Saturday, 1 June 2024

पॅरेलिसीस होऊ नये म्हणून* *मेंदूचा व्यायाम करणे आवश्यक आहे*


 *पॅरेलिसीस होऊ नये म्हणून*

*मेंदूचा व्यायाम करणे आवश्यक आहे*

*हे व्यायाम प्रकार दररोज सर्वानी करावेत*

*आरामशीर हे आपण करू शकतो*

*आपण पण करा & शेअर करा इतर* *लोकांना*

*पण फायदा होईल....*

रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत


सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी


 


            मुंबई, दि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.


             ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.


००००

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहावे लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन

 निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहावे

लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन

 

            मुंबईदि. 31 : अधिदान व लेखा कार्यालयमुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारककुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनसुधारित निवृत्तीवेतनकुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत,  प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच  ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. अधिदान व लेखा कार्यालयकोषागार कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नयेअसे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

            याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनीभ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

            दूरध्वनीभ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईनगुगल पेफोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही.  अशा दूरध्वनीभ्रमणध्वनीला प्रतिसाद देवून  निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहीलयाची नोंद घ्यावी.

            तसेच अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावाअसे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या तयारीचा

 मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या तयारीचा

 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

            मुंबईदि. ३१  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. दि. ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊसगाडी अड्डा येथे सकाळी ०८ वाजेपासून दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

        मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीला '३०-मुंबई दक्षिण मध्यलोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, '३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडमुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुखपोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) संजय लाटकरसहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसेमुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक तथा समन्वय अधिकारी (स्ट्रॉंग रूम) अभिजीत घोरपडेउपमुख्य अग्निशमन अधिकारी संतोष सावंतसहाय्यक समन्वय अधिकारी (वेलफेअर) डॉ. धीरज पगारमुंबई पोर्ट ट्रस्टचे उप वाहतूक व्यवस्थापक आय एस स्वामीबृहन्मुंबई महानगरपालिका व दक्षिण विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरेसार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (विद्युत) नलिनी सुत्रावेबृहन्मुंबई महानगरपालिका फ-दक्षिण विभाग घनकचरा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले कीशिवडी वेअर हाऊसमधील '३०-मुंबई दक्षिण मध्यव '३१-मुंबई दक्षिणया दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी सुमारे ३५०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांसह उमेदवारनिवडणूक मतमोजणी प्रतिनिधीपोलिस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर व केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावीयासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

       मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात अग्निशमन बंबअग्निशामक यंत्रणेने व्यवस्था चोख ठेवावी, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारीबंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस यांच्यासाठी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार करावातसेच त्या ठिकाणी ०४ ॲम्बुलन्स व वैद्यकीय पथक नियुक्त करावे व केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित ठेवावेतवैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकारी नेमण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले.

       बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणचा परिसर मोहीम राबवून तात्काळ स्वच्छ करण्याबाबतची कार्यवाही करावी व मतमोजणी केंद्र परिसरातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावी. मतमोजणी केंद्रावर नियमितसुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहावायाची खबरदारी बेस्ट प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांनी घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

कोणी गायले माहित नाही पण माझ्यापर्यंत आलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं🙏🏻

 कोणी गायले माहित नाही पण माझ्यापर्यंत आलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं🙏🏻


बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे

  

बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान

व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. 31 : देशात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या निवडक चांगल्या संस्था आहेत. परंतु बहुतांशी संस्था सरासरी गुणवत्तेच्या आहेत.  व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी तसेच व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व्हावेया दृष्टीने बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विदेशातून एमबीए पदवी प्राप्त करून युवक तेथेच नोकरी व्यवसायासाठी स्थायी होत असल्यामुळे प्रतिभावंतांचे स्थलांतर होतेया दृष्टीने देशातील व्यवस्थापन शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

            आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा 'के एस बसू जीवन गौरव पुरस्कारथरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्ष व 'टीच फॉर इंडियाकार्यक्रमाच्या संस्थापक अनु आगा यांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री.बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अनु आगा यांना यशस्वी उद्योग व्यवस्थापनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

            कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादवरसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकरमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णीबीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यासह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते.      

             राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जगातील अनेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. परंतुजागतिक दर्जाच्या कंपन्याअकॉउंटिंग - ऑडिट फर्म्सकन्सल्टन्सी फर्म्स भारताच्या का नाहीतया दृष्टीने चिंतन झाले पाहिजे.

            भारतातील महिला गृह तसेच व्यवसायांच्या उत्कृष्ट व्यवस्थापिका असल्याचे सांगून बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यावेतसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळी शाखा निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.     

            अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी अनु आगा यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल राज्यपालांनी असोसिएशनचे तसेच निवड समितीचे अभिनंदन केले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी साहिल गोयलसंस्थापक 'शिप रॉकेटयांना मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द ईअर हा पुरस्कार देण्यात आला तर 'बुक माय शॊ' चे संस्थापक आशिष हेमराजानी यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड पुरस्कार देण्यात आला.

            मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द इयरएक्सल अशुअर्ड एन्टरप्राईस ऑफ द इयर हे पुरस्कार देखील यावेळी देण्यात आले. 'मेट्रोमॅनई. श्रीधरन यांना त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

            बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ माशेलकर यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका विषद केली, तर शैलेश हरिभक्ती यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष 'इ ऍम्बीटडिजिटल प्रकाशनचे उद्घाटन करण्यात आले.   

००००

१June वाढदिवस


 

Featured post

Lakshvedhi