सोंड नसलेला जगातील एकमेव गणपती !
जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख - हत्ती मुखी असलेले आपल्याला पाहण्यास मिळते.
अर्थात प्रस्थापित सांस्कृतिक वर्चस्ववादाच्या या संघर्षात
गणपतीच्या अन्य रुपाची कोणी कल्पनाही करू शकत नाही एवढा सांस्कृतिक गुलामी आणि सांस्कृतिक अंधकाराने समाजाचा मेंदू गुलाम करून ठेवला आहे.
मात्र दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे,मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.
मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. हे प्राचीन शिल्प आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाण्यास पुरेसे आहे.
तामिळनाडूमध्ये कुथनूरपासून जवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे.
"आदी विनायक" असे या मंदिराचे नाव आहे.
गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती असे संबोधले जाते.
|| जन गण मन अधिनायक जय हे ||
आपणा सर्वांना गण अधिनायक असलेल्या अशा गणव्यवस्थेच्या शिल्पकार असलेल्या गणपती ( लोकप्रमुख ) सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा-सदिच्छा 💐
-निरज धुमाळ
No comments:
Post a Comment