Friday, 11 October 2024

सोलर दिवे

 


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात

 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात 


01) लिपिक टंकलेखक :- 803

02) कर सहायक (TA):- 482

03) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00

04) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09

04) उद्योग निरीक्षक(II) :- 39

05) सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00


Around 1333 जागा🔥🔥


Thursday, 10 October 2024

राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी मुख

 राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी

            शिर्डीच्या साईबाबा संस्थानास सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जागा विनामूल्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            महामंडळाचे राहाता तालुक्यातील मौजे निमगाव कोऱ्हाळे येथील 5.48 हे. आर. इतकी जमीन ही या क्रीडा संकुलाची उभारणी दोन वर्षांच्या आत करण्याच्या अटीवर विनामूल्य देण्यात येईल.

-----०-----

मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ

 मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ

            मदरशांमधील डी. एड.बी.एड. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत राज्यातील मदरसांमध्ये पारंपरिकधार्मिक शिक्षणाबरोबरच गणितविज्ञानसमाजशास्त्रहिंदीमराठीइंग्रजी व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या डी. एड. शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येतेते 16 हजार रुपये करण्यात येईल. तसेच माध्यमिकचे विषय शिकवणाऱ्या बी.ए. बी.एड.बी.एस्सी-बी.एड. शिक्षकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून 18 हजार रुपये करण्यात येईल.

-----०-----

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

 मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ

            मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            सध्या हे भांडवल सातशे कोटी रुपये एवढे आहे. या महामंडळामार्फत विविध कर्जपतपुरवठा योजना राबवण्यात येतात.

-----

शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी

 शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी

            नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांना कर्जाची शासन थकहमीची मर्यादा पन्नास कोटींवरून शंभर कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या शासन थकहमीचा कालावधी 1 एप्रिल 2024 पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात येईल.


राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी

 राज्यात आंतरराष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी


            जर्मनीतील बाडेन वुटेन बर्ग यांचे राज्याशी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अॅण्ड स्कील ॲडव्हान्समेंट कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            जर्मनीमध्ये निवड झालेल्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांना व्हिसा व पासपोर्टबाबत मदत करणे, त्याचप्रमाणे इतर आवश्यक त्या उपाययोजना या कंपनीमार्फत करण्यात येतील. या कंपनीला तीन कोटी रुपये भागभांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या या योजनेसाठी 27 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून 10 हजार 50 उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आ

हे.


Featured post

Lakshvedhi