Thursday, 6 February 2025

मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.

 मोदीसाहेब आणि त्यांचा खडतर प्रवास 🌹💕.


बडोद्यात, आमच्याकडे धनंजय बेहरे नावाचे पौरोहित्य करणारे कोकणस्थ ब्राह्मण होते ते सत्यनारायणाची पूजा, गणेशोत्सव पूजा किंवा उदक शांती वगैरे करायला अनेक वर्षां पासून येतात. त्यांचे वडील, या क्षेत्रात एक नावाजलेली व्यक्ती आहेत आणि त्या शिवाय ते संघांचे खूप जुने आणि सन्माननीय कार्यकर्ता आहेत. मोदीजी त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घ्यायला नेहमीच त्यांच्याकडे येत असत. बेहेरे गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आज मी इथे share करीत आहे.....



साधारण 35 वर्षांपूर्वी, नरेंद्र मोदी गुजरातमध्ये संघाचे एक साधे कार्यकर्ता होते. संघांचे ऑफिस झाडणे, पुसणे, स्वच्छ ठेवणे, पाणी भरून ठेवणे असली कामे करत आणि संघांचे लोकल काम करत. त्यांच्याकडे एक कपड्याची झोळी आणि जुनी सायकल होती. तेवढाच त्यांचा संसार होता.


एकदा रात्री 10.30 वाजता, बडोद्याला आमच्या गुरुजींच्या घरी ते आले. तेव्हा गुरुजी आणि त्यांचे वृद्ध वडीलच तेवढे घरात होते. त्यांची आई बाहेरगावी गेली होती. आल्याबरोबर मोदीजींनी आधी गुरुजींच्या वडिलांना वाकून नमस्कार केला. ते थकलेले दिसत होते, म्हणून त्यांना जेवले आहात का? असं विचारले, तर ते नाही म्हणाले. मग बेहेरे गुरुजी स्वयंपाकघरात गेले. तर फक्त्त 5/6 इडल्या होत्या. सांभार किंवा चटणी देखील नव्हती. म्हणून त्यांनी त्या इडल्या दह्यात कुस्करून त्यात पिठीसाखर घालून एका वाडग्यात घालून मोदीजींना खायला दिल्या. मोदीजींनी त्या संपवून टाकल्या. त्यांना प्रचंड भूक लागली असावी. बोलता बोलता मोदीजी म्हणाले, *गोधऱ्याला एक कार्यक्रम होता, तो आटोपून, ९० किमी सायकलवर ते बडोद्याला आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना डभोईला जायचे होते, की जे 50 किमी दूर होते*. त्यांनी बेहेरे गुरुजीं सोबत बराच वेळ गप्पा केल्या. रात्री 12.30 ला झोपले. आणि पहाटे लवकर उठून आंघोळ आटोपून ते सायकल मारत डभोईला निघून गेले.

त्यांच्याकडे फक्त्त एक टॉवेल, आणि एक जोडी कपडे असे. बाकी काही नाही. जेवण असेच कोणी दिलं तर, नाहीतर उपाशी देखील झोपत. हे असं आयुष्य त्यांनी अनेक वर्षे घालवले, असं गुरुजी म्हणाले. 


गरिबी काय असते, हाल अपेष्टा काय असतात, मेहनत काय असते आणि ती कशी करायची, ती या कर्मयोग्याने अनुभवलेली आहे.


देशभक्त आणि संघाचे संस्कार असलेला, घाम गाळत आणि मेहनत करीत, धगधगत्या मुशीतून निघालेला, एक देशभक्त नेता आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाले आहेत, हे आपल्या देशा च भाग्य🙏🏻


. मोदीजी, योगीजी आपल्या कुटुंबाचा त्याग करून, फक्त्त आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सतत रक्त आटवत आहेत, याची आपण कायम आठवण ठेवली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे एवढीच विनंती.

🙏🏻🌹💕🤗🙏🏻🌹💕🤗

आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान'

 आदिवासी विकास मंत्र्यांच्या संकल्पनेतून

संवाद चिमुकल्यांशी अभियान'

आश्रमशाळेत आदिवासी विकास मंत्र्यांसह

अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम

मुंबईदि.  : आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक महत्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणीत्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात करण्यात येणार आहे. दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

मंत्री अशोक उईके म्हणाले कीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सुधारणा आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. राज्यभरात एकूण 497 शासकीय आदिवासी आश्रमशाळा कार्यरत आहेतजिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जातेपरंतु शाळांतील सोयीसुविधांबाबत अनेकदा तक्रारी येत असतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्यासाठीशाळेतील अधिकारीशिक्षक व कर्मचारी यांच्यातील संवाद आवश्यक आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शालेय जीवनातील विविध अडचणी जाणून घेतील. या अंतर्गत शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहात अधिकारी व कर्मचारी मुक्कामी राहून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील. मुलींच्या आश्रमशाळेसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.

या पाहणीत शाळेतील विविध सोयीसुविधांची तपासणी केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीशिक्षकांची माहितीअन्नधान्याचा दर्जास्वयंपाकाची व्यवस्थापिण्याचे पाणीशौचालयांची स्वच्छतामुलींसाठी स्वतंत्र स्नानगृह व शौचालयांची व्यवस्थाआणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सुनिश्चितता यावर विशेष लक्ष दिले जाईल.

शाळेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासली जाईलविशेषतः आर.ओ. फिल्टरची स्थितीगरम पाणी आणि पाणी साठवणुकीची पद्धत यावर देखरेख केली जाईल. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची देखील तपासणी केली जाईलजसे की अन्नधान्याचा दर्जास्वच्छतेची पद्धत आणि जेवणाच्या गुणवत्तेची खात्री केली जाईल.

याशिवायशाळेतील इतर सुविधा जसे विद्यार्थ्यांना देण्यात येणारी गादीबेडशीटउशी आणि शाळेतील लाईटपंखेखिडक्याविद्युत फिटींग्ससीसीटीव्ही कॅमेरेअग्निशमन यंत्रे इत्यादी यांची पाहणी केली जाईल.

तसेचमुलींच्या वसतीगृहात असुरक्षिततेविषयी कोणत्याही तक्रारी तर नाहीतयाची काळजी घेतली जाईल. याशिवायमुलींच्या वसतीगृहात सॅनॅटरी नॅपकीन वेंडिंग मशीनधोक्याची सूचना देणारी प्रणाली कार्यान्वित आहे कायाची देखील तपासणी केली जाईल.

             अभियानाच्या दरम्यान अधिकाऱ्यांना काही मुद्द्यांवर स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यायचा असेल. हे अभिप्राय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ताटेट्रा पॅक दूधनिवास व्यवस्थापिण्याच्या पाण्याची उपलब्धतावसतीगृह सुविधांची स्थितीविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची स्थितीशिक्षकांचे अध्यापन कार्य आणि अभ्यासक्रम यावर आधारित असतील.

अशा उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य शालेय वातावरण आणि सुविधांचा लाभ मिळेल. शाळेतील अडचणी आणि तक्रारी वेळेवर सोडवून त्यांचा शालेय अनुभव सुधारला जाईल. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यामुळे त्यांच्या भावना आणि अडचणी अधिक प्रभावीपणे समजून घेतल्या जातील. हे अभियान आदिवासी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याशिवायया प्रकारच्या निरीक्षणामुळे शासनाला अधिक स्पष्ट माहिती मिळेलज्यामुळे आगामी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल.

000

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी

१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. ६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारसंत रविदास पुरस्कारशाहूफुलेआंबेडकर पारितोषिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.

            इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचेकडे दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तसमाजकल्याण या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे

 अंगणवाडी भरती प्रक्रियेत 

कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे

मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

 

मुंबईदि. 6 : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारीसंरक्षण अधिकारीअधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असूनकोणत्याही आमिषाला बळी पडू नयेअसे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दीष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील  रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असूनउमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!

 लसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !!!


                     गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे कि खारट रस नैसर्गिकरित्या असणारा एकमेव कंद आहे ... संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा ... 

 

  लसणाचे उपयोग : १. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

 २. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

 ३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

 ४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

 ५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

 ६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफअसूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

 ७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे , अजीर्ण, पोटात वेदना , जंत , अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

 ८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

 ९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

 १०. लसूण घालून उकळलेले दुध दिल्यास जुनाट खोकला , दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

 ११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

 १२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

 १३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

 १४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ....

 काळजी :

 लसूण तीक्ष्ण , उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती . गर्भिणी यांना तो वर्ज्य आहे .....

 जास्त लसूण खाल्ल्याने त्रास झाला तर माठातील थंडगार पाण्यात धने पावडर भिजवून ते पाणी गाळून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने पाजावे ...


आयुर्वेद अभ्यासक...  सुनिता सहस्रबुद्धे

निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार 

 ..

मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

 मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

जेव्हा 53 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणूतेव्हा जायकवाडीत इतके पाणी असेल की ते सहज वितरित करता येईल. त्यामुळे मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. माणदेशातील दुष्काळ संपवला आहेघरात पाणी पोहोचले आहे तेच चित्र मराठवाड्यामध्ये निर्माण करायचे आहेत्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणेआपणही एकत्र राहून विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन करतानाच बीडचा इतिहास समृद्ध आहे आणि आपल्याला तो पुढे न्यायचा आहेत्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठवाडा व अहिल्यानगरच्या भागाची स्थिती लक्षात घेऊन या भागात सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केले. बीड जिल्ह्यात सर्व प्रकारच्या विकासकामांवर लक्ष देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

२००७ पासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना केलेली मदत व आता मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविक केले.  प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांग़ितले.

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा - पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे एल अँड टी कंपनीला निर्देश

 नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा

पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे एल अँड टी कंपनीला निर्देश

• शासनाकडे हस्तांतरण करा

देखभालदुरुस्तीसाठी १० कोटी

 

मुंबईता. 5 : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेतअसे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

            नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंद असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी

एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावीअसेही आदेश महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी  दिले.

गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरीखूनदरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असूनत्यामुळे बंद असलेले कॅमेरे 15 दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेतअसे स्पष्ट निर्देश श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेचहे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलारमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव  पराग जैन नैनुटियानागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित 

Featured post

Lakshvedhi