-:♦:- अष्टविनायक गणपती आणि त्यांची वैशिष्ट्ये -:♦:-
|| गणपती म्हटलं की आपल्यासमोर अष्टविनायक उभा
|| राहतात. त्यातच सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे.
|| आपल्याकडे मोठ्या भक्ती भावाने श्री ची पूजा केली जाते.
|| महाराष्ट्रात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून
|| आपल्याकडे अष्टविनायक दर्शन मोठे भाग्याचे मानले
|| जाते. कोठे आहेत हे अष्टविनायक गणपती ? त्यांची
|| वैशिष्ट्ये काय आहेत ? त्याविषयी आज जाणून घेऊयात.
-:♦ मोरगावचा मयुरेश्वर :------------
|| अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून मोरगावचा
|| मयुरेश्वरचा उल्लेख होतो. डाव्या सोंडेची ही मूर्ती असून
|| उत्तराभिमूख आहे. उजवा गुडघा छातीजवळ घेऊन
|| बसलेल्या या श्रींच्या डाव्या हातात मोदक आहे. श्रींच्या
|| भालप्रदेशावर आणि नाभीमध्ये रत्न जडविलेले आहेत.
|| मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.
-:♦ सिद्धटेकचा सिद्धीविनायक :------------
|| भीमा नदीच्या काठावर श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर
|| टेकडीवर उत्तराभिमूख असून त्यावर सुंदर कलाकूसर
|| केलेली आहे. मंदिराचा गाभारा बराच मोठा आहे.
|| श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ३ फूट उंच
|| व २.५ फूट लांबची आहे. मूर्ती उत्तराभिमूखी गजमुखी
|| आहे. अष्टविनायकातील उजवीकडे सोंड असलेली ही
|| मूर्ती आहे.
-:♦ पालीचा श्री बल्लाळेश्वर :------------
|| श्री बल्लाळेश्वर गणपती भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे.
|| श्री बल्लाळेश्वराच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे
|| आहेत. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे.
|| मंदिराची रचना देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.
|| मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून
|| डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे.
-:♦ महाडचा श्री वरदविनायक :------------
|| श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला
|| घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर
|| नागाची नक्षी आहे. दगडी महिरप मंदिरात सिंहासनारूढ
|| झालेल्या श्री वरदविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे.
|| इ. स. १७७५ मध्ये पेशवाई काळात हे मंदिर बांधण्यात
|| आले आहे.
-:♦ थेऊरचा श्री चिंतामणी :------------
|| थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे.
|| भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी
|| म्हणतात. अतिशय प्राचिन क्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध आहे.
-:♦ लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक :------------
|| जुन्नर लेण्यांच्या सहवासात कुकडी नदीच्या परिसरातील
|| डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे.
|| श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली
|| आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम,
|| खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व
|| त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
-:♦ ओझरचा विघ्नेश्र्वर :------------
|| अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री
|| विघ्नेश्र्वराची ओळख आहे. श्रींच्या डोळ्यात माणिक
|| असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती
|| असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या
|| गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.
-:♦ रांजणगावचा महागणपती :------------
|| पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे
|| महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. महाराष्ट्रातील
|| अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे
|| "महागणपती" चे रूप आहे. श्री महागणपतीला कमळाचे
|| आसन आहे.
No comments:
Post a Comment