Saturday, 20 April 2024

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगर

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

            मुंबईदि. १९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहिता व कायदा सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे निर्देश मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवमुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

         या बैठकीस पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंडनिवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशीसोनाली मुळयेपंकज देवरेडॉ. दादाराव दातकरअतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुखअनिल पारस्करडॉ. महेश पाटीलराजीव जैनमुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसेमुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

         कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात झालेल्या बैठकीत सुरक्षा तैनातीचे नियोजनस्ट्राँग रूम सुरक्षा व्यवस्थामतदान केंद्रांच्या ठिकाणी ठेवण्यात येणारी सुरक्षा व्यवस्थासंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती व संवाद नियोजनमुंबईतील सर्व मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. कायदा-सुव्यवस्था व मुंबई शहर जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला भारत निवडणूक आयोगाने राज्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र गंगवारएम. के. मिश्रा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

            नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकसंख्या अधिक असलेल्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये नोंदणीआशा वर्कर्स व स्वयंसेवकांच्या मदतीने मतदार नोंदणी मॉनिटरिंग करून मतदाराला कमी वेळेत व व्यवस्थितपणे मतदान करता येईल आणि मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी मतदान केंद्रांची रचना सुलभ पद्धतीने केली पाहिजे याबाबत निरीक्षकांनी मार्गदर्शन केले.

        भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांवर निवडणूक संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होतात, याकडे विशेष लक्ष द्यावे. मतदानापूर्वी 48 तास आधी प्रचारास बंदी असते या वेळी समाज माध्यमातून बल्क संदेश (Bulk Message) सारखा प्रचार होण्याची शक्यता असते याकडे विशेष लक्ष द्यावेमतदारांनी निष्पक्ष आणि निर्भिडपणे मतदान केले पाहिजेयाबाबत श्री. मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. 

मुंबई शहर जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

            लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय अधिकारी यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली.   

         मतदार माहिती पावती (VIS) डाऊनलोड करणेईव्हीएम वाटप करणेवेबकास्टिंगसाठी मतदान केंद्रांची यादी, AMF (सर्व सोयी उपलब्ध आहेतयाची खात्री करणे)वाहतूक आराखडा तयार करणेनिवडणुकीसाठी सर्व वाहनांची आवश्यकता व मागणी, (एनजीपीएस) पोर्टलवरील तक्रारी निकाली काढणेमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणेअधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती या विषयांबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समवेत आढावा घेण्यात आला.     

००००

काशीबाई थोरात/वि.स.अ


 

Friday, 19 April 2024

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

 अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत

        

        मुंबईदि. १९  : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी लागू असलेली 'आदर्श आचारसंहितायाविषयी  अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची  'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात मुलाखत   प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ वृत्त निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        आदर्श आचारसंहिता म्हणजे काय या कालावधीत काय करावे आणि काय करू नयेसमाज माध्यमांसाठी नियम, पेड न्यूज कोणती असतेआचारसंहिता भंग केल्यानंतर होणारी कारवाई यासह आचारसंहितेबद्दल सविस्तर माहिती  डॉ. किरण कुलकर्णी यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. २२मंगळवार दि.२३ आणि बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

            तर 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

000

संध्या गरवारे/ स.सं


'कर सहायक' मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

 'कर सहायक' मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

 

            मुंबईदि. 19 :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा - 2023 मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात 'कर सहायकसंवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

            महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2023 या परीक्षेचा निकाल आयोगाकडून दिनांक 16 एप्रिल2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे.  निकाल संगणकीय संस्करण पद्धतीने तयार करण्यात आला असून पूर्णत: अचूक आहे. प्रस्तुत पदासाठी अर्ज केलेला नसतानाही उमेदवार पात्र ठरले असल्याची तसेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेली नसतानाही टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरले असल्याची बाब काही वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून ती पूर्णत: चुकीची आहे.

         आयोगाकडून निकालाची कार्यवाही प्रचलित नियमांआधारे करण्यात आलेली असून ती योग्य आहे. प्रस्तुत निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही. शासनस्तरावर प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या अधीन राहून उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात येते.

            कर सहायक या संवर्गाकरिता प्रकल्पग्रस्तभूकंपग्रस्त व अंशकालीन पदवीधर उमेदवार या वर्गवारीस आरक्षण नाही. तथापिसदर वर्गवारीच्या काही उमेदवारांनी अर्जात सामाजिक आरक्षणाचा (अ.ज.,अ.जा.,वि.जा.(अ)भ.ज.(ब)भ.ज.(क)भ.ज.(ड)इ.माव.आ.दु.घ. इ.) तसेच अन्य समांतर आरक्षणाचा (महिलाखेळाडूमाजी सैनिकदिव्यांग इ.) दावा केलेला आहे. सदर दावे व उमेदवारांनी लेखी परीक्षेत प्राप्त केलेले गुण विचारात घेऊन त्यांचा टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालाकरिता विचार करण्यात आला आहे. या परीक्षेच्या जाहिरातीमधील परि. क्र. 6.3.4 मध्ये नमूद केल्यानुसार सदर उमेदवारांना टंकलेखन प्रमाणपत्रे धारण करण्यापासून संबंधित शासन निर्णयांन्वये सूट देण्यात आली आहे.

       आयोगाकडून सर्वच परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात येतात तसेच प्रचलित नियमांनुसार व निव्वळ गुणवत्तेवर निवडप्रक्रिया राबविण्यात येतात. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या अनुषंगाने विपर्यास करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे उमेदवारांनी लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

 

         मुंबईदि. १९ :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे -

रामटेक  ५२.३८ टक्के

नागपूर ४७.९१ टक्के

भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के

गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के

आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.

0000

वंदना थोरात / वि.स.अ


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील

पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान

 

            मुंबईदि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १.०० वाजेपर्यंत  ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रामटेक  २८. ७३ टक्के

नागपूर २८. ७५ टक्के

भंडारा- गोंदिया ३४ .५६ टक्के

गडचिरोली- चिमूर ४१ .०१ टक्के

 चंद्रपूर ३०.९६ टक्के

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात

दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

 

            मुंबईदि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी ३.०० वाजेपर्यंत  ४४.१२ टक्के मतदान झाले आहे.

            पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

रामटेक  ४०. १० टक्के

नागपूर ३८. ४३ टक्के

भंडारा- गोंदिया ४५ .८८ टक्के

गडचिरोली- चिमूर ५५ .७९ टक्के

चंद्रपूर ४३.४८ टक्के


39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या दिवशी 3 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक दुसऱ्या दिवशी 3 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 

बीड, दि.19  : (जिमाका) 39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज 3  उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला.

              39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 03 अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले .  शेख तौसीफ अब्दुल सत्तार, सादेक इब्राहिम शेख, उदयभान नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहेत.

 लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नव्हते.  गुरुवारी 39 इच्छुक उमेदवारांना 92 नामनिर्देशन पत्रांची वाटप झाले होते. आज शुक्रवारी 30 इच्छुक उमेदवारांना  68 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले आहे. असे एकूण 69 इच्छुक उमेदवारांना 160 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

            39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

            सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

 

00000


Featured post

Lakshvedhi