Tuesday, 20 August 2024

राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

 राज्यपालांनी केली इंदू मिल येथील निर्माणाधीन

डॉ.आंबेडकर स्मारकाची पाहणी

 

            मुंबईदि. २० :  राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल कंपाऊंड येथे निर्माण होत असलेल्या भव्य स्मारकाची पाहणी केली.

            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले. डॉ.आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक ही त्यांना यथोचित आदरांजली असून या स्मारकामुळे देश विदेशातील लोकांना डॉ. आंबेडकर यांच्या  कार्याची महती कळेलअसे राज्यपालांनी सांगितले.  डॉ. आंबेडकर यांच्या भव्य स्मारकामुळे भारतीय समाज अधिक सशक्त व एकसंध होण्यास मदत होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सुरुवातीला केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

            मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे वेळी राज्यपालांनी स्मारकाच्या निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्मारकामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा तसेच स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

            इंदू मिल येथील भव्य स्मारक हा संपूर्ण हरित परिसर असेल तसेच तेथे ७५० ते ८०० मोठी झाडे लावण्यात येणार आहे. या ठिकाणी १००० व्यक्तींची आसन क्षमता असलेले सभागृहचवदार तळ्याचे प्रतिरूप तळे तसेच ध्यानधारणा केंद्रग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

            यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळेभंते डॉ. राहुल बोधीवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे व विजय वाघमारेवास्तुशिल्पकार शशी प्रभूमूर्ती शिल्पकार अनिल सुतार आदी उपस्थित होते.

0000

 

Maharashtra Governor reviews progress of

Dr Ambedkar Memorial at Indu Mill Compound

 

            Mumbai Dated 20 : Maharashtra Governor C P Radhakrishnan visited the Grand Memorial of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar at Indu Mills Compound in Mumbai and reviewed the progress of its construction on Tue (20 Aug).

            Union Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale, Maharashtra's Minister for Youth Affairs and Sports Sanjay Bansode, senior government officers, Nagsen Kamble, Bhante Dr Rahul Bodhi and others were present.

0000


 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि.२० : महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्वाचा मानण्यात आला आहे. युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्रसन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. १०,०००/- व नोंदणीकृत संस्थेस गौरवपत्रसन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. ५०,०००/- असे आहे.

            अधिक माहिती विहीत नमुन्यातील अर्ज व माहिती तसेच शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१३१११२११२२०४३३२९ या संगणक संकेतांकावर उपलब्ध आहे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जावरील लिंकवर सोबतच्या संकेतांकावरील शासन निर्णयात शेवटी उपलब्ध आहे. २० ऑगस्ट ते १८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रतआवश्यक ती छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली)तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यातच या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरशारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसमता नगरकांदिवली, मुंबई येथे १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करावे.

            अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरीता मूल्यांकन करण्यात येणार आहे. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य  १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील पुरस्कार वर्षाच्या गत तीन वर्षामध्ये केलेले कार्य व कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्यराज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्यसमाजातील दुर्बल घटकअनु-सूचीत जातीजमातीजनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्यशिक्षणप्रौढ शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसांस्कृतिककलाक्रीडामनोरंजनविज्ञानतंत्रज्ञानव्यवसायमहिला सक्षमीकरणस्त्रीभूण हत्याव्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले कार्यराष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्यनागरी गलिच्छ वस्ती सुधारणाझोपडपट्टीआपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्यामहिला सक्षमीकरण इ. बाबत कार्यसाहस इ. बाबतचे कार्य यानुसार मूल्यांकन होवून जिल्हास्तर युवा पुरस्कार २६ जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी केले आहे.

जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे

 जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे

जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. २० : क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्यपुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांचे द्वारा सन २०२३-२४ या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुषमहिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

            जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटूक्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे / योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२२-२३ या वर्षाकरिता गुणवंत क्रीडापटू (पुरुषमहिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कार पात्रतेचे निकष

            (ब) क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (१) पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष संबंधित जिल्ह्यामध्ये वास्तव्य असावे. वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत, सतत १० वर्ष क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य केलेले असावे. गुणांकनाकरिता त्या जिल्ह्यातील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. (४) गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेयग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मधील राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील, असे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी पात्र ठरतील.

            (ब) खेळाडू पुरस्कार (पुरुष महिला आणि दिव्यांग) : (१) खेळाडुने पुरस्कार वर्षासह लगत पूर्व ५ वर्षापैकी २ वर्ष त्या जिल्ह्याचे मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. (२) खेळाडूंची मान्यता प्राप्त खेळाच्या अधिकृत राज्य / राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमधील पुरस्कार वर्षालगत पूर्व पाच वर्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वरीष्ठ / कनिष्ठ शालेयराष्ट्रीय शालेय व केंद्रशासनामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धामधील राष्ट्रीयस्तरावरील कामगिरी आणि या पैकी उत्कृष्ट तीन वर्षाच्या कामगिरीचा विचार करण्यात येईल.

            वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयशासकीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसंभाजीनगर समोरआकुर्ली रोडकांदिवली (पुर्व) मुंबई ४००१०१ येथे पृष्ठांकीत करुनच आणि सीलबंद पाकीटामध्ये सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२/ २८८७११०५ या वर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क रहावे

 मंकीपॉक्सला घाबरू नकासतर्क रहावे

आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

            मुंबईदि. २० जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.  त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

            मंकीपॉक्सच्या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनेनुसार  केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध  व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळेबंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणेचाचणी प्रयोगशाळा तयार करणेतपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणेमंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात याचा सामावेश आहे. यानुसार राज्याने याबाबत सर्वेक्षणप्रतिबंधक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे

- आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक

            मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न  जाता नागरिकांनी सतर्क रहावे व सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावाअसे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक यांनी केले आहे.

            मंकीपॉक्स या आजाराविषयी काळजी घेण्यात येत असून जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षणप्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आरोग्य उपसंचालकआरोग्य अधिकारीमहापालिकांचे आरोग्य अधिकारीजिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सक यांनाही आयुक्त श्री. नायक यांनी निर्देश दिले आहेत.

*मंकीपॉक्स म्हणजे काय?*

            मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यतबाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे कीथेट शारीरिक संपर्कशरीर द्रवलैंगिक संपर्क किंवा जखमघाव यातील स्रावबाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडयांमार्फतजर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबा वाटे संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणेप्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

*संशयित रुग्णाची लक्षणे –*

•          मागील ३ आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे

•          सुजलेल्या लसिका ग्रंथी

•          ताप

•          डोकेदुखी

•          अंगदुखी

•          प्रचंड थकवा

•          घसा खवखवणे आणि खोकला

*मंकीपॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी-*

•          संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे.

•          रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुणा पांघरुणाची संपर्क येऊ न देणे.

•          हातांची स्वच्छता ठेवणे.

•          आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे.

• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे.

००००

बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित करणार -

 बांबू लागवडीसाठी मानवविरहित यंत्र विकसित  करणार

- मुख्यमंत्री  पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल

 

            मुंबई,दि.२०: बांबू लागवडीसाठी  खड्डे खोदणे व बांबू  कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे  कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले. कृषी मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सच्या बैठक झाली.

      डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रायव्हेट लिमिटेडचे वेंकट राव,ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.

        अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले कीराज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रीक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात  फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो.मात्र या इलेक्ट्रीक टूल बार या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. तसेच या यंत्रासोबत बांबू  कापण्यासाठी मनुष्यबळ  देखील आवश्यकता आहे हे लक्षात घेवून यामध्ये डॉ.भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत  अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठी  देखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे जेणेकरून कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात हे काम करता येणे शक्य होणार आहे, अशा सूचनाही श्री.पटेल यांनी यावेळी केल्या.

००००

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडवण्यात याव्यात

  

पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या

मानवतेच्या दृष्टिकोनातून तातडीने सोडवण्यात याव्यात

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. २० :- पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक नियमितपणे येत असतात. येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे शहरातील साफ-सफाईबरोबरच हाताने मैला उचलण्याचे काम केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार नियुक्ती देण्यात यावी. त्यासंदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासणीसाठी विशेष शिबिर घेण्यात यावेअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या.

            पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरागृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहविभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)नगर परिषद प्रशासनाचे संचालक मनोज रानडेपंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधवसफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेनगरपरिषदेतील ३६२ पात्र सफाई कर्मचाऱ्यांना योग्य क्षेत्रफळाची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाच्या सचिवांनी संबंधित विषयाबाबत बैठक घेऊन योग्य तोडगा काढावा. नागरी हिवताप प्रतिरोध योजनेतील कार्यरत अस्थायी पदे पुढे कार्यरत ठेवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने करावी. पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या १६ पात्र वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे. तथापि प्रलंबित ६६ वारसांना नियुक्ती प्रकरणी अर्जदारांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. या ६६ वारसांबाबत पुन्हा निर्णय घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष शिबिराचे आयोजन करुन वारसांकडील कागदपत्रे आणि नगरपालिकेकडील कागदपत्रे तपासण्यात यावीतअसे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

------०००-----


 

लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा


            मुंबईदि. २०:- पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचापर्यटकांचा विचार करून खंडाळा भागाकरिता ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

            लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळकेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरागृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लानगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ताडॉ. के.एच. गोविंदराजसार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखेवीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रानगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी सुहास दिवसेपुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणालेभांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीने करण्यात यावे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहाय्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरु करावीअसे निर्देश त्यांनी दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीलोणावळा शहरातील दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या मालमत्तांची मुदत संपली आहे. मात्रलिजधारकांनी परस्पर मालमत्ता विकल्याचे निर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर या मालमत्तांबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून त्या नियमित करण्याबाबत मार्ग काढण्यात यावा. शहरातील स्थानिक रिक्षाटॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही यादृष्टीने ओलाउबर यासारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीमध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावे. औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या सोडविण्यासाठी एक्प्रेस फीडर देऊन प्रश्न मार्गी लावावा. अधिसंख्य पदांची निर्मिती करुन नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगारांच्या वारसांना वर्ग चार च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

            लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास रस्ते विकास महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची ६.५ गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करुन सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi