Thursday, 9 May 2024

लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडानी बांधून ठेवले की

 लहानपणी हत्तीच्या पिल्लाच्या पायांना साखळदंडानी बांधून ठेवले की हत्ती मोठा झाल्यावर, नुसता साखळदंड त्या खुंटीला अडकवला तरी तो निमूटपणे उभा राहतो. त्याकडे असलेल्या ताकदीने एका दणक्यात तो साखळदंड व खुंटी तोडू शकतो. पण मनात असलेला नकारात्मक विचारच त्याला त्या साखळीचा गुलाम बनवतो. यश हे मनाच्या ताकदीवर अवलंबून असते.

एक हत्ती वर्षानुवर्षे लंगडत चालत होता. खूप उपचारानंतर पण त्याचे लंगडणे थांबले नाही. त्यावेळेस हत्तीचा मालक राजा हर्षवर्धन बुद्धांना भेटला व ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी हत्तीचा माहूत बदलण्याचा सल्ला दिला २१ दिवसात हत्ती लंगडण्याचे थांबवून नैसर्गिक चालू लागला. आश्चर्यचकित हर्षवर्धनने बुद्धांना याचे कारण विचारले असता बुद्धांनी त्यास सांगितले हा हत्ती माहूताचे अंधानुकरण करतोय याचा माहूत लंगडत चालतोय म्हणून हत्ती पण लंगडत चालत होता. असेच पुर्वापार चालत आलेल्या अनिष्ठ रूढींचे आपण आजही अंधानुकरण करतोय. खरोखर या आज उपचार करण्याची गरज आहे.सामाजिक बेड्या रूढी परंपरा असेच माणसांनी स्वतःहून स्वतःला लावून घेतले आहे.

माणसे जोडा, माणसं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. माणसं जोडणारी माणसंच मोठं कार्य करू शकतात.जी आयुष्याचा विचार करतात ती माणसं-माणसे जोडतात.जोडलेली जिवाभावाची माणसेच कामाला येतात.

खचून जाऊ नका, इंग्लंडचे पंतप्रधान श्री. विन्स्टन चर्चिल तेथील एका विद्यापीठात एका कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण त्यांनी तीनच वाक्यांनी संपवले. मित्रांनो माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका, अजिबात माघार घेऊ नका! या तीनच वाक्यांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.

अब्राहम लिंकनला वयाच्या २१ व्या वर्षी धंद्यात खोट आली २२ व्या वर्षी ते विधीमंडळाची निवडणूक हरले. २४ व्या वर्षी परत धंद्यात अयशस्वी ठरले. २६ व्या वर्षी ऐन तारूण्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले. २७ व्या वर्षी ते नैराश्याने खचले. ३४ व्यावर्षी ते संसदीय विधीमंडळाची निवडणूक हरले, ४५ व्या वर्षी सिनेटच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ४७ व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. ४९ व्या वर्षी परत सेनेटच्या निवडणुकीत हरले. मात्र ५२ व्या वर्षी ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. म्हणून ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi