Monday, 10 February 2025

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 भयमुक्तकॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

आत्मविश्वासानेप्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 

मुंबईदि. १०: राज्यातील दहावी-बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच  परीक्षा कॉपीमुक्तभयमुक्त वातावरणात व्हाव्यात या संकल्पनेला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीउज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्तआत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावीबारावीच्या परीक्षा कॉपीमुक्तभयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्याची संकल्पना आहे.

शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन कराअसे आवाहन करतानाच विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन त्यांची मानसिक तयारी करून घ्यावीअसेही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री

 आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून 

शांत मनाने परीक्षा द्या

बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री 

दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

 

मुंबईदि. १० - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्री श्री. भुसे म्हणतातप्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनोआपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनानेनीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाहीतर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.

शासनप्रशासनपालकशिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेतासर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

0000

बी.सी.झंवर/विसंअ/


समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय

 संस्कृतीप्रेमशांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

समाजात प्रेमशांतता व सद्भावना निर्माण करण्याचे 

ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १० : एकीकडे मनुष्य विज्ञान - तंत्रज्ञानउद्योग व व्यवसायात प्रगती करीत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक व भावनिक स्तरावर अशांत होत आहे. अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचे समाजात प्रेमभावनाशांतता व सद्भावना निर्माणाचे कार्य अतिशय प्रशंसनीय आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.   

'वैश्विक संस्कृतीप्रेमशांतता व सद्भावनाया ब्रह्मकुमारी संस्थेच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या जागतिक अभियानाचे राज्यातील उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे संपन्न झालेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कला आणि कलाकारांच्या माध्यमातून तरुण पिढीला भारताच्या संस्कृती आणि सनातन मूल्यांशी जोडणे हा सदर अभियानाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही. परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे असल्याचे सांगताना ब्रह्मकुमारीसंस्था  ध्यान व राजयोग यांच्या माध्यमातून प्रेम व शांतता या प्राचीन मूल्यांना नव्या पिढीपुढे आणण्याचे कार्य करीत  असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

आज मुक्त व्यापारामुळे जग लहान गाव झाले आहे. व्यापार वाढला आहेत्यातून ग्राहकाचा फायदा होत आहे. परंतु अनेक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. स्वतःला ओळखून इतरांसाठी कार्य करीत नाही तोवर मनुष्य जीवन अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

आज जीवन खूप गतिमान झाले आहे. अशावेळी ध्यानाच्या माध्यमातून चित्त स्थिर करता येते व सकारात्मक विचार अंगीकारता येतातअसे त्यांनी सांगितले.  

जीवनात सत्ता आणि पैसा या गोष्टी देखील महत्वाच्या आहे परंतु त्याचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. सर्वांनी एकत्रित काम करून देशाला बलशाली केले पाहिजे. देश बलशाली झाल्यानंतर प्रेम व सद्भावनेचा विचार जगाला दिल्यास त्याला लोक महत्व देतील असे राज्यपालांनी सांगितले.

कलाकारांच्या जीवनात प्रेमशांती व सद्भावना महत्वाची : पूनम ढिल्लन

चित्रपट सृष्टी ही इतरांना आनंद देण्यासाठी व मनोरंजन करण्यासाठी निर्माण झाली असली तरी देखील प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या समस्या असतात. त्यामुळे कलाकारांना आत्मिक शांतीसाठी प्रेमशांतता व सद्भावनेची विशेष गरज असल्याचे अभिनेत्री पूनम ढिल्लन यांनी यावेळी सांगितले. जीवनात इतरांशी तुलना नको कारण प्रत्येक जण अद्वितीय असतो असे त्यांनी सांगितले.

****

यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 यशासाठी मनातील भीतीवर विजय मिळवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आव्हाने ही सर्वांसमोर असतात. सकारात्मकतेने त्यावर मात करावीविद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातील भीतीवर विजय मिळवावा. सरावाने सामान्य माणूस देखील असामान्य काम करून असामान्य बनू शकतोयामुळे प्रधानमंत्री यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतःला ओळखून स्वतःमधील क्षमता वाढविण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेकेवळ परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांशी कसा सामना करावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद हा अतिशय उपयुक्त आहे. प्रधानमंत्री अतिशय संघर्षमय जीवनातून यशस्वी झाले असून त्यांनी जगात भारताची नवी ओळख तयार केली आहे. या अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनाचे ज्ञान मिळावेहा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एसएनडीटी महाविद्यालयाच्या डॉ.अदिती सावंत यांच्या कॉटन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला


 योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 

मुंबईदि. 10 : जीवनात स्वतःशी स्पर्धा ठेवून प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा, उद्दिष्टांचे लहान लहान टप्पे करुन ते पूर्ण केल्याचा क्षण साजरा करा. तसेच परीक्षांचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करात्यातून नक्की यश मिळेलअसा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी नवी दिल्ली येथे शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या मुंबईत शिवाजी पार्क येथील स्काऊट आणि गाईडच्या सभागृहात झालेल्या प्रसारण कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा हेच अंतिम ध्येय न ठेवता सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा सल्ला दिला. ते म्हणालेविद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःला ओळखून वर्तमानातील प्रत्येक क्षण उत्तम पद्धतीने जगावा. लिहिण्याच्या सवयीतून  आपले मत व्यक्त होत असते.

अपयश हे जीवनात यशस्वी होण्यासाठीचे इंधन असतेअसे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी विद्यार्थ्यांना अपयशाची भीती न बाळगता त्याला आपला गुरू बनविण्याचा सल्ला दिला. एकाग्रतेसाठी ध्यान धारणेला महत्त्व असल्याचे सांगून निसर्गसंतूलित आहारनवनवीन तंत्रज्ञाननेतृत्व करताना टीम वर्क आदी बाबींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाची काळजी घेण्याचे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना ‘एक पेड मा के नाम’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. पालकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमतात्यांच्या इच्छा ओळखावी आणि त्यांना प्रोत्साहन देऊन मदत करावीअसे आवाहन त्यांनी पालकांना केले.

मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन



 मुंबई भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल'

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज समुहाच्या नव्या ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन

 

मुंबई, दि.10 : मुंबई ही भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटलम्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ‘ताज’ ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

           ‘ताज’ ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरनमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलारमाजी मंत्री दीपक केसरकर ,इंडियन हॉटेल्सचे सीईओ  पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे, पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईची  एक नवी ओळख निर्माण करेल. टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. "ताज हे केवळ एक हॉटेल नसूनप्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे," "20 व्या शतकातील कुलाब्यातील ताजप्रमाणे, 21 व्या शतकातील हे हॉटेल नवे प्रतिक ठरेल," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आणखी नव्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज असूनही संधी हेरून या क्षेत्रातील कंपन्यांनी नव्या प्रकल्पांची उभारणी करावीअसे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

          या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिका वेगवान निर्णयात सकारात्मक असेल. अशा प्रकल्पांच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. प्रशासन ही केवळ नियामक संस्था नसूनविकासातील भागीदार आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या संपूर्ण प्रकल्पामागे टाटा समूहाचे मार्गदर्शकअध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांचे महत्त्वाचे योगदान असून रतन टाटा यांचे हे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होईल. या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहेअसा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.

नागपूरमध्येही अत्याधुनिक सुविधांसह हॉटेल उभारण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले. तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले.

घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न

 घाटकोपरमध्ये प्रथमच साई उत्सवात अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न


दि. १० फेब्रुवारी, मुंबई- घाटकोपरमधील जांभळीपाडा येथील कैलास बाल मित्र मंडळातर्फे १६ व्या साई उत्सव वर्धापन दिनाच्या औचित्याने ७ ते ९ फेब्रुवारी असा तीन दिवसीय सोहळा नुकताच पार पडला.
‘शिर्डी माझे पंढरपूर’ या संकल्पनेवर आधारीत प्रवेशद्वारावरील नयनरम्य सजावट नागरीकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. ज्यात विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले ह्या दृष्याचा सुंदर देखावा साकारण्यात आला होता. यंदाच्या उत्सवात साई सच्चरित्र पारायण, महिलांचा हळदी-कुंकू समारंभ, गजर साईनामाचा भजन कार्यक्रम, जागरण-गोंधळ, आरोग्य तपासणी शिबीर, भव्य पालखी मिरवणूक सोहळा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले.
भव्य पालखी मिरवणूकीत घाटकोपरमध्ये प्रथमच वर्षानुवर्षे पंढरीच्या वारीत जसा रिंगण सोहळा पार पडतो अगदी तसाच शेकडो वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक आणि साईभक्तांच्या उपस्थितीत अश्व रिंगणाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला ज्याची सर्वत्र चर्चा झाली.


Featured post

Lakshvedhi