आगामी 50 वर्षाचा विचार करुन अद्ययावत इमारतीची उभारण्यावर भर
-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, या कार्यक्रमाच्या माध्यमातून 730 कोटी रुपयांची विविध विकासकामे होणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 475 कोटी आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे 180 कोटी रुपये आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींची 62 कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार, आकर्षक व्हावीत याकरिता संकल्पना स्पर्धा घेण्यात येतात, यामधून उत्तम आराखड्याची निवड करण्यात येते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासोबतच त्या इमारतीत नागरिकांना समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने आगामी 50 वर्षाचा विचार करुन अद्ययावत, इको फ्रेंडली इमारतीचे कामे करण्यात येत आहे.
शहरात विविध शासकीय इमारतीचे बांधकाम सुरु
पुणे शहरात 87 कोटी रुपये खर्च करुन सारथीची इमारत पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, नोंदणी, कामगार, सहकार आणि पणन भवन, जमाबंदी आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, सामाजिक आयुक्तालय, सारथी प्रादेशिक कार्यालय, येरवडा येथे न्यायालय, मनोरुग्णालय, नवीन मध्यवर्ती इमारत, बालेवाडी येथे ऑलम्पिक भवन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इमारत, न्यायालय, आदी इमारतीचे काम करण्यात येत आहे. इमारतीचे कामे करताना जागेचा पुरेपूर वापर करुन वाहनतळ, स्वच्छ सूर्यप्रकाश, सौर ऊर्जा आदी सुविधा विचारात घेऊन दर्जेदार, टिकाऊ, हरित इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्या वाढ होत आहेत, नागरिकांना पायाभूत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने काम करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment