Wednesday, 14 August 2024

इचलकरंजी शहरातील प्रलंबित योजनांची कामे तातडीने मार्गी लावून पाणी पुरवठा योजनेचे काम प्राधान्याने करा -

 इचलकरंजी शहरातील प्रलंबित योजनांची कामे तातडीने मार्गी लावून

पाणी पुरवठा योजनेचे काम प्राधान्याने करा

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 14: इचलकरंजी शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. इचलकरंजीकरांना दिलासा देण्यासाठी शहरासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या योजना तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहराची पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            इचलकरंजी (जि. कोल्हापूर) शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफवस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटीलआमदार प्रकाश आवाडेमाजी आमदार आसिफ शेख रशीद शेखनियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरावित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्तापाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,  वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटेविठ्ठलराव चोपडेइचलकरंजी यंत्रमागधारक कृती समितीचे चंद्रकांत पाटीलप्रकाश गौडेरफिक खानापुरेसुभाष मालपाणीइचलकरंजी रायझिंग को. ऑप सोसायटीचे पांडुरंग धोंडेपुडेप्रल्हाद शिंदेदिलीप ढोकळेहर्षल पटनावरतौफिक मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले कीइचलकरंजी शहरातील मिळकत धारकांचा शास्तीकर रद्द करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहराच्या धर्तीवर शास्तीकर माफीचा निर्णय घेण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी तपासून घेण्यात याव्यात. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करुन तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात यावा. इचलकरंजी शहरात असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन त्याच जागेवर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्यासोबतच इचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत. यंत्रमाग धारकांना कर्जावरील व्याजावर पूर्वीप्रमाणे रायझिंग (वॉर्पिंक) उद्योगांना देण्यात येणारी पाच टक्के व्याज सवलत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Tuesday, 13 August 2024

डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

 डेक्कन कॉलेजगोखले संस्थाटिळक महाराष्ट्र

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना

            डेक्कन कॉलेजगोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थाटिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

या तीनही संस्था शासनाच्या अधिपत्याखालील अभिमत विद्यापीठे आहेत. त्यामुळे शासनाच्या अनुदानित महाविद्यालयांना लागू असलेली वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना त्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-----०----- 

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार १४९ कोटीस मान्यता

 विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार

१४९ कोटीस मान्यता

 

            विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

            यासाठी  १४९ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

            विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूरभंडाराचंद्रपूरगोंदियावर्धाबुलढाणायवतमाळवाशिमगडचिरोलीअमरावतीअकोलाछत्रपती संभाजीनगरबीडहिंगोलीजालनानांदेडलातूरधाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येईल.  यापूर्वी २०१६ मध्ये हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला होता. या प्रकल्पात गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रृण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणेशेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रमसंतुलित आहार आणि दर्जेदार चारा पुरवठा करणेपशु आरोग्य सुविधा पुरविणेउच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करणेशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगार निर्मिती देखील करणे अशी उद्दिष्टे आहेत.

            या ३ वर्षांच्या कालावधीत या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येईल. या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील.

-----०-----

Monday, 12 August 2024

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी “लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी” चा वापर उपयुक्त ठरणार

 मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी

लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी चा वापर उपयुक्त ठरणार

 

            ठाणेदि. 09 (जिमाका) : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठीचे लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी हे तंत्रज्ञान दीर्घकाळ टिकावू असल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहेअशा सर्व ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी चा वापर करुन बुजविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर ठाणे-नाशिक महामार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीतअसे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना आज येथे दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज ठाणे- नाशिक महामार्गावरील खारेगाव ते पडघातळवली ते शहापूर या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होण्याची कारणे पाहण्यासाठी तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात होत असलेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते  बोलत होते. 

            यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ रावएमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जीजिल्हाधिकारी अशोक शिनगारेएमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल गायकवाडपोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामीवाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोडमहामार्ग सुरक्षा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकरपोलीस उपायुक्त एस.व्ही.शिंदेरस्ते वाहतूक व महामार्ग मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तवएमएमआरडीए मुख्य अभियंता एस.के.सुरवसेअधीक्षक अभियंता रमेश किस्तेभारतीय राजमार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक बी.एस.साळुंकेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.ए.तांबेकार्यकारी अभियंता सुनिल पाटीलयांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीठाणे-नाशिक हे अंतर पार करण्यासाठी सध्या नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. या मार्गावरील खडड्यांमुळे तसेच येथील अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सार्वजनिक बांधकाममहाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणएमएमआरडीएपोलीस या संबंधित विभागांची बैठक घेऊन यामध्ये अवजड वाहने पार्किंग लॉट मध्ये पार्क केल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात यावी. जेव्हा ट्राफिक कमी होईल तेव्हा अवजड वाहने सोडण्यात येतीलअशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रकारे जेएनपीए येथून येणाऱ्या वाहनांसंबंधी रायगडठाणे व पालघर या तीनही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

            समन्वयाने वाहतुकीचे नियमन होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम साहित्य टिकत नाही. त्यामुळे  हे खड्डे बुजविण्यासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड च्या अभियंत्यांनी शोध लावलेल्या लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये फायबर आहे. यावरुन अवजड वाहने सुध्दा जावू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन या महामार्गावरील मोठे मोठे पॅच भरुन काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ठाणे-नाशिक व नाशिक-ठाणे या संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम या तंत्रज्ञानानेच करण्यात येणार आहे. ही पध्दत टिकावू आहे. त्यामुळे लोकांना प्रवासात खड्ड्यांचा त्रास होणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

             या कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावीअसे संबधितांना निर्देश देवून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीसर्वांनी टिम बनून हे काम पूर्ण करायचे आहे. नवीन  तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकांना सुलभ प्रवास करण्यासाठी सहकार्य करायचे आहे. जिंदालवाशिंदआसनगाव रेल्वेपूल या सर्व पुलांवर या पध्दतीचा वापर करणार आहोत. भिवंडी आणि माणकोली मार्गावरील खड्डेही भरण्यात येणार आहेत. भविष्यात खडवली फाटा येथे पूल तयार होणार आहेत्यामुळे येथील वाहतूक कोंडीदेखील कमी होईल. मनुष्यबळ आणि यांत्रिक सामुग्री यांचा जास्तीत जास्त वापर करुन हे रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

००००


हजारोंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा साजरा प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

 हजारोंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा साजरा

 

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वांच्या हिताचा डीपी प्लॅन’ करण्याची दिली ग्वाही

 

          छत्रपती संभाजीनगर दि.११  - येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताकसार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. जब तक सुरज चांद रहेगाबाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावात्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईलअशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.  तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाहीही त्यांनी शहरवासियांना दिली.

 

          छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात  अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयेभडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपयेटीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी पाच कोटी रुपयेडॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपयेडॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डीजीटल प्रोजेक्टसाठी  २५ कोटी रुपयेतारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना  निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्री श्री. ‍शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

 

          या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवराज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तारगृहनिर्माण मंत्री अतुल सावेखासदार संदिपान भुमरेआमदार प्रदीप जयस्वालसंजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते. 

          प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 

कृतज्ञता महामानवाप्रति

          मुख्यमंत्री म्हणाले कीआज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो.  पणकृतज्ञता व्यक्त करण्यासारखे कोणतेही काम मी केलेले नाही. मी जे काही करतोय ते माझे कर्तव्य आहे आणि इथे जी काही कामे होत आहेत तो तुमचा तो अधिकार आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत कीबाबासाहेबांसारखे मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण या महामानवा प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहेया भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होतीअशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीआज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असं बुद्ध विहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय, रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्टतारांगण सेंटरमागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करणे असे विविध उपक्रम आपण राबवत आहोत. यातून प्रेरणा मिळावी हा आपला हेतू आहे. 

संविधानाबद्दल गौरवोद्गार

          बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताकसार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नकाअसे सांगून जब तक सुरज चांद रहेगाबाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला. 

महाराष्ट्र माझा परिवार

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीहे सरकार दुर्बलमागासकष्टकरीकामगारगरिबांचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनायुवा कार्य प्रशिक्षणवर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सुरू केली. मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत केले. दुर्बलांना मदत करणेत्यांचे जीवन आनंदी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र हा माझा परिवार आहेअशा शब्दांत त्यांनी उपस्थितांबद्दल आपुलकी व्यक्त केली. 

          त्यांनी सांगितले कीमुंबईत इंदू मिल इथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली. बार्टीसारथी, महाज्योती, अमृतटीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधीश्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवले. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत.  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळलोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीबमागासदुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय, असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

सर्वांच्या हिताचा विकास आराखडा

          त्यांनी सांगितले कीजिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्यावतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलतांना ते म्हणाले कीसर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करुहे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेआ. प्रदीप जयस्वालखासदार संदिपान भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  पंचशिला भालेराव यांनी शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले.या सोहळ्यास मोठ्या संख़्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००००

 

 

 

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी

 कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी 5 हजारांचे अनुदान;

ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी

                                                                    - कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

मुंबई दि. 11 - सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

 

            2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.

 

            सदर रक्कम सोयाबीन- कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहितीकृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

00000

Saturday, 10 August 2024

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत

सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप

पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

               मुंबईदि. 9 : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्रया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावेअसे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावेअसे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

            पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन 2017-18सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

            या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दातेपगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

            पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

000

Featured post

Lakshvedhi