Wednesday, 5 February 2025

महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा

 महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा

- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि.4 : महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने विविध उत्पादनाला व शेतकऱ्यांच्या कृषी मालाला विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करून त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. ड्रोनव्दारे औषध फवारणीसाठी प्रत्येक गावात ड्रोनची उपलब्धता करणेशेतीमाल विक्रीसाठी निर्यात माल केंद्र उभारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करावी असे निर्देश कृषीमंत्री  ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

            मंत्रालयात महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीमहाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले,कृषी विभागाचे संचालक सुनिल बोरकर यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

            कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की,महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतक-यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी. खतेकिटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना त्यांचा दर बाजारातील दरापेक्षा अधिक नसावा. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाच्या उत्पादित उत्पादनांसाठी ई कॉमर्स विभागाचे मार्केटींग करावे. ड्रोनव्दारे शेतीमध्ये औषध फवारणी करताना अत्यल्पअल्प व जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल असे पहावे. ड्रोन प्रत्येक गावात उपलब्ध होण्यासाठी विविध सामाजिक उत्तरदायित्व मध्ये सहभागी संस्थाराज्य शासनकेंद्र शासन यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही करावी. रायगड जिल्ह्यात रसायनी (ता.पनवेल) येथे कृषी निर्यात क्षेत्र उभारणी साठीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

**

रागडमधील विकासकामांचा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 रागडमधील विकासकामांचा 

मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा

 

मुंबई दि. ४ : आदगाव समुद्रकिनारी पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण करण्याबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर नाममात्र दरात ग्रामपंचायतीने देखभाल दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिले.

आदगाव बीचश्रीवर्धनसी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्प जामगावश्रीवर्धन परिसरातील नगरपरिषदनगरपंचायत मधील नगरविकास विभागातील प्रलंबित विषयप्रादेशिक परिवहन क्षेत्र माणगाव येथे ब्रेक टेस्ट ट्रेक करणेसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी मंत्रालयात घेतला.

 बैठकीत माजी आमदार अनिकेत तटकरेरोहाचे मुख्य अधिकारी अजयकुमार एडकेश्रीवर्धनचे मुख्य अधिकारी विराज लबडेमेरिटाईम बोर्डचे अभियंता श्री. देवरेउपविभागीय अभियंता तुषार लुंगेसहायक अभियंता सोनिया महंदश्रीवर्धनचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीआदगाव येथील अस्तित्वातील दगडी बंधाऱ्याच्या पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण करून त्यावर मत्स्यजेट्टीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेस गती द्यावी. श्रीवर्धन मधील नगरपरिषदमधील प्रलंबित कामांसाठी निधी वितरीत करण्याची प्रक्रिया राबवावी. घनकचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण व शहराची स्वच्छता राखण्यासाठी रोहा नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहा वन विभागातील मौजे जामगांव येथे विकसित करावयाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधतावन व वनस्पती उद्यान अंतर्गत कामांना गती देण्याच्या सूचनाही मंत्री कु.तटकरे यांनी दिल्या.

०००

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पनाडिझाईन याबरोबरच

टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

मुंबई दि. 4 : राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्णप्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पनाजाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पनाडिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धेच्या प्रवेशिका स्पर्धकांनी दिनांक ५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने पाठवाव्या. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनी’ विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

उपयोजित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून क्रिएटिव्ह संकल्पनाडिझाईन तसेच उत्कृष्ट टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. डिजिटल डिझाइन मध्ये पोस्टर्ससोशल मीडिया क्रिएटिव्हबॅनर्सइन्फोग्राफिक्स तसेच प्रिंट डिझाइनमध्ये पोस्टर्सफ्लायर्सब्रोशर्सबॅनर्सस्टॅण्डीज अशा स्वरूपाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुली असून सहभागी होणाऱ्यास वेगवेगळ्या स्पर्धांसाठी एकूण 3 प्रवेशिका पाठविता येतील.

विजेत्यांना मिळणार ही बक्षीसे -

प्रथम पारितोषक विजेता (१) - २५ हजार रुपये

द्वितीय पारितोषक विजेता (१) - १५ हजार रुपये

तृतीय पारितोषक विजेता (१) - १० हजार तसेच

उत्तेजनार्थ म्हणून एकूण १५ स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

असे आहेत स्पर्धेचे विषय -

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणनगरविकाससार्वजनिक बांधकाममेट्रोपरिवहन सांस्कृतिक कार्यमराठी भाषापर्यटनराजशिष्टाचारमृद व जलसंधारणजलसंपदा व लाभक्षेत्र विकासशालेय शिक्षणउच्च शिक्षणकौशल्य विकाससार्वजनिक आरोग्यवैद्यकीय शिक्षणगृहराज्य उत्पादन शुल्कविधी व न्यायकामगारसामाजिक न्यायआदिवासी विकासदिव्यांग कल्याणइतर मागास व बहुजन कल्याणवनेपर्यावरण व वातावरणीय बदलऊर्जापाणी पुरवठा व स्वच्छतारोजगार हमी योजनामहिला व बालविकासक्रीडा व युवक कल्याणअन्न व नागरी पुरवठाअन्न व औषध प्रशासनसामान्य प्रशासन/वित्त व नियोजन/ माहिती व तंत्रज्ञानकृषि/सहकार/पणनवस्त्रोद्योगपशुसंवर्धन/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय/फलोत्पादनमहसूलमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन.

अशा आहेत स्पर्धेच्या अटी व शर्ती -

सादरीकरणे मूळ आणि सहभागी स्पर्धकांनी स्वत:ने तयार केलेली असावी. सादरीकरण कोणत्याही कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावीत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला सादर केलेली कोणतीही रचनात्मक सामग्री प्रचारविपणनकिंवा प्रकाशन उद्देशाने वापरण्याचा अधिकार महासंचालनालयाला असेल. अंतिम निर्णय महासंचालनालयाचा असेल. विजेते ईमेलद्वारे सूचित केले जातील आणि अधिकृत मंचावर जाहीर केले जातील. कोणतीही कॉपीराइट सामग्री वापरली जाऊ नये. असभ्य भाषा/आक्षेपार्ह शब्द/हिंसात्मक भाषा वापरण्यास बंदी असून राज्य शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सहभागींनी महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे माहितीपट सादर करणे आवश्यक आहे. डिजिटलसाठी JPEG/PNG/PDF (प्रिंट डिझाइनसाठी किमान 300 dpi रिझोल्यूशन) असणे आवश्यक आहे. तर व्हिडिओसाठी एचडी असल्यास HD 1280 X 720 पिक्सेल तसेच फुल एचडी असल्यास 1920 x 1080 पिक्सेल असणे आवश्यक आहे. पोस्टर्स: A3 आकार (297 x 420 मिमी). सोशल मीडिया क्रिएटिव्ह: 1080 x 1080 पिक्सेलफ्लायर्स/ब्रॉशर्स: A4 आकार (210 x 297 मिमी) स्वरुपात असणे आवश्यक आहे.

असे आहेत स्पर्धेचे निकष...

जाहिरात किती अनोखी आणि कल्पक आहे. ती इतरांपासून वेगळी आहे कासंकल्पना ताज्या आणि नाविन्यपूर्ण आहेत का हे परीक्षकांकडून तपासण्यात येतील. जाहिरात नवीन विचार किंवा पद्धतीवर तसेच रचनात्मक पद्धतीने सादर करण्यात आली आहे का हे पाहण्यात येईल. जाहिरात प्रेक्षकांवर कोणता भावनिक किंवा मानसिक प्रतिसाद निर्माण करते. ती लक्ष वेधून घेते काप्रभावशाली प्रतिक्रिया निर्माण करते काकिंवा समज बदलते का?याचा विचार यावेळी होईल. जाहिरातीचे सौंदर्यशास्त्र. ती दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक आहे का?, मांडणी नीटनेटकी आहे का?, आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवते का हे पाहण्यात येईल. जाहिरातमधील लिखित सामग्रीची गुणवत्ता. भाषा स्पष्टआकर्षक आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवणारी आहे का हे तपासण्यात येईल. जाहिरात निवडलेल्या माध्यमाचा (जसे की टीव्हीप्रिंटडिजिटल इ.) कसा वापर करते. ते प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे वापरले जाते काज्यामुळे जास्तीत जास्त रिच आणि प्रभावशाली होते का हे पाहण्यात येईल. सर्जनशीलताथीमशी सुसंगततासंदेशाची स्पष्टतादृश्य प्रभावमौलिकता यावर निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा निर्णय अंतिम राहिल.

याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.

 ही निवृत्तीनंतरच्या आनंदी आणि निरोगी जीवनासाठी ३६ शिफारसींची यादी आहे. एका नामांकित कंपनीच्या HR विभागाने हा संदेश प्रसारित केला आहे.


1. एकटे प्रवास टाळा.



2. जोडीदारासोबत प्रवास करा.



3. गर्दीच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.



4. अतिव्यायाम किंवा जास्त चालणे टाळा.



5. अति वाचन, मोबाईल वापर किंवा टीव्ही पाहणे टाळा.



6. औषधांचे अति सेवन टाळा.



7. वेळेवर डॉक्टरांना भेटा आणि नियमित औषधे घ्या.



8. निवृत्तीनंतर मालमत्ता व्यवहार टाळा.



9. ओळखपत्र आणि महत्त्वाचे फोन नंबर नेहमी सोबत ठेवा.



10. भूतकाळ विसरा आणि भविष्याची जास्त चिंता करू नका.



11. आपल्या तब्येतीस अनुकूल आहार घ्या आणि सावकाश चावून खा.



12. बाथरूम आणि टॉयलेटमध्ये काळजी घ्या.



13. धूम्रपान आणि मद्यपान टाळा, ते हानिकारक आहेत.



14. स्वतःच्या यशाची बढाई मारू नका.



15. निवृत्तीनंतर काही वर्षे भरपूर प्रवास करा, नंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.



16. इतरांसोबत आपल्या संपत्तीविषयी चर्चा करू नका.



17. आपल्या क्षमतेनुसार आणि आरोग्यानुसार व्यायाम करा.



18. उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असल्यास शीर्षासन व कपालभाती टाळा.



19. सकारात्मक राहा आणि अति भावना टाळा.



20. जेवल्यानंतर लगेच झोपू नका.



21. इतरांना पैसे उधार देऊ नका.



22. नवीन पिढीला विनाकारण सल्ले देऊ नका.



23. इतरांच्या वेळेचा आदर करा.



24. गरज नसताना जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नका.



25. रात्री चांगली झोप मिळण्यासाठी दुपारी झोप टाळा.



26. स्वतःची खासगी जागा ठेवा आणि इतरांच्या गोपनीयतेचा सन्मान करा.



27. मृत्यूपत्र तयार करा आणि जोडीदाराशी चर्चा करा.



28. निवृत्ती बचत पुढच्या पिढीला देण्यापेक्षा ती सुरक्षित ठेवा.



29. ज्येष्ठ नागरिक गटात सामील व्हा, पण वाद टाळा.



30. झोप येत नसेल तर इतरांना त्रास देऊ नका.



31. झाडांवरून फुले तोडू नका.



32. राजकारणावर चर्चा टाळा किंवा वेगवेगळ्या मतांचा स्वीकार करा.



33. सतत आरोग्याच्या तक्रारी करू नका.



34. जोडीदाराशी भांडण टाळा, ते तुमचे मुख्य आधार आहेत.



35. आध्यात्मिक कार्यक्रमांना हजेरी लावा, पण आंधळे अनुकरण करू नका.



36. हास्य आणि आनंदासह तणावमुक्त जीवन जगा.




भारतीय राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक कल्याण संघटनेने (National Senior Citizens' Welfare Association of India) शेअर केलेला हा संदेश अतिशय उपयुक्त आहे. कृपया तो समजून घ्या आणि शक्य तितका आचरणात आणा.

राष्ट्रीय कर्कराग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम 34 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला,pl share

 सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले कीकर्करोगाविरुद्ध जो लढा आहेत्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. कर्करोगाच्या बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाउपचार आणि उपचारानंतरची पुनर्वसन प्रक्रिया या तीनही गोष्टीवर लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रत्येक देशामध्ये कर्करोगाच्या बाबतीत वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेपासून उपचारसंशोधन आणि वेगवेगळे उपाय यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातूनही लोकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान रायगड कर्करोग आरोग्यसेवा व मुखकर्करोग आणि कर्करोग सदृश्य या दोन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक तर आभारप्रदर्शन संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी केले.

राज्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणाबाबत राबविण्यात येत असलेले उपक्रम :

राष्ट्रीय कर्करागमधुमेहहृदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम 34 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

शासकीय रूग्णालयांमध्ये कर्करोगमधुमेह व उच्चरक्तदाब इत्यादीकरिता तपासणी व मोफत उपचार केले जातात.

* 2018-19 पासून राज्यात पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग हा उपक्रम सुरू आला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी 30 वर्षावरील  वयोगटासाठी पाच आजारांकरिता (मधुमेहउच्चरक्तदाबमौखिक कर्करोगस्तर कर्करोगव गर्भाशय मुख कर्करोग) प्राथमिक तपासणी आशा व एएनएमद्वारे करण्यात येते. लवकर निदान करून रूग्णांना वेळेत योग्य उपचार देण्यात येत आहे.

सन 2018-19 मध्ये जिल्हास्तरावर रत्नागिरीसिंधुदुर्गपुणेसाताराअमरावतीनाशिकगडचिरोलीअकोला व बीड येथे कर्करोग आरोग्य सुविधा DAY CARE CENTER सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत रूग्णांना केमोथेरेपी उपचार उपलब्ध करून देण्यात येतात.

सन 2018-19 पासून आजतागायत एकूण 2028 कर्करोग रूग्णांना केमोथेरेपी सेंटरमध्ये उपचार देण्यात आले आहेत.

राज्यात अमरावती व नाशिक या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्यामध्ये कर्करोग रूग्णांना बाहृयरूग्णआंतररूग्णशस्त्रक्रियाकेमोथेरेपी सेवेसह रूग्ण व कुटुंबांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येते.

राज्यात 4 ठिकाणी रेडिऐशन ऑन्कॉलॉजीचे विभाग स्थापन करण्यात येणार आहे.

टर्शरी कॅन्सर केअर सेंटर या योजनेंतर्गत राज्यातील कर्करोग रूग्णालयांचे बळकटीकरण अंतर्गत कर्करोग रूग्णांना माफक दरात व दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात.

कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची -

 कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची

                                                                        सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि.4 : कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीनेअधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केली.

जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहआरोग्य सेवा तथा अभियान संचालनालयानाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायकआरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकरटाटा मेमोरियल इस्टिट्यूटचे संचालक डॉ.सुदिप गुप्ताकॅन्सर वॉरियरआरोग्यसेविकाआशासेविका तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले कीकर्करोगाची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईतील टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटलची आवश्यकता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेनेही यासाठी सजगतेने काम करणे गरजेचे आहे. आज चांगला आहार, जीवनशैली यामुळे आयुर्मान वाढले आहे. परंतु शेतीशी, शारीरिक श्रमाशी ज्यांची नाळ तुटलीती माणसं मात्र साठीतच अनेक व्याधीने ग्रस्त झाली आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने सूर्यनमस्कारयोगासने यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कर्करोग होऊ नये यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. कर्करोग मुक्तीच्या अभियानांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर येण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी केले.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर- 2024’ मुख्यमंत्र्यांना सादर

 प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा

शाळा सर्वेक्षणाचा अहवाल असर- 2024

मुख्यमंत्र्यांना सादर

 

मुंबईदि. 4 : प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल (Annual Status of Education Report) ‘असर-2024’ मंगळवारीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सादर करण्यात आला. या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांनी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी राबविलेल्या शाळा पूर्व तयारी मेळावा- पहिले पाऊल’ चे कौतुक करुन मुख्यमंत्र्यांनी देशाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर भविष्यात शालेय शिक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिक प्रयत्न करावेतअसेही सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेराज्यमंत्री डॉ.पंकज भोयरमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव डॉ.अश्विनी भिडेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहाराष्ट्र राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावारप्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमलाप्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या संचालक फरिदा लांबेफाऊंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अहवालातील ठळक बाबी :

प्रथम संस्थेने महाराष्ट्रात 33 ग्रामीण जिल्ह्यातील 987 गावांतील 19,573 घरांमधील 33,746 मुलांचे सर्वेक्षण केले. तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असलेल्या मुलांचे प्रमाण 2022 च्या 93.9 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये 95 टक्के इतके आहे. 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या आठ वर्षांपासून 99 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही 2018 मधील 99.2 टक्क्यांवरुन एकूण पटनोंदणीचे आकडे 2022 मध्ये 99.6 पर्यंत वाढून 2024 मध्ये सुद्धा स्थिर आहेत.

पटनोंदणीबरोबरच वाचनगणितडिजिटल साक्षरता आदींबाबतही अहवालामध्ये नोंद घेण्यात आली आहे. 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विविध डिजिटल टास्क करण्याचे प्रमाण 83.4 ते 92.3 टक्के इतके आहे. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोनामध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.

वय वर्ष 15 ते 16 याच्यामध्ये 98 टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतातअशी नोंदही असर’ अहवालात घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

Featured post

Lakshvedhi