Friday, 7 February 2025

विकासाला गती देण्याकरीता पुरदंर विमानतळ आवश्यक

 विकासाला गती देण्याकरीता पुरदंर विमानतळ आवश्यक

विकासाला गती देण्याकरिता पुरंदर विमानतळ आवश्यक आहे. याकरिता भूसंपादनामध्ये जाणाऱ्या जमिनीला राज्यसरकारच्यावतीने योग्य तो मोबदला देण्यात येईलयाकामी नागरिकांनी सहकार्य करावे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी रस्तेपूल बांधण्यासोबतच रिंगरोडमेट्रोपीएमपीएमपीएल सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक विकास कामे करताना अतिक्रमणे काढण्यात यावीअसेही श्री. पवार म्हणाले.

आमदार श्री. लांडगे म्हणालेपिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रणविविध लोककल्याणकारी योजना व उपक्रम राबविण्यात आलेले आहे. शहराचे नावलौकिक वाढविण्यासोबतच वैभवात भर पाडणारी इमारत उभी राहणार आहे.

००००

आगामी 50 वर्षाचा विचार करुन अद्ययावत इमारतीची उभारण्यावर भर

 आगामी 50 वर्षाचा विचार करुन अद्ययावत इमारतीची उभारण्यावर भर

-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेया कार्यक्रमाच्या माध्यमातून 730 कोटी रुपयांची विविध विकासकामे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 475 कोटी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे 180 कोटी रुपये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींची 62 कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदारआकर्षक व्हावीत याकरिता संकल्पना स्पर्धा घेण्यात येतातयामधून उत्तम आराखड्याची निवड करण्यात येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासोबतच त्या इमारतीत नागरिकांना समाधान वाटले पाहिजेयादृष्टीने आगामी 50 वर्षाचा विचार करुन अद्ययावतइको फ्रेंडली इमारतीचे कामे करण्यात येत आहे.

शहरात विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु

पुणे शहरात 87 कोटी रुपये खर्च करुन सारथीची इमारत पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षणकृषीनोंदणीकामगारसहकार आणि पणन भवनजमाबंदी आयुक्तालयपुणे शहर पोलीस आयुक्तालयसामाजिक आयुक्तालयसारथी प्रादेशिक कार्यालययेरवडा येथे न्यायालयमनोरुग्णालयनवीन मध्यवर्ती इमारतबालेवाडी येथे ऑलम्पिक भवन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारतन्यायालयआदी इमारतीचे काम करण्यात येत  आहे. इमारतीचे कामे करताना  जागेचा पुरेपूर वापर करुन वाहनतळस्वच्छ सूर्यप्रकाशसौर ऊर्जा आदी सुविधा विचारात घेऊन दर्जेदारटिकाऊहरित इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढ होत आहेतनागरिकांना पायाभूत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेतयादृष्टीने काम करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विविध लोकाभिमुख प्रकल्पावर भर

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने विविध लोकाभिमुख प्रकल्पावर भर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने मध्यवर्ती अग्निशामक केंद्र आणि अग्निशामक प्रबोधिनी इमारतीचे काम हाती घेतले आहेआगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शहराच्या हद्दीत याकरीता आरक्षित जागेचा पुरेपूर वापर केला पाहिजे. कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन अनधिकृत जाहिरात फलकावर नियंत्रण ठेवण्याकरिता एक चांगली यंत्रणा तयार केली आहेनागरिकांनी अधिकृत जागेवरच जाहिरात फलके लावली पाहिजे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात विविध चांगले प्रकल्प हाती घेतले असून नागरिकांना याचा लाभ होणार आहे. प्रशासनात लोकाभिमुखतापारदर्शकता आणून नागरिकांना उत्तरदायी प्रशासन सिटी हब फॉर डेटा अँड कम्युनिकेशन (सीएचडीसी) च्या माध्यमातून निर्माण होण्यास मदत होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे असलेल्या जागेबाबत महानगरपालिकेसोबत बैठक घेवून जागेबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्या जागेवर आधुनिक शहराला पूरक अशा बाबी करण्यात येईल.

पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार

पुरंदर विमानतळ हे पुण्याचा विकासाला चार पटीने पुढे नेणार आहे. येथे केवळ विमानतळ नसून लॉजिस्टिक पार्क तयार करण्यात येईल. पुण्याच्या औद्योगिकरणासाठी 'इको सिस्टीमतयार होईलतरुणांना रोजगार मिळेल. नवीन विमानतळामुळे पुणे शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ख्याती मिळेल.  विमानतळासाठी भूसंपादन करताना कोणाचेही नुकसान होणार नाही. याकरिता चांगले ठरवून दर देण्यात येतीलअसेही श्री. फडणवीस म्हणाले.

मोटार वाहन विभाग, महाराष्ट्रसर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे

 मोटार  वाहन विभाग, महाराष्ट्र (https://transport.maharashtra.gov.in) यांनी दि. ०४ डिसेंबर २०२४ रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या/नव्या सर्वच वाहनांना HSRP (High Security Registration Plate) बंधनकारक केली आहे. ३१ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. मात्र इतका महत्वाचा निर्णय असूनही सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात केली जात नाही. मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीस हा निर्णय जनसामान्यांना पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाहीत.

मुदत संपल्यावर मात्र म्हणजे १ एप्रिल २०२५ पासून हेच इ-चलान मशीन घेऊन फौज रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड चलान मारतील! त्यांना HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP बसवून घ्या आणि ही माहिती आपले मित्र, नातेवाईक, ओळखीचे यांच्यापर्यंत पोहोचवा.

शासन आदेश पाहण्यासाठी:- https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/HSRP-SOP-13122024.pdf

HSRP बुक करण्यासाठी भेट द्या :- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html

अधिक माहितीसाठी video :

https://www.youtube.com/watch?v=mna7XdZCoQc

https://www.youtube.com/watch?v=M5J5OC_owr4

https://www.youtube.com/watch?v=N5H5fFUCigs

महाराष्ट्र शासनाचे ११ ,१२,१३,१४वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी२०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वृत्त क्र.527

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी२०३७ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वृत्त क्र.526

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी२०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

वृत्त क्र.525

महाराष्ट्र शासनाचे १४ वर्षे मुदतीचे

,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबईदि. ६ : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

११ फेब्रुवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस् ११ फेब्रुवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान १२ फेब्रुवारी२०२५ रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १४ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ५ फेब्रुवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ५ फेब्रुवारी२०३९ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक ऑगस्ट ०५ आणि फेब्रुवारी ०५ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

००००

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

 शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

• महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शिव पाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा

• ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार

• पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार

• मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

मुंबईदि. ६ : राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेतअसे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसेनोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

• *नागपूर पॅटर्न राबवणार*

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेनागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईलयाची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

• *मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार*

पाणंद रस्तेशेतरस्तेसार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून श्री. बावनकुळे म्हणालेअशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करुन नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

वृ

बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक

 निवड मंडळाच्या यादीनुसार समुपदेशनाद्वारे तत्काळ भरती प्रक्रिया राबवावी;

बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 6 : निवड मंडळाच्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी. तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक असल्याने या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

  आरोग्य सेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायकराज्य आरोग्य विमा आयुक्त अस्तिकुमार पांडेआरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवालेआरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवाडडॉ. बाविस्करमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आव्हाडउपसचिव श्री. दिपक केंद्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य  मंत्री श्री. आबिटकर म्हणालेरिक्त पदभरती सोबतच येत्या 15 दिवसांत सर्व पदोन्नतीची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात यावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-अ वैद्यकीय अधिकारी यांची पदे यापूर्वी एमपीएससी कक्षातून वगळण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर राज्य आरोग्य विमा विभागामधील वैद्यकीय अधिकारी यांची पदे देखील एमपीएससी कक्षातून वगळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी दिल्या.

बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंधपत्रीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात यासाठी एक वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिल्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र हे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करावी.

ग्रामीण पातळीवर मागणीनुसार औषध पुरवठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी इतर राज्यात कशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचा अभ्यास करावा. तसेच यासाठी मध्यवर्ती प्रकल्प ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देशही आरोग्यमंत्री श्री.अबिटकर यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi