Thursday, 19 December 2024

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ

 तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·         विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड

·         एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र

 

नागपूरदि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले कीमागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले.  मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला

विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड

 विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड

नागपूरदि. 19 : विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारविरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे प्रा. राम शिंदे यांना सभापतीच्या आसनापर्यंत सन्मानपूर्वक घेवून गेले.

विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीयउमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदेसदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.

 उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.

सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय

आमदार प्रा राम शंकर शिंदे

विधानपरिषद सदस्यमाजी मंत्री 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.

वैयक्तिक परिचय

नाव - प्रा. राम शंकर शिंदे

जन्मतारीख - 1 जानेवारी 1967

शिक्षण – एम. एस्सीबी.एड.

 (वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)

पत्ता - मु.पो. चौंडीता. जामखेड,

 जि.अहिल्यानगर - 413205

भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ

— प्रदेश उपाध्यक्षभाजपा युवा मोर्चामहाराष्ट्र राज्य-2004 ते 2006

— तालुकाध्यक्षभाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009

— जिल्हाध्यक्षभाजपाअहिल्यानगर 2010 ते 2012

— सरचिटणीसभाजपामहाराष्ट्र राज्य 2013 ते 2015

— प्रदेश उपाध्यक्षभाजपामहाराष्ट्र राज्य-2021

— सदस्यभाजपाकोअर कमिटीमहाराष्ट्र राज्य-2022

लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-

— सन 2000-2005 - सरपंचग्रामपंचायत चौंडी

— सन 2009-2014 - आमदार

227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.

— 2014-2019 आमदार

-227 कर्जत-जामखेड विधानसभा  मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.

— सन 2014-2016 या दरम्यान  गृहकृषीआरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.

सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याणवस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.

(सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला " जलयुक्त शिवार अभियान " हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.)

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक

 अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक

                                                      - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

  नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान

 आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त

नागपूर,दि. 19 : माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’  ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरीत्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर - अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.    

श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.

वर्ष 2017 ते 2020 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकरमागण्यांशी संबंधीत व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; 30 मार्च अंतिम मुदत

 वर्ष 2017 ते 2020 पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकरमागण्यांशी संबंधीत

व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; 30 मार्च अंतिम मुदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

 

मुंबईदि. 18 :-  महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 विधेयकातील कलम 73 अंतर्गत वर्ष 2017-18, 2018-19 आणि 2019-20 च्या कर मागण्यांशी  संबंधित  व्याज किंवा दंड किेंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना (Amnesty Scheme)  राज्यात लागू करण्यात आली असून 31 मार्च 2025 ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले.

 

या अभय योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीराज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारण एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत. विवादित रक्कम 54 हजार कोटी रुपयांची आहे.  त्यापैकी विवादीत कर 27 हजार कोटी रुपयांचा दंड तसेच शास्तीची रक्कम 27 हजार कोटी रुपयांची आहे. यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादीत कराच्या सुमारे 20 टक्के रक्कम  योजनेमध्ये जमा होते. त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे 5 हजार 500 कोटी ते 6 हजार कोटी रुपये विवादीत कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. यापैकी अर्धी रक्क्म म्हणजे 2 हजार 700 कोटी ते 3 हजार कोटी रुपये राज्य शासनास मिळतील व उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडे जमा होईल. या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे 5 हजार500 ते 6 हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल. या अभय योजनेची माहिती करदात्यांनावकीलांनाचार्टर्ड अकाऊंटंटनागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

----०००००---

गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार

 गेट वे ऑफ इंडियाजवळील बोटीची दुर्घटना दुर्दैवी

दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत देणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

नागपूरदि. 18 : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटल्याची घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत.  त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे,  निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबोटीतील लोकांना मदत वेळेवर पोहोचल्यामुळे त्यांना वाचवता आले. या घटनेची अधिकची सविस्तर माहिती घेतली जाईल. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल.

००००

मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देशमी

 मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश

·         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नागपूरदि. १८ :- मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदलजेएनपीटीतटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषदेत सांगितले. 

एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळेमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली व बचावकार्याबाबत निर्देश दिले.

0000


 

नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत · मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत

 नागपूर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज २१ डिसेंबरपर्यंत

·        मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत निवेदन

 

नागपूरदि. १८ :-  नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवारदि.२१ डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत चालणार असल्याचे निवेदन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केले.

Featured post

Lakshvedhi