Tuesday, 8 October 2024

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्धमुख

 समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध

-         उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहेआपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहीलशेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आल्याची माहितीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली

            राष्ट्र निर्मितीमध्ये महिलांचे स्थान  योगदान खूप मोठे आहेभारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला शक्तीचे रूप मानले जातेत्यामुळे राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केलीतसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री पवार यांनी सांगितले.

            राज्य शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली तसेच तांदूळ निर्यात बंदीही उठवली आहेदुधाला सप्टेंबर 2024 मध्ये पाच रुपये प्रति लिटर वाढ देण्यात आलेली होती त्यात 7 रूपये वाढ करून प्रतिलिटर 35 रुपये दुधाचा भाव ठरवून देण्यात आलेला आहेशासन सर्वसामान्य  शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहेपोलीस पाटील  कोतवाल यांचे मानधन दुप्पट करण्यात आलेशा सेविकागटप्रवर्तक  अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आलीसरपंचउपसरपंचाचे मानधनात ही दुप्पट वाढ करण्यात आलीअशा प्रकारे हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन श्रीपवार यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

 मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष चालू राहील

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध

- उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूरदि. 8 (जिमाका) :- राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेराज्यातील 2 कोटी 20 लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेतमहिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद  समाधान मिळत आहेहा आनंद  समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणीशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

             मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस मार्गदर्शन करत होतेयावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारआमदार सर्वश्री विजयकुमार देशमुखसुभाष देशमुखराजेंद्र राऊतसमाधान आवताडेसचिन कल्याणशेट्टीसंजय शिंदेशहाजी बापू पाटीलराम सातपुतेमहावितरणचे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादसोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  सोलापूर शहर पोलीस आयुक्त एमराजकुमारजिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगममुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉअमोल शिंदेज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्रीफडणवीस पुढे म्हणाले कीया योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलैचे प्रतिमाह पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेतभाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेतत्याच धर्तीवर राज्य शासनही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात 25 लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेततर या पुढील राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

             राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी 3 हजार 366 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहेया माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहेत्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहेमागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरून सौर पंप बसवून देण्यात येणार असल्याने पुढील 25 वर्ष विजेचा खर्च शेतकऱ्यांना येणार नाहीतसेच मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफीलेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच मुलीच्या नावावर शासन पैसे टाकत आहेएसटी बस मध्ये महिलांना  तिकीटामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहेअशी माहिती श्रीफडणवीस यांनी दिली.

दिलखुलास' कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत

 'दिलखुलासकार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन विभागाचे

आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत

मुंबईदि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्न व पूरक उत्पादने खरेदीबाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत गोडधोड खाद्यपदार्थंची रेलचेल असते. या दिवसात खवामावामिठाईखाद्यतेलवनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ व उत्पादने उपलब्ध व्हावीतनागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर वेळीच विशेष खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येणारी देखरेखनागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत डी. आर. गहाणे यांनी 'दिलखुलासकार्यक्रमात माहिती दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर, गुरूवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीची मासिक, साप्ताहिक सोडत जाहीर

 महाराष्ट्र राज्य लॉटरीची मासिक, साप्ताहिक सोडत जाहीर

 

          मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक व ११४ साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गणपती मालिकेचे ५० लाखाचे तर सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी सोडतीमधून प्रथम क्रमांकाचे सात लाखांची एकूण आठ बक्षीसे जाहीर झाली आहेत. तसेच एकूण एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विविध रकमेच्या तिकिटांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी दिली आहे.

          सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजारावरील बक्षिसाची मागणी वाय ए -१अतिरिक्त शॉप कम गोडऊनएपीएमसी मार्केटसेक्टर १९ बीवाशीनवी मुंबई या कार्यालयाकडे करावी. रक्कम दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडे करावी. अधिक माहितीसाठी ०२२-२७८४६७२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपसंचालक यांनी सांगितले आहे.

          सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र गणपती, महाराष्ट्र सह्याद्रीमहाराष्ट्र गणपती विशेषमहाराष्ट्र गौरवमहाराष्ट्र तेस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र गणपती मालिका तिकिट क्रमांक GBOO/29466 या समित एजन्सीमुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्र सोडतीमधून रक्कम रू सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत. २२६०७ तिकीटांना रू. एक कोटी पाच लाख ६४ हजार व साप्ताहिक सोडतीतून १८६१४ तिकीटांना रूपये एक कोटी पाच लाख एक हजार ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

०००

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चा

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चा

 

          मुंबईदि. : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्यावतीने वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने यावर्षीही वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार असून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चक म्हणून डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

          तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय आणि वैचारिक जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा पाश्चिमात्य आणि भारतीय ज्ञान परंपरांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचे हे सर्व दुर्लभ वाङ्मय एकत्रित स्वरुपात 18 खंडांमध्ये प्रकाशित केले आहेत. या ग्रंथावर रविवारदिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर)पाचवा मजलापु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसरसयानी मार्गमुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

          वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विद्यापीठेसाहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभागशिवाजी विद्यापीठकोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कथांचे अभिवाचनʼ हा कार्यक्रममराठी विभागमुंबई विद्यापीठमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजनमराठी विभागस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठनांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्याभिवाचनʼ हा कार्यक्रममहावीर महाविद्यालयकोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान व अभिवाचनʼ हा कार्यक्रमलोकमान्य टिळक महाविद्यालयवणीजि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्याखानपरिसंवाद व ग्रंथप्रदर्शनʼ हा कार्यक्रमसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थापुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ, धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूरजि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक नाट्यलेखन कार्यशाळाʼ, नारायण देसाई फाऊंडेशनपवईमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

          याबरोबरच 1) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळमुंबई 2) मराठवाडा साहित्य परिषदछत्रपती संभाजीनगर 3) मुंबई मराठी साहित्य संघमुंबई 4) महाराष्ट्र साहित्य परिषदपुणे 5) विदर्भ साहित्य संघनागपूर 6) कोकण मराठी साहित्य परिषदरत्नागिरी 7) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभाकोल्हापूर या सात साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देखील वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावाअसे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

00000

सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या प्रदर्शनाला मंत्री छगन भुजबळ यांची भेट

 सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची

या प्रदर्शनाला मंत्री छगन भुजबळ यांची भेट

 

          मुंबईदि. 8 : ‘सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

          मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शासनाच्या सर्व विभागांची माहिती देणारे हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल मंत्री श्री.भुजबळ यांनी कौतुक केले. चित्रकार नरेंद्र बोरलेपवार यांनी यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi