्रीन ऑफ करणं शक्य आहे. झोपण्याआधीच्या एक-दीड तासात मंद प्रकाशात कुटुंबासोबत गप्पा मारणं, शांत गाणं ऐकणं, थोडावेळ ध्यान करणं अशा उपायातून मेंदू झोपेसाठी तयार होऊ शकतो.


झोपण्याआधीच्या दोन तासांत स्क्रीनचा वापर अटळ असेल, तर यासाठी ब्ल्यू लाइट फिल्टर्स वापरता येऊ शकतील. मोबाइलची अॅडॉप्टिव्ह ब्राइटनेस सेटिंग कार्यरत केल्यास उगाच प्रखर स्क्रीन टाळता येऊ शकते. अशा अपरिहार्य स्क्रीन टाइमनंतर लगेच न झोपता काही मिनिटं डोळे बंद करून शांत बसल्यास किंवा ध्यान केल्यास मेंदूचं स्टिम्युलेशन कमी व्हायला मदत होऊ शकते.


निद्रादेव हिप्नोसच्या कथेतील प्रतीकं झोपेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. रात्र आणि अंधार हे झोपेचे जनक. झोपण्यासाठी रात्र तर नैसर्गिकरीत्या होते, पण अंधार मात्र हल्ली जाणीवपूर्वक करावा लागतो आहे. या प्रयत्नात शहरभर उजळलेल्या दिव्यांपेक्षा हातातला इवलासा मोबाइल जास्त घातक. तो योग्यवेळी मालवला तर हिप्नॉस सहकुटुंब प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी बेड टाइम स्क्रीन टाइमविषयी जाग येणं गरजेचं ठरतं. म्हणून चैन से सोना हे तो जाग जाईये !!


viva@expressindia.com

OUT LET* NO cutlet

 *OUT LET* 


लाखो जीव घेणार्‍या क्रूर  *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !...


सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.


मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.


आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.


पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.


आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात. 


नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख *डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण?...


पाण्यात शांतपणे पोहोणारं *बदक वरुन शांत दिसत असलं* तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.


*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. 


शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.


भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र *श्री. अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला.


भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक गूरू* होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. *डॉ. शितल आमटे* (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)


*इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*


होय !!!


कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. 


इतकं महत्वाचं असते हे *waste weir...* मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे *शरीररूपी धरण फुटेल की राहील ?*

              

*मुंबई का तुंबते?* पुरेसे outlets राहिले नाहीत.


म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet*  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध... वाहून जाऊ द्या... स्ट्रेस, दुःख, उपेक्षा... पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा... हे केव्हाही सोपं नाही का?


म्हणूनच *मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा.*

*बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*


*हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा ! मुक्त व्हा !*


*काळजी घ्या....*


सोडून गेल्यावर *ᴍɪss ʏᴏᴜ* म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत *ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 

 

*समस्त मित्रांना समर्पित...*

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा

 वृत्त क्र. 700

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

 

मुंबई दि.15:  संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकासरोजगार उद्योजकता व नाविन्यतातथा मुंबई उपनगरचे  सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे,  यांच्यासह राजेंद्र बच्छाव,  मेघा गवळी तसेच मंत्रालयीन विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.


जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की

 || शुभ सकाळ || 

|| शुभ शनिवार ||


जगण्याच्या स्पर्धेत हेच शिकायचे असते की, जिंकलात तर आवरता आले पाहिजे आणि हरलात तर सावरता आले पाहिजे. कारण शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते.


बालभारती विशेष माहिती

 संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असलेतरी `बालभारतीया नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झालीकी मंडळ `बालभारतीयाच नावाने ओळखले जावू लागले. पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल.  मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतलेअनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखककलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.

पाठ्यपुस्तक  मंडळाची  रचना

              पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातातपाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठीहिंदीइंग्रजीउर्दूकन्नडसिंधीतेलुगूगुजराती या आठ भाषा आणि इतिहासभूगोलगणितविज्ञानकार्यानुभवआरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.

 विषय समित्या

              पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीततोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे. मुलांचा वयोगटत्याचं भावविश्वत्यांची आकलन क्षमतामजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.

 

बालभारती नाविन्यपूर्ण उपक्रम l एकात्मिक व द्‌विभाषिक पाठ्यपुस्तके :

 नाविन्यपूर्ण उपक्रम

l  एकात्मिक  द्विभाषिक पाठ्यपुस्तके :

राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता  ली ते  वीची मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके एकात्मिक  द्विभाषिक पद्धतीने तयार करण्यात आलीया पुस्तकामधील सर्व विषयांचा अभ्यास हा तीन भागांमध्ये विभागण्यात आलाजेणेकरून विद्यार्थ्यांनी एकच भाग शाळेत नेऊन त्याचा अभ्यास करणे अपेक्षित होतेतसेच या पुस्तकांमधील गणित  विज्ञान या विषयांच्या संज्ञा  संकल्पनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने या विषयाची पुस्तके

द्विभाषिक करण्यात आलीहा पथदर्शी प्रकल्प राज्यातील ६६ ब्लॉकमध्ये राबवण्यात आला होतात्यामध्ये सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहचवण्यात आलीकोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला याचे सर्वेक्षण करता  आल्यामुळे मागील वर्षी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आलीया काळात बहुतांशी शाळा सुरु झाल्या  नंतर बंद झाल्याया वर्षी म्हणजे शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात येऊन तो राज्यातील १०१ ब्लॉकमध्ये विस्तारित करण्यात आला.

l  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी  उर्दू माध्यमाच्या ४८८ शाळांची निवड करण्यात आलीया शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम  पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०२१-२२ मध्ये `सृजन बालभारती` या नावाने एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात तयार करण्यात आली होतीया पाठ्यपुस्तकांचे वाटप टप्प्याटप्प्याने या ४८८ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले  येत आहे


Featured post

Lakshvedhi