Tuesday, 13 August 2024

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार १४९ कोटीस मान्यता

 विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार

१४९ कोटीस मान्यता

 

            विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा टप्प्पा-२ राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 

            यासाठी  १४९ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  प्रकल्पाची एकूण किंमत ३२८ कोटी ४२ लाख इतकी असून यापैकी १७९ कोटी १६ लाख हिस्सा हा शेतकरी आणि पशुपालकांचा आहे. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स करण्यामध्ये शेती व शेतीपूरक व्यवसायांचा समावेश असून यामध्ये दुग्ध व्यवसायाचा देखील वाटा आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

            विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूरभंडाराचंद्रपूरगोंदियावर्धाबुलढाणायवतमाळवाशिमगडचिरोलीअमरावतीअकोलाछत्रपती संभाजीनगरबीडहिंगोलीजालनानांदेडलातूरधाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येईल.  यापूर्वी २०१६ मध्ये हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यातील ११ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला होता. या प्रकल्पात गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची व्यवस्था तसेच भ्रृण प्रत्यारोपण करून दुधाळ जनावरांची संख्या वाढविणेशेतकऱ्यांना वैरण विकास कार्यक्रमसंतुलित आहार आणि दर्जेदार चारा पुरवठा करणेपशु आरोग्य सुविधा पुरविणेउच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करणेशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून रोजगार निर्मिती देखील करणे अशी उद्दिष्टे आहेत.

            या ३ वर्षांच्या कालावधीत या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ गाई आणि म्हशींचे वाटप करण्यात येईल. या प्रकल्पाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी याची अंमलबजावणी करतील.

-----०-----

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi