Thursday, 9 May 2024

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै रोजी

 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलै  रोजी

            मुंबईदि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवारदिनांक 6 जुलै2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

            या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

            दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 202426 फेब्रुवारी2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तवआयोगाच्या दिनांक 21 मार्च2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

             ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवारदिनांक 6 जुलै2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे2024 रोजी 23:59 पर्यंत*

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) *राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1)  उप जिल्हाधिकारीगट-अ (एकूण 07 पदे),(2) सहाय्यक राज्य कर आयुक्तगट-अ (एकूण 116 पदे),(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),(4) सहायक संचालकमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवागट-अ (एकूण 43 पदे),(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन)गट-अ (एकूण 03 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक)गट-अ  (एकूण 07 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक)गट-अ  (एकूण 07 पदे),(7) सहायक कामगार आयुक्तगट - अ (एकूण 02 पदे),(8) सहायक आयुक्तकौशल्य विकासरोजगार व उद्योजकतागट - अ (एकूण 01 पद),(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारीगट-ब  (एकूण 19 पदे),(10) सहायक गट विकास अधिकारीगट-ब (एकूण 25 पदे), (11) सहायक आयुक्तराज्य उत्पादन शुल्कगट-ब (एकूण 1 पदे),(12)  उप अधीक्षकराज्य उत्पादन शुल्कगट-ब (एकूण 5 पदे),(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारीगट-ब (एकूण 07 पदे),(14)  सरकारी कामगार अधिकारीगट - ब   (एकूण 04 पदे),(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधकगट-ब (एकूण 04  पदे),(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक)गट-ब (एकूण 7  पदे),(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)आदिवासी विकास आयुक्तालयगट-ब (एकूण 52  पदे),(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा)गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा - महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षकगट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपालगट-ब, (एकूण 16 पदे) 

(तीन )

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)गट-अ, (एकूण 23 पदे),(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)गट-ब, (एकूण 22 पदे).

            शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते.

            आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीतअशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

             संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील   माय अकाऊॅट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या क्वेशन  या बटनावर क्लिळ करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.

              सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्‌धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

            सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

            संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही

            महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)आदिवासी विकास आयुक्तालयगट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 25 जानेवारी2024  अशी राहील.

            महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

            या परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

             प्रस्तुत परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील एकूण 16 संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले. आता सदर शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धीपत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण 22 संवर्गासाठी पात्रता (वयोमर्यादाशैक्षणिक अर्हतादिव्यांग सुनिश्चिती इत्यादी बाबी )  मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल.

             उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने  उच्च न्यायालयमुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक 3468/2024 तसेच इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024  च्या मूळ जाहिरातीस व सदर शुद्धिपत्रकास आयोगाच्या दिनांक 26 एप्रिल2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी लागू राहतील .

            दिनांक 29 डिसेंबर2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी2024 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi