Thursday, 22 August 2024

अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

 अंश: रद्द अर्जची त्रुटी पूर्तता करून

अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

§  मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना

 

मुंबई दि. २१ : मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत दि. ०९ ऑगस्ट२०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हयातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रटी पर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी  तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावेजेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीअसे आवाहन मुंबई शहर जिल्हयातील सर्व संबंधीतांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समुह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतु १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना वाहन करण्यात येते कीनारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापुर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपर्ण अर्जाची यादी पाह शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नावमोबाईल नंबर सुध्दा पाहता येतील.

            सर्व संबंधीतांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघुन त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावायामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईलयाची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.

0000

जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध

 जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

§  पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश

§  जलजीवन मिशन अंतर्गत धुळेनाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी

            मुंबईदि. २१ : जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावावी. जलजीवन मिशन अंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            विविध जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील कामांच्या  स्वतंत्र आढावा बैठका मंत्रालय येथे झाल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार विक्रम सावंत यांच्यासह प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाकार्यकारी अभियंता श्रीमती पलांडेकार्यकारी अभियंता विजय वाईकरएस सी निकम,  यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

             पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी पाणीपुरवठा योजनातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु कामांविषयी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांची दखल  घेतली. श्री पाटील म्हणालेसांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत जत 29 गावांसाठी सुरू असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये निधी मंजूर आहे. 29 गावांपैकी ज्या गावांना शाश्वत स्रोत नाहीत त्या गावांसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे पूर्ण होण्यासाठी गती दिली जावी. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून बाबी निश्चित कराव्यात. ग्रामपंचायतीकडून स्वीकृती व लोकवर्गणी ठरावाबाबत अडचण येणाऱ्या गावातील अडथळे दूर करण्यात यावे असे सांगितले.

         यावेळी श्री. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील  कापडणेसोनगीरबेटावद मसदी सामोडे आणि  जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या  जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. शिथिलता आलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी सतत भेट देऊन वेळेत कामे व्हावी त्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

         शिंदखेडा व येवला तालुक्यातील कामांची स्थिती असमाधानकारक असून शिंदखेडा येथील काम सहा महिन्यापासून बंद आहेयाबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावून  पुढील कारवाई करण्याचेनिर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

            सोनगीर येथील काम या महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. तर मसदी येथील दोन तीन महिन्यात पूर्ण होईल. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 560 कामे पूर्ण झाले असून "हर घर नल से जल" साठी घोषित करण्यात आली आहे यापैकी 104 कामे प्रमाणित झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

§ राज्यस्तरीय कृषि महोत्सव’चे दिमाखदार उद्घाटन आता राज्यात लाडका शेतकरी अभियान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे § सोयाबीन, कापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द

  

§  राज्यस्तरीय कृषि महोत्सवचे दिमाखदार उद्घाटन

आता राज्यात लाडका शेतकरी अभियान

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

§  सोयाबीनकापूस अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द




            बीडदि. २१ : लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी  अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याबाबतची ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केली.

            परळी येथील स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडप कृषि उत्पन्न बाजार समिती येथे दिमाखदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषि महोत्सव २०२४ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारराज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेराज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीनकापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

            पाच दिवसीय या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयांवर परिसंवादचर्चासत्र होणार आहे. तसेच याठिकाणी धान्य महोत्सवरानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषि अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील याठिकाणी आहे. या पाच दिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

            राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीनकापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण­’ योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कष्टकरीवारकरी आणि सुखी शेतकरी’ हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदासोयाबीनकापूस आणि दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठीआधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि त्यांना सन्मान मिळवून देणारी असल्याचे नमूद करून ही योजना सुरु केल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले. राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रात न्याय मिळवून दिला जाईलअसे सांगून ते म्हणाले कीकेवळ १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील सोयाबीनकापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईलअसे कृषिमंत्री श्री. चौहान म्हणाले.

            मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल. यासाठी मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुमारे ११ हजार कोटींची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. ११ सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून माजलगाव कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होवून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईलअसे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी गती देणारी ठरेल असे त्यांनी सांगितले.

            सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे.  त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून जवळपास सव्वाकोटी माता-माउलींच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच गरीब कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे ५२ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा लाभ मिळणार असून शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज मिळेलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच अवर्षणप्रवण भाग असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषि महोत्सवात शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार असून त्यांचे उत्पन्न वाढीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेलअसे त्यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीचीनवीन बदलांची माहिती मिळावीयासाठी कृषि विभागाने राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च करून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार केला जात आहे. ड्रोनद्वारे फवारणीनॅनो युरियानॅनो डीएपी वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च जवळपास ३० टक्केने कमी होवून उत्पन्नात २० टक्के वाढ होईलअसा विश्वास राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

            विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये कृषि आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी राज्यस्तरीय कृषि महोत्सवाबाबत माहिती दिली. पाच दिवसीय कृषि महोत्सवात शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोगांची माहिती देण्यासाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून ४०० पेक्षा अधिक दालनांतून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानप्रयोगांची माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रारंभी महिला आणि शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांचा एकत्रित हार घालून सत्कार करण्यात आला. तसेच बैलबंडी भेट देण्यात आली.

            या कार्यक्रमास आमदार विक्रम काळेआमदार प्रकाश सोळंकेआमदार नमिता मुंदडाआमदार बाळासाहेब आजबेमाजी आमदार टी.आर. जिजा पाटीलमाजी आमदार सुरेश धसविभागीय आयुक्त दिलीप गावडेजिल्हाधिकारी अविनाश पाठकजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केलेआत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी आभार मानले.

हेलिपॅडवर स्वागत

            कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथींचे येथील थर्मल कॉलनी हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. प्रशासनातर्फे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठकपोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

            तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकाच हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांच्यासमवेत आमदार पंकजा मुंडे या देखील होत्या. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही हेलिपॅडवर प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.

0000


 

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे

 चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने शिवाजी साटम सन्मानित

राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांनागानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ अनुराधा पौडवाल यांना प्रदान

राज्याच्या १३ कोटी जनतेच्या वतीने देण्यात येणारे

 राज्य मराठी चित्रपट पुरस्कार अनमोल.

-  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

५८ व ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा

          मुंबई दि. २१ : मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

            वरळी येथील एन एस सी आय डोम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमहाराष्ट्र चित्रपटरंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटीलसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना ,  प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांना चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२४ आणि कंठसंगीतासाठी प्रख्यात गायक सुदेश भोसले यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

            यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ शिवाजी साटम,  चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला. 

            स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ आशा पारेख यांना तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ एन चंद्रा यांना प्रदान करण्यात आले.

 

तसेच यावेळी पुढील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले

  58 वे राज्य चित्रपट पुरस्कार खालीलप्रमाणे -

 

सर्वोत्कृष्ट कथा :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ),

पटकथा :- मकरंद मानेविठ्ठल काळे  (बापल्योक ),

उत्कृष्ट संवाद :-  शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )

उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक)

उत्कृष्ट संगीत: -  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वसंगीत:-  विजय गवंडे ( बापल्योक ),

उत्कृष्ट पार्श्वगायक:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

उत्कृष्ट पार्श्वगायिका:-  प्राची रेगे ( गोदाकाठ )  

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :-  सुजितकुमार (चोरीचा मामला )

उत्कृष्ट अभिनेता:-  राहुल देशपांडे ( मी वसंतराव )

 

उत्कृष्ट अभिनेत्री :-  मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी ( चोरीचा मामला )

सहाय्यक अभिनेता :-  विठ्ठल काळे ( बापल्योक ),

सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे ( फनरल)

प्रथम पदार्पण अभिनेता:- ऋतुराज वानखेडे ( जयंती)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-  पल्लवी पालकर ( फास )

 

 ५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार  खालीलप्रमाणे -

 

सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशीअर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी),

उत्कृष्ट पटकथा :- रसिका आगासे ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट संवाद :-   नितीन नंदन ( बाल भारती )

उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी )

उत्कृष्ट संगीत: - अमित राज ( झिम्मा)

उत्कृष्ट पार्श्वसंगीत :-  सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी)

उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहुल देशपांडे ( गोदावरी ),

उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर),

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :- फुलवा खामकर ( लक डाऊन be positive )

उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,) 

उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू )

सहाय्यक अभिनेता :-  अमेय वाघ ( फ्रेम )

सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ),

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :-  योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )'

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमणध्वनी),

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :- निर्मिती सावंत ( झिम्मा )

००००


 

किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ

 घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

मुंबई दि. २२ : मच्छीमारमत्स्यसंवर्धकमत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त मत्स्यव्यवसाय डॉ. अतुल पाटणे यांनी केले आहे.

शेततळे प्रति हेक्टर सर्वजाती मत्स्यपालन पाच लाख रूपये कर्ज दर निश्च‍ित करण्यात आला आहे. नदीतलावामध्ये छोट्या नावेच्या सहाय्याने मासेमारी  ८० हजार रूपये, निमखारे पाण्यातील सर्वजाती मत्स्यपालन प्रति हेक्टर तीन लाख रूपयेनिमखारे पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रतिहेक्टर तीन लाख रूपये, टॉलर मच्छीमार नौका तीन लाख रूपयेपर्सिसीन मच्छीमार नौका तीन लाख रूपयेगील नेटर मच्छीमार नौका तीन लाख रूपयेबिगर यांत्रिक मच्छीमार नौका ८० हजार रूपयेयांत्रिक मच्छीमार नौका एक लाख ५० हजार रूपयेशोभीवंत मत्स्यपालन एक लाख रूपयेगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय दोन लाख रूपये, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन ५० हजार रूपये अशा एकूण १४ घटकांना कर्जदर निश्च‍ित करण्यात आलेला आहे.

