Monday, 29 April 2024

जैन समाजासाठी जैन महामंडळ

 कोल्हापूर : देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे व दातृत्वात सदैव अग्रेसर राहिलेला जैन समाज हा परंपरेने आमच्या पाठीशी राहिलेला समाज आहे. जैन समाजाच्या विकासासाठी हे सरकार नेहमीच कटिबद्ध राहील. "अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाने" केलेल्या मागणी अनुसार जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय सरकार घेईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

                अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "जैन जागृती अभियान" या विशेष कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली.

                        मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जैन समाजाच्या साधुसंतांच्या रक्षणासाठीजैन मंदिरजैन तीर्थांच्या रक्षणासाठी व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन व्हावे ही काळाची गरज आहे आणि जैन अल्पसंख्याक महासंघा ची मागणी मान्य करत महाराष्ट्र राज्यामध्ये जैन विकास महामंडळ लवकरच स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील जैन समाजातील व्यापारीउद्योजकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे सरकार असून राज्यात विकासाच्या योजना साठी सरकार कधीही मागे हटणार नाही. व्यापारी- उद्योजकांना कोणतीही अडचण आल्यास तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता.

                        नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की कोल्हापूरच्या विकासातही जैन समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे व महायुती सरकार  नेहमीच जैन समाजाच्या पाठीशी आहे व यापुढेही असेल.

                        जैन समाजाचे राष्ट्रीय अधक्ष ललित गांधी यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणातजैन अल्पसंख्यांक महासंघाने गेल्या दहा वर्षात केलेला कामाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी व्यापारी व उद्योजकांसाठी घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले. जैन समाजाचे पवित्र तीर्थ सम्मेद शिखरजीपालीतानागिरणारजी नाकोडाजी या तीर्थक्षेत्रावरील समस्या सोडवण्यासाठी सरकारने केलेल्या सहकार्याबद्दलत्याचबरोबर संभाजीनगर येथील कीर्तीस्तंभ हटवण्याचा निर्णय रद्द केल्याबद्दल आणि जैन साधुसंतांना त्यांच्या विहारांमध्ये पोलीस संरक्षण पुरवण्याचे आदेश काढल्याबद्दल राज्य व केंद्र सरकारला धन्यवाद दिले.

                        या प्रसंगी ललित गांधी यांनी जैन समाजातील  कर्जफेड करणाऱ्या १६००० अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली  यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने निर्देश दिले जातील व प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळेल याची ग्वाही दिली.

                        जैन महासंघाने मागणी केलेल्या जैन विकास आयोग महामंडळ च्या स्थापनेस पाठिंबा दिलेल्या राज्यातील 160 आमदार व 28 खासदारांच्या शिफारस पत्रासह तयार केलेला प्रस्ताव ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला

                        अलीकडच्या काळात जैन समाजावर होत असलेल्या वेगवेगळ्या आघात व साधुसंतांच्या रक्षणासाठी जैन समाजात आज एक सशक्त संघटनेची आवश्यकता आहे व त्या अनुषंगानेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात "राष्ट्रीय जैन सेने"ची स्थापना महावीर जन्म कल्याणक च्या पवित्र दिवशी करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय जैन सेनेचे राष्ट्रीय उपप्रमुख संदीप भंडारी यांनी यावेळी दिली. तसेच राष्ट्रीय जैन सेना ही अहिंसा परमो धर्मधर्म हिंसा तथैवच: या तत्त्वाने काम करेल व जिथे ही गरज पडेल तिथे 'राष्ट्रीय जैन सेनाचे जैन सैनिक वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जैन समाजाच्या मान व सन्मानाची रक्षा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असे या वेळेस संदीप भंडारी यांनी सांगितले.

                        याप्रसंगी संभवनाथ जैन ट्रस्ट गुजरीचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाललक्ष्मीपुरी जैन ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल ओसवालभक्ती पूजा नगर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र ओसवालमहावीर नगर जैन संघ चे अध्यक्ष जवाहर गांधीशत्रुंजय संघ ट्रस्ट चे अध्यक्ष अमृत शहाप्रशम ओसवालहिम्मत ओसवालमहेंद्र ओसवालविकास अच्छाप्रीती पाटीलअमित वोराप्रितेश कर्नावटमेघ गांधीप्रीतम बोराराजेश ओसवाल इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


फोटो : जैन विकास महामंडळ स्थापना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देताना समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधीसंदीप भंडारीनरेंद्र ओसवालयाप्रसंगी सोबत राजेश क्षीरसागरकांतीलाल ओसवाल व अन्य मान्यवर दिसत आहेत

सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांची

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

 

            मुंबईदि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ राजा दयानिधी यांची 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सांगली जिल्हा प्रशासन सज्जया विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल आहे.सांगलीचे जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजनमतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे.


दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

 

            मुंबईदि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील '३०-दक्षिण मध्य मुंबईव '३१-मुंबई दक्षिणया दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे२०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

         दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीपकार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापकशिक्षकविद्यार्थी तसेच माजी विद्यार्थीपालक यांच्यासमवेत मेळावेबैठकाचर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूलदादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळामाटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळाशिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटरमाहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफसीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूलनॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

        दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअरमतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षाटॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाहीप्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहेव्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहेअसे सुनीता मतेजिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यतामुंबई शहर यांनी सांगितले.

००००

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एक उमेदवारी अर्ज दाखल मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी, तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून एका उमेदवाराने सोमवारी अर्ज दाखल केले. मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज भवानी हिरालाल चौधरी (सरदार वल्लभभाई पटेल पार्टी), बबन सोपान ठोके (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून रोहन रामदास साठोणे (अपक्ष) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात सोमवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करावे मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास यंत्रणांकडे सुपूर्द करावे

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

            मुंबईदि. २९ : प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीस्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट व महाराष्ट्र दिन १ मे रोजी राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन राज्यात करण्यात येते. राष्ट्रीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वज नागरिकांकडे दिसून येतात.   याव्यतिरिक्त महत्त्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी अशा प्रकारचे राष्ट्रध्वज निदर्शनास येतात. मात्र, कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेलेमाती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले असल्याचे आढळून येते. अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज आढळून आल्यास हे राष्ट्रध्वज गोळा करून संबंधित तहसिल कार्यालय अथवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावे.

            प्लास्ट‍िक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरावर व अंधेरीबोरीवली व कुर्ला (मुलूंड) या तीन तालुक्यांकरिता तालुकास्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज आढळून आल्यास संबंधित तहसिल कार्यालयात किंवा जिल्हास्तरावरील यंत्रणेकडे सुपूर्द करावेअसे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केले आहे.

                                                                  

26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक

 26- मुंबई उत्तर मतदासंघाकरीता

दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक


 


मुंबई उपनगर, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे विधानसभेचे 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या मतदासंघांचे कामकाज असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.


निवडणूक खर्च निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. खर्च विभागाचे निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी 26- मुंबई उत्तर मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी दिले.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक

 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता

राजकुमार चंदनकिरण छत्रपती खर्च निरीक्षक

 

मुंबई उपनगरदि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आज आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. 

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपोलिसआयकरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीअग्रणी बँकेचे व्यवस्थापकखर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. चंदनश्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. राजकीय पक्षउमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेतअसेही त्यांनी निर्देश दिले.

खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगावतर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक - 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतातअसे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदनश्री. छत्रपती यांनी केले आहे.

00

Featured post

Lakshvedhi