Saturday, 15 June 2024

रोजगार निर्मितीसाठी महिला बचतगटांकडून गणवेश शिलाई माविमच्या बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न

 रोजगार निर्मितीसाठी महिला बचतगटांकडून गणवेश शिलाई

माविमच्या बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न

                                             -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

             मुंबईदि.15 महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळच्या (मविम) बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

            केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलीअनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुलेतसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुलेयांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

  

            गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात याची संख्या काढून त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे.

            आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेश  वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे  मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत झाली, तसेच महिलांना मोठ्या प्रमाणत रोजगार प्राप्त होत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

0000

नमो स्तुते


 

वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी एल.अँड टी. कंपनीमार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत; कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी मिळणार

 वर्सोवा पुलाखाली झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

एल.अँड टी. कंपनीमार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत;

कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी मिळणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            पालघरदि. 14 :- सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एम.एम.आर.डी.ए.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनीमार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला एल. अँड टी. कंपनीमध्ये नोकरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            यावेळी घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडकेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) चे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जीवसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवारमिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेमिरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठकजिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीतसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

            सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा-भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसिबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबीसह ढिगाऱ्याखाली अडकले असूनत्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी भारतीय नौसेना (Navy), भारतीय लष्कर (Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल – (NDRF)ठाणे आपत्ती प्रतिसाद दल- (TDRF)अग्निशमन दलाच्या तुकड्यांना बोलवण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनही घेण्यात येत आहे.

            घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीभारतीय नौदल व भारतीय लष्करातील जवानांना बचाव कार्याचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून या दुर्घटनेतील व्यक्तीला बाहेर काढण्यास यश मिळेल. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला एल  अँड टी. कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगीतले. यावेळी राकेश यादव यांच्या पत्नीदोन मुलीएक मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.बोडके यांना दिल्या.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या

 लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई दि. १४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनालाभ घेण्यासाठी अर्ज करावेतअसे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

   सन २०२४-२५ या वर्षाकरिता दि. ११ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागासवर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती करीता इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यास वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे.

     याबाबत अधिक माहितीसाठी सहायक संचालकइतर मागास व बहुजन कल्याण विभागमुंबई उपनगर कार्यालय४ था मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई-४०००७१ या पत्त्यावर संपर्क साधावा,असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे -

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे

जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मतदान प्रक्रिया व कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण

 

            मुंबई दि १४ :- निवडणूक प्रक्रियेसंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडावीत, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रथम प्रशिक्षण विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले.

प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे

            जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणालेनिवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे असून आपल्याकडील जबाबदारी संदर्भातील प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे. आयोजित करण्यात आलेली सर्व प्रशिक्षणे संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांना बंधनकारक असल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

            यावेळी मतदान प्रक्रियाकर्तव्येमतदान अधिकाऱ्यांची कामेमतदान केंद्र उभारणीमतदानासाठी मतपेटी तयार करणेमतपत्रिका तसेच मतदान कार्यपद्धती यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.

दुसरे प्रशिक्षण 21 जून रोजीप्रशिक्षणास उपस्थिती बंधनकारक

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारी क्र. १व ३ चे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरे प्रशिक्षण 21 जून रोजी तर तिसरे प्रशिक्षण मतदान साहित्य स्वीकारताना 25 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे -जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय

 निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे

-जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव

 

            मुंबईदि.१४ : विधानपरिषदेच्या मुंबई  पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठीचे मतदान 26 जून 2024  रोजी सकाळी 7 ते सांयकाळी 6 या वेळेत पार पडणार आहे. निवडणूक प्रशिक्षण घेताना निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेऊन दक्षतापूर्वक पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे व आदेशाचे तंतोतंत पालन करावेअशा मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  संजय यादव  यांनी  दिल्या.

            मुंबई शिक्षक व पदवीधर विधानपरिषद  निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्य सभागृहात निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण आज पार झाले.

            मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती अंशु सिन्हा (भाप्रसे) यांची तर शिक्षक मतदार संघासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर (भाप्रसे) यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही निरीक्षकांनी  आज प्रशिक्षणस्थळी भेट देऊन  मार्गदर्शन केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी  फरोग मुकादम आणि मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून हिंदीइंग्लिश आणि मराठी या  भाषेत प्रशिक्षण दिले.

             पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्यावेळी  केंद्रप्रमुख, मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी  मतदानाच्या दिवशी पार पाडावयाची जबाबदारीमतदान कक्षाची रचना कशी असेलमतदान कक्षाचा प्रोटोकॉल कसा पाळावामतपेटीचा वापर कसा करावामतपत्रिकाशाईचा वापरस्केच पेन उपयोग यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावामतदान  प्रक्रियामतदारांची कोणती ओळखपत्रे तपासण्यात यावीतनिवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी  प्रात्यक्षिक  सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.  या प्रशिक्षणाला मुंबई उपजिल्हाधिकारी ( निवडणूक)  श्यामसुंदर  सुरवसेसर्व संबंधित अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवावी

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणेदि. १४ : महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन निविदा प्रक्रिया गतीने राबवावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.

पुणे विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारमहानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेमनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारेमुख्य अभियंता (बांधकाम) युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळात्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्थावरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंगकार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याचबरोबर वरील मजल्यावर मुलीमहिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावीअसे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि मंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

स्मारकासाठी सभोवतालच्या भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्यादृष्टीने गतीने काम करावेअशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा

सन १९९२ साली पुणे शहारातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण करून ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे. हे स्मारक व त्याच्या परिसराचे नुतनीकरण व जतन करण्यासाठी आवश्यक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  करण्यात आलेली आहेत.

या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरू यांना मोबदला यासाठी भूमीसंपादनाची आवश्यक तेवढ्या रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. त्यास तात्काळ मान्यता देण्यात येईलअसेही श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi