Sunday, 12 May 2024

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

 राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

            मुंबईदि. 11 - राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

        राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी  जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारीनिवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात  आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहेआदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेआयोगाकडून जिल्हा  राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहेअशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहेराज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशिल खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

         सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणूकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणूकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोटया बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

                                                                  ****

Saturday, 11 May 2024

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट 13 मे रोजी होणार मतदान; 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर

 चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट

13 मे रोजी होणार मतदान; 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचा वापर

            मुंबईदि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

            यात नंदुरबार मतदारसंघामधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिटकंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटजळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटरावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटजालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटऔरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटमावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटपुणेमधील 2018 मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटअहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटबीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

            चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

            राज्यातील चौथ्या टप्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथकेस्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्यईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारांनी मतदान करावे यासंदर्भात जागृतीही करण्यात येत असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

 राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

            मुंबईदि. 11 - राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

        राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी  जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारीनिवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात  आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहेआदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेआयोगाकडून जिल्हा  राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहेअशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहेराज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशिल खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

         सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणूकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणूकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोटया बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

                                                                  ****

दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

 दिलखुलासआणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात 

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

            मुंबईदि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

            ‘दिलखुलास कार्यक्रमात शुक्रवार दि.17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यात असलेले मतदारसंघनिवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाहीमतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारीमतदार जागृतीकायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजनसर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी श्री.यादव यांनी माहिती दिली आहे.

            'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक 

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000000

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत

पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

             मुंबईदि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

            सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास दि.31 मे,2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

0

Featured post

Lakshvedhi