Friday, 10 May 2024

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

            मुंबईदि.९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्याह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या  व मागासवर्गवारीत राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्याह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

             उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गाकसाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण(Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

            अंतिम निकालात अर्हताप्राप्त शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहेअशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

0000

Thursday, 9 May 2024

अखेर नियतीने ट्रिगर खेचला..

 *🔴अखेर नियतीने ट्रिगर खेचला...🔴*


 *दक्षिण आफ्रिकेची राजधानी* *केपटाऊन* हे जगातील पहिले पाणी नसलेले शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे कारण तेथील सरकारने *१४ एप्रिल २०२४* नंतर पाणीपुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली आहे.


 तेथे आंघोळ करण्यास मनाई आहे.


 10 लाख लोकांचे कनेक्शन तोडण्याची तयारी सुरू आहे.


 भारतात ज्या प्रकारे पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल खरेदी केले जाते, त्याचप्रमाणे केपटाऊनमध्ये पाण्याचे टँकर असतील जिथे 25 लिटर पाणी उपलब्ध असेल, अधिक पाणी मागणाऱ्या किंवा पाण्याची लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.


जगाचा हा दु:खद प्रवास शेवटी कोणाच्याही वाट्याला येईल, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा.

 पाण्याचा अपव्यय थांबवा रेल्वेने लातूरला (महाराष्ट्र) पाणी पाठवले जात असल्याचेही आपण पाहिले आहे.


 *जगातील फक्त 2.7% पाणी पिण्यायोग्य आहे.*


 *सर्व भारतीयांना नम्र आवाहन*!!

          *👇*

 नजीकच्या सर्व धरणांतील पाणीपातळी घटल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.


एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय थांबवून पाण्याची बचत करू.  तुम्ही ते सहज करू शकता. :-


 1. *रोज कार/बाईक धुवू नका*.

 2. *अंगण/जिने/फरशी धुणे टाळा किंवा धुताना कमीत कमी पाण्याचा वापर करा*.

 3.. *टॅप सतत चालू ठेवू नका.*.

 4. *इतर अनेक चांगले उपाय करून पाणी वाचवा*.

 5. *घरातील गळती नळ दुरुस्त करा.*

 6. *झाडाच्या भांड्यात कमीत कमी पाणी टाका.*

 7. *रस्त्यावर पाणी शिंपडू नका*

8. *पाणी पिताना ग्लासभर घेऊन अर्धा ग्लास पाणी न पिता वाया घालवू नका*


 या संकटाला एकजुटीने सामोरे जाऊया.

 

 *वरील मेसेज 5 ग्रुप वर पाठवा.. यातून काही जादू होणार नाही, पण महत्वाची बातमी पसरवल्याचे समाधान नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या दुष्काळात पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल, चार तहानलेल्या लोकांची तहान भागेल आणि पुढच्या पिढीलाही पाणी मिळेल.*

 *श्री सचिन नामदेव चोरगे 

अध्यक्ष 

कोळी महासंघ रोहा तालुका* 

    🙏🏻🌹🪷🌹🙏🏻

लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडानी बांधून ठेवले की

 लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडानी बांधून ठेवले की हत्ती मोठा झाल्यावर, नुसता साखळदंड त्या खुंटीला अडकवला तरी तो निमूटपणे उभा राहतो. त्याकडे असलेल्या ताकदीने एका दणक्यात तो साखळदंड व खुंटी तोडू शकतो. पण मनात असलेला नकारात्मक विचारच त्याला त्या साखळीचा गुलाम बनवतो. यश हे मनाच्या ताकदीवर अवलंबून असते.

एक हत्ती वर्षानुवर्षे लंगडत चालत होता. खूप उपचारानंतर पण त्याचे लंगडणे थांबले नाही. त्यावेळेस हत्तीचा मालक राजा हर्षवर्धन बुद्धांना भेटला व ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्याचा सल्ला दिला २१ दिवसात हत्ती लंगडण्याचे थांबवून नैसर्गिक चालू लागला. आश्चर्यचकित हर्षवर्धनने बुद्धांना याचे कारण विचारले असता बुद्धांनी त्यास सांगितले हा हत्ती माहूताचे अंधानुकरण करतोय याचा माहूत लंगडत चालतोय म्हणून हत्ती पण लंगडत चालत होता. असेच पुर्वापार चालत आलेल्या अनिष्ठ रूढींचे आपण आजही अंधानुकरण करतोय. खरोखर या आज उपचार करण्याची गरज आहे.सामाजिक बेड्या रूढी परंपरा असेच माणसांनी स्वतःहून स्वतःला लावून घेतले आहे.

माणसे जोडा, माणसं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. माणसं जोडणारी माणसंच मोठं कार्य करू शकतात.जी आयुष्याचा विचार करतात ती माणसं-माणसे जोडतात.जोडलेली जिवाभावाची माणसेच कामाला येतात.

खचून जाऊ नका, इंग्लंडचे पंतप्रधान श्री. विन्स्टन चर्चिल तेथील एका विद्यापीठात एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण त्यांनी तीनच वाक्यांनी संपवले. मित्रांनो माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका, अजिबात माघार घेऊ नका! या तीनच वाक्यांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अब्राहम लिंकनला वयाच्या २१ व्या वर्षी धंद्यात खोट आली २२ व्या वर्षी ते विधीमंडळाची निवडणूक हरले. २४ व्या वर्षी परत धंद्यात अयशस्वी ठरले. २६ व्या वर्षी ऐन तारूण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. २७ व्या वर्षी ते नैराश्याने खचले. ३४ व्यावर्षी ते संसदीय विधीमंडळाची निवडणूक हरले, ४५ व्या वर्षी सिनेटच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ४७ व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. ४९ व्या वर्षी परत सेनेटच्या निवडणुकीत हरले. मात्र ५२ व्या वर्षी ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. म्हणून ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै रोजी

 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै  रोजी

            मुंबईदि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवारदिनांक 6 जुलै2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

            या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

            दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 202426 फेब्रुवारी2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तवआयोगाच्या दिनांक 21 मार्च2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

             ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवारदिनांक 6 जुलै2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे2024 रोजी 23:59 पर्यंत*

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) *राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1)  उप जिल्हाधिकारीगट-अ (एकूण 07 पदे),(2) सहाय्यक राज्य कर आयुक्तगट-अ (एकूण 116 पदे),(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),(4) सहायक संचालकमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवागट-अ (एकूण 43 पदे),(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन)गट-अ (एकूण 03 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक)गट-अ  (एकूण 07 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक)गट-अ  (एकूण 07 पदे),(7) सहायक कामगार आयुक्तगट - अ (एकूण 02 पदे),(8) सहायक आयुक्तकौशल्य विकासरोजगार व उद्योजकतागट - अ (एकूण 01 पद),(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारीगट-ब  (एकूण 19 पदे),(10) सहायक गट विकास अधिकारीगट-ब (एकूण 25 पदे), (11) सहायक आयुक्तराज्य उत्पादन शुल्कगट-ब (एकूण 1 पदे),(12)  उप अधीक्षकराज्य उत्पादन शुल्कगट-ब (एकूण 5 पदे),(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारीगट-ब (एकूण 07 पदे),(14)  सरकारी कामगार अधिकारीगट - ब   (एकूण 04 पदे),(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधकगट-ब (एकूण 04  पदे),(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक)गट-ब (एकूण 7  पदे),(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)आदिवासी विकास आयुक्तालयगट-ब (एकूण 52  पदे),(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा)गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा - महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षकगट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपालगट-ब, (एकूण 16 पदे) 

(तीन )

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)गट-अ, (एकूण 23 पदे),(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)गट-ब, (एकूण 22 पदे).

            शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते.

            आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीतअशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

             संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील   माय अकाऊॅट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या क्वेशन  या बटनावर क्लिळ करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.

              सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्‌धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

            संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही

            महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)आदिवासी विकास आयुक्तालयगट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 25 जानेवारी2024  अशी राहील.

            महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

            या परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

             प्रस्तुत परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील एकूण 16 संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले. आता सदर शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धीपत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण 22 संवर्गासाठी पात्रता (वयोमर्यादाशैक्षणिक अर्हतादिव्यांग सुनिश्चिती इत्यादी बाबी )  मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल.

             उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने  उच्च न्यायालयमुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक 3468/2024 तसेच इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024  च्या मूळ जाहिरातीस व सदर शुद्धिपत्रकास आयोगाच्या दिनांक 26 एप्रिल2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी लागू राहतील .

            दिनांक 29 डिसेंबर2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी2024 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने कळविले आहे.

0000

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडुन मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

 केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडुन मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

            मुंबईदि. :- मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी नुकताच आढावा घेतला.  

            सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, '३०-मुंबई दक्षिण मध्यलोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, '३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडराज्य निवडणूक महानिरीक्षक एम. के. मिश्राराज्य निवडणूक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) धर्मेंद्र गंगवार, '३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक राजीव रंजन, '३०-मुंबई दक्षिण मध्यलोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शी, 'मुंबई दक्षिण मध्यव 'मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मुकेश सिंह, '३०-मुंबई दक्षिण मध्यलोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, '३१-मुंबई दक्षिणलोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) मुकेश जैनपोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरीमुंबई दक्षिण विभाग अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुखमध्य मुंबई अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकरसमन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजनसमन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवारप्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादमउपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसेसमन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानीसमन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटेसमन्वय अधिकारी (राज्य उत्पादन शुल्क) प्रवीण तांबे आदींसह मुंबई शहर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

               मतदान केंद्रांवर सुरळीत व वेळेत मतदान होण्यासाठी पूर्व नियोजनमतदारांच्या नियोजनबद्ध रांगा तयार करणेमतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास प्रतिबंधउष्णतेच्या लाटेत मतदानाच्या दिवशी उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना मतदान केंद्र परिसरात इलेक्ट्रॉल पावडर व पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देणेप्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवणेभरारी पथके, स्थिर सनियंत्रण पथक दुरछायाचित्र  सनियंत्रण पथक सर्व्हेलन्स टीमव्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६० हजार मतदारांची नव्याने नोंदणी केल्याबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असून मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सखी महिला मतदान केंद्रदिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.          

              मुंबई शहर जिल्ह्यात मतदान शांततेत व सुरळीत पार पडणारअसा विश्वास व्यक्त करीत पोलीस व निवडणूक यंत्रणेत योग्य समन्वय ठेवावामतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून सांगाव्यातमतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचण आली तर आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती द्यावीनिष्पक्षशांततेत निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवावीअशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.    

0000

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी अर्ज करण्याचे आवाहन १० जूनपर्यंत अर्जाची मुदत

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

१० जूनपर्यंत अर्जाची मुदत

               मुंबईदि.९ : यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलीजीबरगढओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम व व्दितीय वर्षासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून इच्छूक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) साठी १३ जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव आहेत. तसेच वेंकटगिरीसाठी २ जागा तसेच द्वितीय वर्षासाठी ३ जागांपैकी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योगनागपूरसोलापूरमुंबईऔरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जूनपर्यंत मागविण्यात आले आहेत.

            त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहेअसे वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.


दिलखुलास' कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत

  

'दिलखुलास' कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी

 डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत

 

            मुंबई: दि, ९ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात धुळे महानगरपालिकेच्या स्वीपच्या नोडल अधिकारी तथा धुळे महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत गुरुवार १६ मे२०२४ रोजीआकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रोशन जाधव यांनी घेतली आहे.

             धुळे जिल्ह्यात पाचव्या टप्पात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी राबविण्यात आलेले विविध जनजागृतीपर उपक्रमबैठकाज्येष्ठ नागरिकदिव्यांग मतदारग्रामीण व शहरी भागात राबवलेले विशेष उपक्रमयुवा मतदार यांना केलेले आवाहन अशा विविध उपक्रमांविषयीची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमातून डॉ. नांदुरकर यांनी दिली आहे.

Featured post

Lakshvedhi