Friday, 14 June 2024

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा

 आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

 

पुणेदि. १४ : आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे शहरात संगमवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. स्मारकाच्या पायांतर्गत सुरू असलेले पायलिंगचे काम जुलैच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करावेअसे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विधानभवन पुणे येथे झालेल्या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेमनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारेमुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे हे सर्वांना प्रेरणा देणारे महान व्यक्तिमत्व असून त्यांचे स्मारकही समाजाला प्रेरणा आणि लाभ देणारे व्हावे. त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामाला गती द्यावी. काम सुरू असतानाच पुतळा तयार करणाऱ्यांकडेही मागणी नोंदवावी. लहुजी वस्ताद यांच्या कार्याची माहिती देणारे प्रसंग साकारण्याची व्यवस्थाकौशल्य विकास प्रशिक्षणवसतिगृह आदी कामे गतीने आणि दर्जेदार करावीत. निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाहीअसेही श्री.पवार म्हणाले.

स्मारकासाठी जागेच्या अनुषंगाने काही अडचणी असल्यास जागेची मोजणी तात्काळ करुन घ्यावी. जागेसंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास महानगरपालिकेने चांगले वकील नेमावेत. त्यासाठी वेळप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता यांचीही मदत उपलब्ध करुन देण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi