Saturday, 15 June 2024

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे -

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे

जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मतदान प्रक्रिया व कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण

 

            मुंबई दि १४ :- निवडणूक प्रक्रियेसंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये व्यवस्थितपणे पार पाडावीत, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

            भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रथम प्रशिक्षण विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले.

प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे

            जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणालेनिवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडणे गरजेचे असून आपल्याकडील जबाबदारी संदर्भातील प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे. आयोजित करण्यात आलेली सर्व प्रशिक्षणे संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांना बंधनकारक असल्याचेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

            यावेळी मतदान प्रक्रियाकर्तव्येमतदान अधिकाऱ्यांची कामेमतदान केंद्र उभारणीमतदानासाठी मतपेटी तयार करणेमतपत्रिका तसेच मतदान कार्यपद्धती यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.

दुसरे प्रशिक्षण 21 जून रोजीप्रशिक्षणास उपस्थिती बंधनकारक

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्षमतदान अधिकारी क्र. १व ३ चे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरे प्रशिक्षण 21 जून रोजी तर तिसरे प्रशिक्षण मतदान साहित्य स्वीकारताना 25 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi