Saturday, 1 June 2024

रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

 रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत


सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी


 


            मुंबई, दि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.


             ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi