Sunday, 12 May 2024

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

 राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

            मुंबईदि. 11 - राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

        राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी  जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारीनिवडणूक निर्णय अधिकारी/ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात  आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहेआदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेआयोगाकडून जिल्हा  राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहेअशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहेराज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशिल खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

         सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणूकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणूकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा  भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोटया बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

                                                                  ****

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi