Thursday, 22 August 2024

जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध

 जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

§  पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश

§  जलजीवन मिशन अंतर्गत धुळेनाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी

            मुंबईदि. २१ : जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावावी. जलजीवन मिशन अंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

            विविध जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील कामांच्या  स्वतंत्र आढावा बैठका मंत्रालय येथे झाल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आमदार विक्रम सावंत यांच्यासह प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाकार्यकारी अभियंता श्रीमती पलांडेकार्यकारी अभियंता विजय वाईकरएस सी निकम,  यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

             पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी पाणीपुरवठा योजनातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु कामांविषयी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांची दखल  घेतली. श्री पाटील म्हणालेसांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत जत 29 गावांसाठी सुरू असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये निधी मंजूर आहे. 29 गावांपैकी ज्या गावांना शाश्वत स्रोत नाहीत त्या गावांसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे पूर्ण होण्यासाठी गती दिली जावी. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून बाबी निश्चित कराव्यात. ग्रामपंचायतीकडून स्वीकृती व लोकवर्गणी ठरावाबाबत अडचण येणाऱ्या गावातील अडथळे दूर करण्यात यावे असे सांगितले.

         यावेळी श्री. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील  कापडणेसोनगीरबेटावद मसदी सामोडे आणि  जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या  जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. शिथिलता आलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी सतत भेट देऊन वेळेत कामे व्हावी त्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

         शिंदखेडा व येवला तालुक्यातील कामांची स्थिती असमाधानकारक असून शिंदखेडा येथील काम सहा महिन्यापासून बंद आहेयाबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावून  पुढील कारवाई करण्याचेनिर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

            सोनगीर येथील काम या महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. तर मसदी येथील दोन तीन महिन्यात पूर्ण होईल. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 560 कामे पूर्ण झाले असून "हर घर नल से जल" साठी घोषित करण्यात आली आहे यापैकी 104 कामे प्रमाणित झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi