Saturday, 15 June 2024

राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारणार

 राज्यातील 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारणार

-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई14 : राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले तरी अनेक विभागात अद्यापही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने 1245 महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने परवानगी दिल्याची माहिती महसूल तथा पशुसंवर्धनदुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून जनावरांचे पालन करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असा विश्वास मंत्री श्री.विखे पाटील त्यांनी व्यक्त केला.

            जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तथापि पावसाचे प्रमाण अद्यापही समाधानकारक नसल्याने अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या राज्यात 512.58 लाख मेट्रिक टन हिरवा चारा तर 144.55 लाख मेट्रिक टन सुका चारा उपलब्ध आहे. हा चारा जूनपर्यंत पुरेल असा अंदाज शासनाकडून व्यक्त केला आहे. चाऱ्याचे प्रमाण कमी होत असताना शेतकऱ्यांना आणि पशूपालकांना जनावरांचे पालन पोषण करताना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी 31 ऑगस्ट पर्यंत किंवा पावसाचे प्रमाण समाधानकारक होईपर्यंत दुष्काळ सदृश्य भागात चारा डेपो उभारून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या पर्जन्यमान आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला मान्यता देऊन शासन निर्णय जारी करण्याचे निर्देश दिले होते.

            मंत्री श्री. विखे पाटील यांनी राज्यशासन नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहील, असे यावेळी सांगितले.

०००००

 निधीची तरतूद वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी

2007 मध्ये वक्फ़विषयक संयुक्त संसदीय समितीच्या सूचनेनुसार

तत्कालीन राज्य शासनाचा निर्णयनिधीची तरतूद वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी

2007 मध्ये वक्फ़विषयक संयुक्त संसदीय समितीच्या सूचनेनुसार

तत्कालीन राज्य शासनाचा निर्णय

            मुंबई, दि. 14 केंद्र शासनाच्या वक्फ़ विषयक संयुक्त संसदीय समितीने 2007 मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना 2011 पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो.  यावर्षी देखील 10 कोटींच्या तरतुदीपैकी  2 कोटी निधी हा मागणीप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारीमहाराष्ट्र राज्य वक्फ़ मंडळछत्रपती संभाजीनगर यांना  वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            केंद्र शासनाद्वारे देशात वक्फ़ कायदा 1995 लागू करण्यात आलेला या कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ़ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. वक्फ़ मंडळ हे वैधानिक मंडळ असून राज्यातील  वक्फ़ मालमत्ता संबंधित कामकाजाचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी वक्फ़ मंडळावर आहे. ज्याप्रमाणे राज्यांमधील धर्मादाय संस्थांचे संनियंत्रण धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात येतेत्याचप्रमाणे राज्यातील वक्फ़ संस्थांचे सनियंत्रण राज्य वक्फ़ मंडळामार्फत करण्यात येते. वक्फ़ मालमत्ता या  दान स्वरूपात दिलेल्या  मालमत्ता असून सदर मालमत्तांच्या उत्पन्नातून गोरगरीबगरजू लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी वक्फ़ मंडळाची आहे. लाभार्थ्यांमध्ये मुस्लिमेत्तर लोकांचा देखील समावेश असतो. तथापि वक्फ़ मंडळाचे प्रशासन अधिक सक्षम व बळकट व्हावे  यासाठी राज्य शासनाद्वारे 2011 पासून उपरोक्त योजना सुरू केलेली आहे.

            राज्यात अल्पसंख्याक विकास विभाग कार्यरत असून अल्पसंख्याक नागरिकांना उच्च शिक्षण देणेत्यांना रोजगारांच्या संधीकौशल्य विकासविविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न विभागाद्वारे कायम सुरू असतात. त्यांच्या सामाजिकआर्थिकशैक्षणिकसांस्कृतिक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेत असतात.

००००

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

            मुंबई, दि. १४ :- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार२७ जून ते शुक्रवार १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

            विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

            या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्यविधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

            पावसाळी अधिवेशन २७ जून ते शुक्रवार१२ जुलै २०२४  या कालावधीत होणार असूनएकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणेदि. १४ : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूरपालखी मार्गपालखी तळ आदी ठिकाणी पाणीवीजआरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यातअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही सांगितले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री दिलीप मोहिते पाटीलसंजय जगतापदत्तात्रय भरणेसमाधान अवताडेबबन शिंदेसंजय शिंदेसुनील कांबळेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत  पुलकुंडवारपोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपीएमआरडीए आयुक्त राहुल महिवालपुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीपालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.

इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टीने विभागीय आयुक्तांकडे  बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतीलअशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल मात्र दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहे. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहेअसे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.

०००००

Friday, 14 June 2024

आदित्य केअरटेकर ब्युरो*(परेल)

 *आदित्य केअरटेकर ब्युरो*(परेल)

मुंबई मध्ये ज्येष्ठ नागरिक व रुग्णांसाठी घरी येऊन त्यांची सेवा करण्यासाठी आता *आदित्य केअरटेकर ब्युरो*

मुंबई, ठाणे,बोरिवली, नवी मुंबई मध्ये शहरवासीयांच्या सेवेत सुरू केले आहे. 

तसेच *रूग्णसेवे मध्ये* केले जाणारी कामे

१) डाईपर बदली करणे

२) युरीन बॅग रिकामी करणे

३) आंघोळ घालणे / अंग पुसून घेणे

४) नाश्ता व जेवण बनवणे आणि भरवणे

५) वेळेवर औषधं देणं

६) व्यायाम करून घेणे (डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार)

७) वरिष्ठ नागरिकांची देखभाल

८) रुग्णसेवे मधील इतर संबंधित कामे

या करीता *12 तास, 24 तास रुग्णसेवेसाठी आया व वॉर्डबॉय मिळेल*

*आदित्य केअरटेकर ब्युरो* मध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना / रुग्णांना घरी अथवा रुग्णालयात 12 तास (दिवस/रात्र) किंवा 24 तास  तसेच दवाखान्यात रुग्णाजवळ थांबणे आणि त्यांची सेवा करणे व त्यांची पूर्णपणे काळजी घेणे अशी  *"अत्यंत वाजवी दरात" सेवा सुरु केली आहे* 

*घरी आणि हॉस्पिटल मध्ये नर्सिंग स्टाफ GNM/ANM ( स्त्री / पुरुष ) ची सेवा दिली जाते.*

आदित्य केअरटेकर ब्युरो मध्ये प्रशिक्षित असे अनुभवी कर्मचारीवर्ग आहे जो काळजीपूर्वक सेवा करेल व त्यांना आनंदी ठेवेल.

आमच्याकडील सर्व स्टाफ चे आधारकार्ड, पॅनकार्ड व आरोग्य तपासणी करुनच आम्ही सेवा पुरवितो *"तरी जास्तीत जास्त लोकांना  माहिती व्हावी यासाठी आपण आपल्या सर्व ग्रूप व आपले मित्र परिवारात हा मेसेज पाठवावा व या सेवेचा जास्तीत जास्त"* लोकांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या लोकांची खऱ्या अर्थाने काळजी घेतल्याचे समाधान मिळवावे ही नम्र विनंती. 

*ज्याना कोणालाही सेवेकरी (Care Givers) पाहिजे असल्यास खालील फोन वर संपर्क साधावा* :

 +91 7021974798 - संजय तवटे 

 +91 8291475736 - जान्हवी तवटे

*ऑफिस पत्ता:*

आदित्य केअरटेकर ब्युरो 

कोंडाजी चाळ-५, ३०/२रा मजला, जेरबाई वाडिया मार्ग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल शेजारी, रंजना हॉटेलच्या बाजूला, भोईवाडा परेल - ४०००१२

*अनुभवी आया आणि वार्डबॉय व नर्सेस (स्त्री व पुरुष) यांच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे कृपया वर दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा*

कृपया जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत  मेसेज पोहचवुन गरजावंताचा आशिर्वाद घ्या

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा

 आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पुणेदि. १४ : आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करावेअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विधानभवन पुणे येथे झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेमनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारेमुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व असून त्यांचे स्मारकही समाजाला प्रेरणा आणि लाभ देणारे व्हावे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी. काम सुरू असतानाच पुतळा तयार करणाऱ्यांकडेही मागणी नोंदवावी. लहुजी वस्ताद यांच्या कार्याची माहिती देणारे प्रसंग साकारण्याची व्यवस्थाकौशल्य विकास प्रशिक्षणवसतिगृह आदी कामे गतीने आणि दर्जेदार करावीत. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाहीअसेही श्री.पवार म्हणाले.

स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगले वकील नेमावेत. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

०००००

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

 पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणेदि. १४ : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूरपालखी मार्गपालखी तळ आदी ठिकाणी पाणीवीजआरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यातअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही सांगितले.

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री दिलीप मोहिते पाटीलसंजय जगतापदत्तात्रय भरणेसमाधान अवताडेबबन शिंदेसंजय शिंदेसुनील कांबळेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत  पुलकुंडवारपोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपीएमआरडीए आयुक्त राहुल महिवालपुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीपालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.

इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टीने विभागीय आयुक्तांकडे  बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतीलअशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येईल मात्र दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहे. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहेअसे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.

Featured post

Lakshvedhi