Monday, 9 September 2024

सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती !

 सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती !


जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख - हत्ती मुखी असलेले आपल्याला पाहण्यास मिळते.

अर्थात प्रस्थापित सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या या संघर्षात

गणपतीच्या अन्य रुपाची कोणी कल्पनाही करू शकत नाही एवढा सांस्कृतिक गुलामी आणि सांस्कृतिक अंधकाराने समाजाचा मेंदू गुलाम करून ठेवला आहे. 

मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे,मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.


मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. हे प्राचीन शिल्प आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाण्यास पुरेसे आहे. 


तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. 

"आदी विनायक" असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती असे संबोधले जाते.


|| जन गण मन अधिनायक जय हे ||


आपणा सर्वांना गण अधिनायक असलेल्या अशा गणव्यवस्थेच्या शिल्पकार असलेल्या गणपती   ( लोकप्रमुख ) सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा-सदिच्छा 💐


-निरज धुमाळ


राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना प.पु स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न

   राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना प.पु  स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न


परळी /प्रतिनीधी
प्रति वर्ष नुसार याही वर्षी आपल्या परळी शहरात राजस्थानी गणेश मंडळ ची मूर्ति स्थापना संपन्न झाली असून मूर्ति स्थापना परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी अनंतविभूषित शिवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या वेळी मंडळ समिति सह समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.
प्रथम महाराजांच्या हस्ते मूर्ति स्थापना करण्यात आली आरती संपन्न झाल्यावर श्री शिवगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले यात महाराजांनी गणेश चतुर्थी यावर प्रवचन करत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे इतिहास त्यातील बोध श्रीना दूर्वा का वहतात बाप्पाच्या शरीरा सह त्यांचे वाहन या वर प्रवचन दिले राजस्थानी गणेश मंडल ने चतुर्थी ते अनंत चौदस पर्यंत गणेश याग होम पूजा करने म्हणजे फार मोठे कार्य आहे असे होम हवन पूजा पाठ करणाऱ्या मंडळ ने मला आमंत्रित केले असे म्हणत आभार व्यक्त करत प्रवचनास विराम दिला
राजस्थानी गणेश मंडल ने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या वर्षीही आयोजित केले असून सुंदर असा देखावा ही करण्यात आला आहे तरी परली शहरातील भाविक भक्तानी या देखावा पहन्यास काल पासून मोठी गर्दी केली आहे शेवट च्या दिवशी भव्य दिव्य मिरवनुक शहरातून निघणार असून ही मिरवनुक राजस्थानी बालाजी मंदिर ते पोलिस स्टेशन मार्गे रानी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे बाजार समिति आर्य समाज मंदिर मार्गे टॉवर गणेशपार मार्गे भव्य दिव्य मिरवनुक निघणार असल्याचे मंडळ अध्यक्ष यांनी सांगितले आहे विशेष म्हणजे लोकप्रिय असलेला फुलाची उधळन करत विशेष अनेक ढ़ोल वाध्य, संभळ या सह अद्भुत देखावा पहन्यास सर्व परळीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजस्थानी गणेश मंडळा कडून करण्यात आले आहे.

वर्षा पोकळ कांबळे

 


Sunday, 8 September 2024

आला आला माझा गणराज आला



 

अष्टविनायक गणपती आणि त्यांची वैशिष्ट्ये -

 -:♦:- अष्टविनायक गणपती आणि त्यांची वैशिष्ट्ये -:♦:-


|| गणपती म्हटलं की आपल्यासमोर अष्टविनायक उभा 

|| राहतात. त्यातच सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. 

|| आपल्याकडे मोठ्या भक्ती भावाने श्री ची पूजा केली जाते. 

|| महाराष्ट्रात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून 

|| आपल्याकडे अष्टविनायक दर्शन मोठे भाग्याचे मानले 

|| जाते. कोठे आहेत हे अष्टविनायक गणपती ? त्यांची 

|| वैशिष्ट्ये काय आहेत ? त्याविषयी आज जाणून घेऊयात.


-:♦ मोरगावचा मयुरेश्वर :------------ 


|| अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा 

|| मयुरेश्वरचा उल्लेख होतो. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून 

|| उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन 

|| बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या 

|| भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत. 

|| मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.


-:♦ सिद्धटेकचा सिद्धीविनायक :------------ 


|| भीमा नदीच्या काठावर श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर 

|| टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर 

|| केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे. 

|| श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच 

|| व २.५ फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी 

|| आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही 

|| मूर्ती आहे.


-:♦ पालीचा श्री बल्लाळेश्वर :------------ 


|| श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. 

|| श्री बल्लाळेश्वराच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे 

|| आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. 

|| मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

|| मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून 

|| डोळ्यात  हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे.


-:♦ महाडचा श्री वरदविनायक :------------ 


|| श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला 

|| घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर 

|| नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ 

|| झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. 

|| इ. स. १७७५ मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात 

|| आले आहे.


-:♦ थेऊरचा श्री चिंतामणी :------------ 


|| थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. 

|| भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी 

|| म्हणतात. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.


-:♦ लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक :------------ 


|| जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील 

|| डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. 

|| श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली 

|| आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, 

|| खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व 

|| त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.


-:♦ ओझरचा विघ्नेश्र्वर :------------ 


|| अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री 

|| विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक 

|| असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती 

|| असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या 

|| गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.


-:♦ रांजणगावचा महागणपती :------------ 


|| पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे 

|| महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातील 

|| अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे 

|| "महागणपती" चे रूप आहे. श्री महागणपतीला कमळाचे 

|| आसन आहे.


शुभ दिनौम शुभ्याम

 


Saturday, 7 September 2024

वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

 वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

 

मुंबई, दि. 7 : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, गणरायाचं आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचं दर्शन घडतं. सगळ्या जगाचं महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत  उत्साह-जोश दिसतो.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीभातीचं नुकसान झालं आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी  सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत केली जाईल.

माझं आपणास आवाहन आहे की, श्री गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांपर्यंत पोहचा. त्यांना मदतीचा हात द्या. त्यांच्यापर्यंत शिक्षण, आरोग्य तसेच अशा विविध प्रकारच्या सेवा, मदत पोहचवण्याचा प्रयत्न करूया. आपण पर्यावरणाची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचं जतन-संवर्धन होईल ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असेही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्य शासनाने अनेक चांगल्या लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचं कौतुक होत आहे. शेतकरी, युवक, महिला या सर्वचस्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे.

श्रीगणेशाच्या कृपेनं आम्ही राज्यातल्या गोरगरीब, दुर्बल आणि गरजू लोकांसाठी आणखीही चांगल्या योजना आणून त्यांची अंमलबजावणी करू असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


Featured post

Lakshvedhi