Monday, 12 February 2024

ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम; 339 वाहनचालकांची तपासणी

 ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रतिबंधात्मक मोहीम339 वाहनचालकांची तपासणी

 

            मुंबईदि. 09: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात येत आहे. दारू पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहने चालविली जाऊ नयेतअपघातांची व अपघाती मृत्यूंची रोखणे या उद्देशाने अशा वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्याकरीता ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 339 वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली.

            या मोहिमे अंतर्गत आरटीओ व वाहतूक विभागातील अधिकारी यांनी सायन सर्कलसुमन नगर चौकएडवर्ड नगरअमर महल चौक चेंबूरएलबीएस रोड घाटकोपरविक्रोळीदेवनारमानखुर्द शिवाजी नगर चौक आदी ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात आली. ही मोहिम 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान  सायं 7 ते रात्री 11.30 या दरम्यान राबविण्यात आली. यावेळी दुचाकीऑटोरिक्षाटॅक्सीमालवाहतूक करणारे हलके वाहनअवजड वाहन व बसचालकांची तपासणी करण्यात आली.

            दारू पिऊन वाहने चालविल्यास निश्चितपणे अपघात होऊन मृत्यूमुखी पडण्याची सर्वात जास्त शक्यता असल्याने वाहनचालकांनी नशेच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेत. पुढील काळातही ब्रेथलायझर उपकरणाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी दारूच्या अंमलाखाली वाहने चालवू नयेअसे आवाहन प्रादे‍शिक परिवहन अधिकारी विनय अहीरे यांनी केले आहे.

डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

 डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव तर

मनोविकास प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर

 

            मुंबईदि. 9 - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व प्रकाशन संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार प्रदान केला जातो. सन 2023 या वर्षासाठी डॉ. रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरुप तीन लक्ष रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

            श्री.केसरकर म्हणालेसाहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकाची विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराकरिता निवड करण्यासाठी तसेच साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या एका प्रकाशन संस्थेची श्री. पु. भागवत पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता या पुरस्काराच्या निवड समितीची बैठक 7 फेब्रुवारी2024 रोजी झाली. या बैठकीत सर्व निकषांचा समग्र विचार करुन साहित्यिकाचे साहित्य क्षेत्रातील भरीव व गुणात्मक योगदानत्यांनी केलेले सृजनात्मक स्वरूपाचे वैविध्यपूर्ण लेखन व महाराष्ट्रातील साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रासाठी त्यांचे संस्थात्मक योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन डॉ.रवींद्र शोभणे यांची विंदा करंदीकर पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

            याबरोबरच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी सर्व निकषांचा समग्र विचार करुन पुस्तक प्रकाशन विषयातील विविधतासंस्थेने आजपर्यंत प्रकाशित केलेली ग्रंथांची संख्या व ग्रंथनिर्मिती क्षेत्रातील त्या संस्थेचे भरीव योगदान या मुख्य बाबी विचारात घेऊन मनोविकास प्रकाशनपुणे या प्रकाशन संस्थेची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ


 

वृत्त क्र. ५३०


मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

 मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर

            मुंबईदि. 9 : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ.अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्तीसाठी) यांची तर वाङ्मय चर्चा मंडळबेळगाव (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी  भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्तीसाठी) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठाननाशिक (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली असल्याचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. प्रत्येकी दोन लाख रूपये रोखमानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

            मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षणसंगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नेमलेल्या निवड समितीची बैठक दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.

Sunday, 11 February 2024

क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत

 क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

            ठाणेदि. ८ : क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेतअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळयाप्रसंगी केले. 

            ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले.

             यावेळी आमदार प्रताप सरनाईकजिल्हाधिकारी अशोक शिनगारेठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगरमाजी आमदार रवींद्र पाठकमाजी महापौर नरेश म्हस्केक्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडेतहसीलदार युवराज बांगरजिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्केतालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीजिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाचा दिवस आहे. खेळाडू आणि एक तंदुरुस्त पिढी घडविणाऱ्या या संकुलाचे उद्घाटन होत आहे.  ठाण्याचा पालकमंत्री असल्यापासून या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार असून आज मुख्यमंत्री म्हणून त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मिळाले आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंना कसब दाखविण्याची संधी मिळेल. त्यातून ते जिल्हाराज्य आणि देशाचे प्रतिनिधीत्व करतील.

            मुख्यमंत्री म्हणाले कीठाण्याला खेळ आणि खेळाडूंच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात झालेले आहेत. हनुमान व्यायाम शाळाआनंद भारतीमावळी मंडळआर्य क्रीडा मंडळ या काही निवडक ठिकाणीच खेळण्याची संधी असे. व्यायाम करणे, स्थानिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यापलिकडे कुणी खेळाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. ही उणिव दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे भरुन निघाली.  तिथे आता अॅथलेटिक्सचे 6 ट्रॅक आखले गेले. उंच उडीलांब उडीगोळाफेक आदी खेळांना उत्तम व्यासपीठ मिळाले. क्रिकेटसाठी दोन खेळपट्ट्या तयार केल्या. दरवर्षी अॅथलेटिक्सटेबलटेनिसबॅडमिंटनक्रिकेटकब्बड्डीखो-खो इ. खेळांच्या राज्य व राष्ट्रीयस्तरावरील महापौर करंडक स्पर्धा ठाण्यात होतात. मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळतो. 

            ठाणे तालुका क्रीडा संकुल हे या क्रीडा क्षेत्रातील पुढील पाऊल आहे. काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडविण्याचे काम इथे होणार आहे. राज्यात खेळ आणि खेळाडूंना पोषक असे वातावरण आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभस्पर्धेचा शुभारंभ केला आहे. गेल्या महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील सर्वच राज्यातील युवा आणि खेळाडू त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रीयस्तरावरचा हा युवा मेळावा आयोजित करण्याची संधी राज्याला मिळाली. ती आपण यशस्वी करून दाखवली.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारी पुढची पिढीही तितकीच सक्षम आणि तंदुरूस्त असणं आवश्यक आहे.  त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धायुवा मेळावे आयोजनासाठी प्रयत्न करीत आहोत. ठाण्याचा सुपूत्र रुद्रांक्ष पाटीलने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत देश आणि राज्याचे नाव मोठे केले. रुद्रांक्ष  सारखेच अनेक गुणवान खेळाडू राज्यात आहेत. ते आपल्या जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर झळकवत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपल्या राज्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळावीयासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मातीतल्या खेळांची परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यातून शरीर तंदुरुस्त राहतेच पण मुलांची व्यक्तिमत्वाची जडणघडण होते.

            मोबाईलइंटरनेटच्या युगात मुले मैदानांपासून दुरावली आहेतमुलांना पुन्हा मैदानी खेळाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. त्यात पालकांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. सरकारही आपली जबाबदारी झटकणार नाही. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. कळवा येथे क्रीडा विभागाला 48 एकर जागा दिली आहे. भिवंडीशहापूरमुरबाड या तालुक्यांमध्ये देखील तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.

             उल्हासनगरअंबरनाथकल्याण येथील तालुका क्रीडा संकुलांचा मेकओव्हर सुरू आहे. या सर्व क्रीडा संकुलांचा लाभ ठाणे जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंना होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारत तयार असल्याचे जाहीर केले आहे. ऑलिम्पिंक स्पर्धेतले खेळाडू घडविण्यासाठी ही संकुले उपयुक्त ठरतील. हेच मिशन डोळ्यासमोर ठेवत मिशन लक्ष्यवेध’ राबवत आहोत. राज्यात क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्यामध्ये तालुकाजिल्हाविभागीय क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. खेळांडूच्या प्रोत्साहनासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुला-मुलींनी विकसित करण्यात आलेल्या या सुविधांचा वापर करावा आणि क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवावीअसेही ते म्हणाले.

            जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, शासनाच्या सन 2012 च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्यानुषंगाने ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता क्रीडा विभागाला शासनाकडून 2985.29 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शासनाकडून मिळालेला निधी 1 कोटी असून त्यामध्ये या संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्रीनगरविकासएकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचा 9 कोटी निधी उपलब्ध करून दिला. या तालुका क्रीडा संकुलास बांधण्यासाठी 4 कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याचे सांगितले.

            या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता दीक्षित यांनी केले तर, आभार प्रदर्शन क्रीडा उपसंचालक श्री. फरताडे यांनी केले.

0000


पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

 पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग

सकाळी नऊनंतर भरवण्याच्या सूचना

विद्यार्थी उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

            मुंबईदि. 8 - राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावीअशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली आहे. विभागामार्फत अभ्यास करुन तज्ज्ञांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतीलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

            राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर मंत्री श्री. केसरकर यांच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात घेऊन शाळांची वेळ बदलण्याविषयी अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शिक्षण तज्ज्ञशिक्षण प्रेमीपालक तसेच प्रशासनातील अधिकारी यांचे देखील अभिप्राय नोंदविण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. गुगल लिंक वरील अभिप्राय व विविध शिक्षण तज्ज्ञ व शिक्षण प्रेमी व पालक यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

            शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाहीयाची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावीअसेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

            या अनुषंगाने केलेल्या अभ्यासामध्ये पुढील बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा विशेषतः खासगी शाळा भरण्याच्या वेळा या साधारणपणे सकाळी सात नंतर असल्याचे दिसून येते. विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने ते शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसलेले दिसून येतात. त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असलेला दिसून येतो. ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतो. मोसमी हवामानविशेषतः हिवाळा व पावसाळा या ऋतूमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणेपावसामुळे व थंडी मुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुदा आजारी पडतात.  सकाळी पाल्याला लवकर तयार करणेजेवणाचा डबा तयार करणे आणि पाल्याला वेळेत शाळेत सोडणे यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते. सकाळी लवकर भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना बस व व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरील धुकेपाऊस यामुळेही अडचणी निर्माण होतात.

            यानुसार शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावाअशी सूचनाही करण्यात आली आहे.

            या परिस्थितीचा विचार करता सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याच्या वेळेत बदल करणे आवश्यक होते. यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून सकाळी नऊ किंवा नऊ नंतर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत या सूचना निर्गमित करण्यात आल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/


आल्या ग, निवडणुका, लोकसभेच्या

 💥लोकसभा निवडणूक 2024


☀️महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान


📌पहिला टप्पा -11 एप्रिल 


📌दुसरा टप्पा - 18 एप्रिल 


📌तिसरा टप्पा - 23 एप्रिल 


📌चौथा टप्पा - 29 एप्रिल 


महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोक.  सभा निवडणूक


पहिला टप्पा -11 एप्रिल:

(7 लोकसभा सीट) नागपुर,                                        वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम


दूसरा टप्पा -18 एप्रिल:

(10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर


तीसरा टप्पा -23 एप्रिल:

(14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले


चौथा टप्पा – 29 एप्रिल:

(17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण

नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन

 नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत

महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 

        मुंबईदि. ९ : मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने या वर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. १६ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ‘महालक्ष्मी सरस चे नागपूर येथे आयोजन केले असून याला नागपुरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल. अशी आशा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. नागपूरच्या महालक्ष्मी सरसमध्ये एकूण २५० स्टॉल असतील. यामध्ये १०० खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील.

             मंत्री श्री. महाजन म्हणाले कीग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या करिता राज्यस्तरावरविभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागांतर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागच्या वेळी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत २६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी  २०२३ या कालावधीत BKC मुंबईमध्ये १९ वे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रदर्शनाला मुंबई आणि परिसरातून विक्रमी प्रतिसाद मिळाला. नागपूरच्या महालक्ष्मी सरसमध्ये एकूण २५० स्टॉल असतील यामध्ये १०० खाद्यपदार्थांचे व १५० इतर स्टॉल्स असतील.

            राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यातील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समुहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना यशस्वी उद्योजिका म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजीविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३९ हजार २९१ स्वयंसहायता समूह३० हजार ७६७   ग्रामसंघ१ हजार ८५० प्रभागसंघ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ७१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. ६३ लाखापेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत. ग्रामीण भागातील महिला या पूर्वीपासूनच पारंपरिक व अपांरपरिक अशा शेती आधारित व बिगर शेती आधारित व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या आहेत. अभियानातील बहुतांशी महिलांनी यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे व विविध उत्पादनांची निर्मिती करीत असल्याची माहिती श्री. महाजन यांनी दिली.

            महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समुहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समुहांतील सदस्यांना विविध राज्यातील उत्पादनेविक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमानखाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल ग्रामीण भागातील वस्तू/पदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे, असेही त्यांनी सांगितले.

             राज्यभरातील विविध भागांतील वैविध्यपूर्ण चवींचे खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होत असल्याने नागपूरकरांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने मेजवानीच मिळणार आहे. राज्यस्तरावरील महालक्ष्मी प्रदर्शनात नेहमी सहभागी होत असलेले सर्व प्रकारचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत यामुळे  अभियानाला प्रचार व प्रसिद्धी तसेच महिलांच्या उत्पादनांना राज्यातील इतर मोठ्या शहरात मागणी व प्रसिद्धी मिळेल.

            नागपूर येथील सरसच्या आयोजनामुळे विदर्भातील स्वयंसहाय्यता गटांना बाजापेठ उपलब्ध होण्यासाठी व त्यांच्या उत्पादकतेला तसेच व्यावसायिकतेला  चालना मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मुंबईच्या सरसमध्ये हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असल्याच्या भावना मुंबईकरांनी व्यक्त केल्या होत्या. त्याच हेतूने नागपूर शहरात हे प्रदर्शन आयोजित केल्यामुळे नागपूरकरांनाही हा अनुभव मिळणार आहे. महालक्ष्मी सरस हा आता विश्वासार्ह ब्रान्ड झाला आहे. या प्रदर्शनातून गुणवत्तादर्जा आणि शुद्धता त्याचबरोबर वाजवी दर यासाठी उमेद अभियानाकडून बारकाईने कार्यवाही केली जाते.  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरकरांनी आणि परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी केले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi