नाविन्यपूर्ण उपक्रम
l एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके :
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता १ ली ते ७ वीची मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके एकात्मिक व द्विभाषिक पद्धतीने तयार करण्यात आली. या पुस्तकामधील सर्व विषयांचा अभ्यास हा तीन भागांमध्ये विभागण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांनी एकच भाग शाळेत नेऊन त्याचा अभ्यास करणे अपेक्षित होते. तसेच या पुस्तकांमधील गणित व विज्ञान या विषयांच्या संज्ञा व संकल्पनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने या विषयाची पुस्तके
द्विभाषिक करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील ६६ ब्लॉकमध्ये राबवण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहचवण्यात आली. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला याचे सर्वेक्षण करता न आल्यामुळे मागील वर्षी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली. या काळात बहुतांशी शाळा सुरु झाल्या व नंतर बंद झाल्या. या वर्षी म्हणजे शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात येऊन तो राज्यातील १०१ ब्लॉकमध्ये विस्तारित करण्यात आला.
l राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ४८८ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०२१-२२ मध्ये `सृजन बालभारती` या नावाने एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात तयार करण्यात आली होती. या पाठ्यपुस्तकांचे वाटप टप्प्याटप्प्याने या ४८८ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले व येत आहे
No comments:
Post a Comment