राज्यातील जास्तीत जास्त मच्छीमारमत्स्यसंवर्धकमत्स्यकास्तकार यांनी किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून २०३० पर्यंत मुंबईचा जीडीपी २६ लाख कोटी होणार

 निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सात क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून २०३० पर्यंत मुंबईचा जीडीपी २६ लाख कोटी होणार

 

            मुंबईदि. २२: मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी  सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळण वळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच दृष्टीने राज्यात कामे सुरू आहेत. उद्योजकांची देखील महाराष्ट्राला पसंती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

            वर्षा निवासस्थानी निती आयोगासमवेत झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारनिती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम,  मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहलमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंहउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशीनिती आयोगाचे ओ पी अग्रवालप्रधान आर्थिक सल्लागार ॲना रॉयशिरीष संखेयांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव उपस्थित होते.

            यावेळी निती आयोगाचे श्री. संख्ये यांनी मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण केले. निती आयोग १३ राज्यांसाठी व्हीजन तयार करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले. राज्याच्या विकासासोबतच शहरांच्या आर्थिक विकासावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसरसुरतवाराणसीविशाखापट्टणम या चार महानगरांवर पथदर्शी प्रकल्प म्हणून निती आयोग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            निती आयोगाने केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघररायगडठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराचा विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. सध्या या परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन १२ लाख कोटी (१४० बिलियन डॉलर) असून ते उत्तरप्रदेश राज्याच्या ८० टक्के एवढे आहे. मुंबई आणि महानगर परिसराचा जीडीपी २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. सुब्रमण्यम् यांनी  सांगितले. मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून सुमारे ३० लाख रोजगार अजून निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निती आयोगाने नमुद केले आहे. त्यासाठी सात विकास क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यामध्ये  खासगी क्षेत्रामध्ये १० ते ११ लाख कोटी गुंतवणुक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शहरांना ग्रोथ इंजिन करण्यावर भर देण्यात येणार आहे.

            संपूर्ण महाराष्ट्राच्या एक तृतीयांश जीडीपी या पाच जिल्ह्यातून येत असल्याचे सांगत मुंबईत ग्लोबल सर्विसेस हब करणेपरवडणाऱ्या घरांना चालना देणेएमएमआर परिसराला जागतिक पर्यटन केंद्र बनविणेएमएमआरमधील बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योग आणि लॉजिस्टीक हब करणेसुनियोजित शहरांचा विकाससर्वसमावेशकता आणि शाश्वतता तसेच जागतिक दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा अशा सात बाबींच्या आधारे एमएमआर परिसराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आर्थिक वृद्धीचा वेग वाढविण्यात येणार आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीमुंबईसह महानगर परिसरात असलेल्या संधीचा लाभ घेऊन एकात्मिक विकासासाठी नियोजन निती आयोगाने केले आहे. त्यासाठी परवडणाऱ्या घरांची उभारणी करणेरोजगार निर्मितीवर भर देणेनवी मुंबईत डेटा सेंटरला प्राधान्य देणे त्याचबरोबर अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोअरच्या उभारणीला वेग देण्यात येत आहे. नुकतेच महाराष्ट्रात सुमारे ८० हजार कोटींच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी देखील प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

००००


Wednesday, 21 August 2024

उद्योग, पर्यटनाला चालना

उद्योग, पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ महत्त्वाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन रत्नागिरी, दि. 21 : उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात तयार करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे आणि कोनशिलेचे अनावरण करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, मिरजोळे सरपंच रत्नदिप पाटील, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामाच्या कामास आरंभ झाला. नवं दालन तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जगाला टक्कर देणारे इथले पर्यटन आहे. त्यासाठी कनेक्टीव्हीटी खूप महत्वाची आहे. नाईट लँडीगची सुविधा केल्यास परदेशी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे. पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरु राहण्यासंदर्भात सुविधा उपलब्ध कराव्यात. 10 हजार कोटींचे डिफेन्स सेक्टरमधील उद्योग इच्छुक आहेत. उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण चांगले आहे. दावोसमध्ये पाच लाख कोटीचे सामंजस्य करार केले होते. त्यातील 70 टक्के अंमलबजावणी स्तरावर आहेत. उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत आहे. या सर्व विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा शासन देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक नवे उद्योग येत आहेत. निसर्ग सौंदर्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि विमान वाहतूक सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी विमानतळाबाबत बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी टर्मिनल इमारतीसाठी 100 कोटी देण्याचा निर्णय घेतला. गतिमान पद्धतीने सर्व परवानग्या मिळाल्या. दीड वर्षात हे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करताना टर्मिनलवर बांबूपासून बनविलेले फर्निचर सर्वत्र पहायला मिळेल, असेही ते म्हणाले. 000

Featured post

Lakshvedhi