मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2023 जाहीर
मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ.अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्तीसाठी) यांची तर वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्तीसाठी) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक (संस्थेसाठी) यांची निवड करण्यात आली असल्याचे मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. प्रत्येकी दोन लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांसाठी नेमलेल्या निवड समितीची बैठक दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment