Friday, 25 October 2024

राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची परवानगी आवश्यक

 राजकीय जाहिरातींसाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण

समितीची परवानगी आवश्यक

 

मुंबई, दि. 25 : सर्व राजकीय पक्षउमेदवारव्यक्ती यांनी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर / प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींना राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी हे आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

जाहिरातींमध्ये दूरचित्रवाहिन्याकेबल नेटवर्क/ केबल वाहिन्यांवरचे प्रक्षेपण प्रसारणचित्रपटगृहेरेडिओखाजगी एफएमसार्वजनिक ठिकाणी दृकश्राव्य माध्यमा‌द्वारे (Audio- Video Display) होणारे प्रसारणई-वृत्तपत्रांमधील जाहिरातींचे प्रकाशनबल्क एसएमएस (SMS)  / व्हॉईस मॅसेजेस यांचा समावेश होतो. तसेच मुद्रीत माध्यमांमध्ये (Print Media Paper) मतदानाच्या आधीच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिरातींकरीता देखील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

जाहिरातीचे पुर्वप्रमाणीकरण करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीकडे समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारसंघातील व्यक्ती किंवा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जारी करावयाच्या जाहिरातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्य स्तरीय समितीकडे सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षसंस्था यांनी जाहिरात पूर्व प्रमाणीकरणासाठी अर्ज करावयाचा आहे. या समितीकडून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण केले जाते.

जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती व राज्य स्तरावर राज्य पूर्वप्रमाणीकरण समिती यांनी मान्यता दिल्याशिवाय राजकीय पक्ष / उमेदवारांनी राजकीय जाहिरातीचे प्रसारण करू नये. आजपर्यंत 169 जाहिरातींचे राज्यस्तरावरील राज्य पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणिकरण करण्यात आलेले आहे.

००००

सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या १२५० तक्रारी निकाली १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 सी-व्हिजिल ॲपवरील आचारसंहिता भंगाच्या

१२५० तक्रारी निकाली

१०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 

 मुंबईदि. २५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण १२५९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १२५० तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 सजग नागरिकांना  आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

१०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०० कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

0000

देवाण-घेवाण विशेषांक • भवताल दिवाळी २०२४

 देवाण-घेवाण विशेषांक

• भवताल दिवाळी २०२४


माणसाचा इतिहास असे सांगतो की कोणताही प्रदेश, समाज किंवा समूह विकसित होण्यामध्ये ‘देवाणघेवाण’ महत्त्वाची भूमिका बजावते. इतरांशी संवाद न साधता, त्यांच्याकडून काहीच न घेता स्वतंत्र बेटावर राहून विकास साधणे केवळ अशक्य आहे. महाराष्ट्र, दक्खनच्या भूतकाळाचा मागोवा घेतला असता असे दिसते की आपण जे आहोत ते घडण्यामध्ये इतर समूह, समाज, संस्कृती यांच्याशी आलेला संपर्क आणि त्यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरला आहे.

देवाणघेवाणीमुळे महाराष्ट्र कसा घडला
याची कहाणी सांगणारा,
देवाण-घेवाण विशेषांक !

अंक घरपोच मिळवण्यासाठी लिंक:

‘भवताल दिवाळी विशेषांक’ म्हणजे महाराष्ट्राचे वेगळे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करण्याचा आणि असा आगळा-वेगळा महाराष्ट्र जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. या माध्यमातून आतापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात पाऊस, खडक, देवराई, परंपरागत जलव्यवस्था, अधिवास, सूक्ष्मजीव, भूजल, सडे-पठारे, माळराने हे अंक प्रसिद्ध झाले. आता हा दहावा ‘देवाणघेवाण विशेषांक.

(२०२४ ची वर्गणी भरलेल्या वाचकांना अंक घरपोच येईल. पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.)

• संपादक

--

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य करण्यास स्लोवाकिया उत्सुक




 ग्रीन हायड्रोजनसांडपाणी व्यवस्थापन,

हवामानशास्त्र विषयात भारताला सहकार्य करण्यास स्लोवाकिया उत्सुक

- राजदूत रॉबर्ट मॅक्सियन

 

मुंबई, दि. 25 : पूर्वीच्या झेकोस्लोवाकिया मधून विलग झालेला स्लोवाकिया देश अभियांत्रिकीवाहन निर्मितीसंरक्षण उत्पादनेधातुशास्त्रग्रीन हायड्रोजनआदी क्षेत्रात आघाडीवर असून आपला देश भारताला ग्रीन हायड्रोजनसांडपाण्याचे व्यवस्थापनहवामान शास्त्र व सायबर सुरक्षा या क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहेअसे प्रतिपादन स्लोवाक गणराज्याचे भारतातील राजदूत रॉबर्ट मॅक्सियन यांनी केले. 

रॉबर्ट मॅक्सियन यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

स्लोवाकिया जगातील सर्वात मोठा (चारचाकी) कार निर्मिती करणारा देश असून आपल्या देशात हुंदाईफोक्सवॅगनजॅग्वारलँड रोव्हर आदी कारची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते असे सांगून स्लोवाकिया दरडोई उत्पन्नात देखील अग्रेसर आहे असे राजदूत मॅक्सियन यांनी राज्यपालांना सांगितले.

स्लोवाकिया एकट्या चीनमध्ये २०० पेक्षा अधिक ठिकाणी शहरी सांडपाण्याचे व्यवस्थापन करत असून भारतात देखील या बाबतीत सहकार्य केले जाईलअसे राजदूतांनी सांगितले.

स्लोवाकिया येथे चित्रपट निर्मात्यांनी जावे याकरिता आपण राजभवन येथे चित्रपट निर्मात्यांना बोलावू व त्यांचेशी चर्चा करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतात फुटबॉल दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून स्लोवाकियाने भारतात फुटबॉलचे प्रदर्शनी सामने आयोजित केल्यास त्यातून उभय देशांमधील संबंध बळकट होतील असे राज्यपालांनी सांगितले.   

यावेळी राजदूतांच्या पत्नी याना मॅक्सियानोव्हा आणि  स्लोवाक गणराज्याचे मुंबईतील मानद कॉन्सल अमित चोक्सी उपस्थित होते.

००००

 

 

Photo Line :

Slovak Ambassador calls on Maharashtra Governor

 

Mumbai Dated 25 : The Ambassador of the Slovak Republic to India Robert Maxian met Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai. Wife of the Ambassador Jana Maxianova and Honorary Consul of the Slovak Republic in Mumbai Amit Choksey were also present.

००००


 


आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी व्हिजिल ॲपवर तक्रार करा १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

 आचारसंहितेचे उल्लंघन होतेय मगसी व्हिजिल ॲपवर तक्रार करा

१०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

            मुंबईदि. 24 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा  सार्वत्रिक निवडणुकीची तारीख  जाहीर केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

            आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवारप्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पणकाहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी व्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

            सी व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठीवापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणेउल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिलस्थानवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्ये

            सी व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

            एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सी व्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांकपत्तामतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळवेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

            या ॲप्लिकेशनचा वापर करूननिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सी व्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्षनिवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृतीदेखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटोव्हिडिओ

            या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटोव्हीडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथकस्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

            या ॲपवर तक्रार दाखल होताच स्थानिक निवडणूक यंत्रणा तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कारवाई करेल.

डाटा सुरक्षा

            या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

 गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबईदि. २४ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसेदारूड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील १९ अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.

१)         इन्कमटॅक्स  डिपार्टमेंन्ट -                         30 कोटी 93 लाख 92 हजार 573

२)        रेव्हयून्यू इन्टेलिजन्स -                             8 कोटी 30 लाख 84 हजार 878

३)        राज्य पोलीस डिपार्टमेंट -                         8 कोटी 10 लाख 12 हजार 811

४)        नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्युरो -                       2 कोटी 50 लाख

५)        राज्य उत्पादन शुल्क विभाग -                  1 कोटी 75 लाख 392

६)        कस्टम डिपार्टमेंट -                                72 लाख 65 हजार 745

दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूरमुंबई उपनगररत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. ह्यातून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाहीअसा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या सी व्हिजील ॲपवर तक्रार  करता येते. ह्या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.

प्राप्तीकर विभागाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत

धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल.

या नियंत्रण कक्षाकडे नागरिक १८००२२१५१० हा टोल फ्री क्रमांक ८९७६१७६२७६ आणि ८९७६१७६७७६ या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा mumbai.addldit.inv7@incometax.gov.in या ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तीकर विभागाद्वारे  जप्तीची कारवाई  करण्यात येत आहे.

बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ पूर्ण

 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ पूर्ण

 

           मुंबई, दि. 24 : विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम मशिन उपलब्ध आहे. सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आली आहे.

            महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1 लाख 186 इतक्या मतदान केंद्रासाठी 2 लाख 21 हजार 600 बॅलेट युनिट (221 ) 1 लाख 21 हजार 886 कंट्रोल युनिट (122%) व 1 लाख 32 हजार 94 व्हीव्हीपॅट (132%) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5 हजार 166 बॅलेट युनिट, 5 हजार 166 कंट्रोल युनिट व 5 हजार 165 व्हीव्हीपॅट इतक्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करण्यात आला आहे.

 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान मुंबई उच्च न्यायालय, व विविध खंडपीठासमोर 14 लोकसभा मतदारसंघात 16 निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सदरहू 16 याचिकांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात 56 हजार 200 बीयु व 28 हजार 408 सीयु मशीन्स न्यायालयीन प्रकरणामुळे सीलबंद होत्या. सद्यस्थितीत प्रस्तुत 16 निवडणूक याचिकांपैकी 7 निवडणूक याचिकांमधील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्स उच्च न्यायालयाने मुक्त केल्या आहेत. त्यामध्ये 23 हजार 731 बीयु व 12 हजार 307 सीयु मशीन्सचा समावेश आहे.

 

Featured post

Lakshvedhi