Saturday, 1 June 2024

बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे

  

बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार युवा उद्योजकांना प्रदान

व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. 31 : देशात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या निवडक चांगल्या संस्था आहेत. परंतु बहुतांशी संस्था सरासरी गुणवत्तेच्या आहेत.  व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी तसेच व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व्हावेया दृष्टीने बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विदेशातून एमबीए पदवी प्राप्त करून युवक तेथेच नोकरी व्यवसायासाठी स्थायी होत असल्यामुळे प्रतिभावंतांचे स्थलांतर होतेया दृष्टीने देशातील व्यवस्थापन शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

            आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा 'के एस बसू जीवन गौरव पुरस्कारथरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्ष व 'टीच फॉर इंडियाकार्यक्रमाच्या संस्थापक अनु आगा यांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री.बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अनु आगा यांना यशस्वी उद्योग व्यवस्थापनासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 

            कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादवरसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकरमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णीबीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यासह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते.      

             राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जगातील अनेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. परंतुजागतिक दर्जाच्या कंपन्याअकॉउंटिंग - ऑडिट फर्म्सकन्सल्टन्सी फर्म्स भारताच्या का नाहीतया दृष्टीने चिंतन झाले पाहिजे.

            भारतातील महिला गृह तसेच व्यवसायांच्या उत्कृष्ट व्यवस्थापिका असल्याचे सांगून बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यावेतसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळी शाखा निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.     

            अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी अनु आगा यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल राज्यपालांनी असोसिएशनचे तसेच निवड समितीचे अभिनंदन केले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी साहिल गोयलसंस्थापक 'शिप रॉकेटयांना मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द ईअर हा पुरस्कार देण्यात आला तर 'बुक माय शॊ' चे संस्थापक आशिष हेमराजानी यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड पुरस्कार देण्यात आला.

            मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द इयरएक्सल अशुअर्ड एन्टरप्राईस ऑफ द इयर हे पुरस्कार देखील यावेळी देण्यात आले. 'मेट्रोमॅनई. श्रीधरन यांना त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

            बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ माशेलकर यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका विषद केली, तर शैलेश हरिभक्ती यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष 'इ ऍम्बीटडिजिटल प्रकाशनचे उद्घाटन करण्यात आले.   

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi