Sunday, 10 December 2023

जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा रक्कम उमेदवारांना परत करण्याची कार्यवाही सुरू

 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेसाठी जमा रक्कम

उमेदवारांना परत करण्याची कार्यवाही सुरू

ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन

            नागपूर दि. ८ :  ग्राम विकास विभागाची मार्च,२०१९ व ऑगस्ट,२०२१ मध्ये होणारी पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क संबंधित जिल्हा परिषदांमार्फत परत करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.

            यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रा. राम शिंदेप्रवीण दरेकरनिरंजन डावखरेअभिजित वंजारीडॉ.मनीषा कायंदे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.महाजन बोलत होते.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीपरीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परतावा रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. तसेच उमेदवारांनी बँक खात्याची माहिती द्यावी. उमेदवारांकरीता बँक खात्याची माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक सुस्थितीत सुरू असून उमेदवारांकडून मागणी प्राप्त झाल्यानुसार उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री महाजन यांनी यावेळी दिली.

००००


महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार

 महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार


               सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत


            यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री सावंत बोलत होते.


            यावेळी मंत्री श्री सावंत म्हणाले की, राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात “महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे. आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधे, वैद्यकीय उपकरणे, साहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.


            वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधे, उपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.


००००

नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

 नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास

वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि. ८ : नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीने रुग्ण सेवेकरिता यंत्रसामग्रीऔषधे व सर्जिकल साहित्य या वैद्यकीय सुविधासाठी १३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

यावेळी मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले कीमेयो आणि मेडिकल रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सध्या औषधे व यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भात आणखी काही समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार

               सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत

            यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री सावंत बोलत होते.

            यावेळी मंत्री श्री सावंत म्हणाले की,  राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिकाजिल्हा परिषदेतील औषधेवैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे.  आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापकमुख्य लेखा व वित्त अधिकारीमुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधेवैद्यकीय उपकरणेसाहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.

            वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधेउपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

००००


Saturday, 9 December 2023

एमआयडीसीतील इंडियाबुल्सला दिलेली जमिन परत घेण्याची कार्यवाही सुरू

 एमआयडीसीतील इंडियाबुल्सला दिलेली

जमिन परत घेण्याची कार्यवाही सुरू

- उद्योगमंत्री उदय सामंत

            नागपूरदि. 8 नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त सिन्नर औद्योगिक क्षेत्र (सेझ) टप्पा क्र. १ येथे इंडिया बुल्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीच्या प्रकल्पास दिलेली सर्व जमीन परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील विकसित न केलेल्या जमिनी परत घेण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

            विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. या वेळी झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री जयंत पाटीलसचिन अहिरप्रवीण दरेकर आदींनी सहभाग घेतला.

            उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले कीअतिरिक्त सिन्नर औद्योगिक वसाहतींमध्ये इंडिया बुल्स कंपनीला जमिन वाटप करण्यात आली होती. मात्रकंपनीने वाटप केलेल्या क्षेत्रामध्ये विकास करण्याची कार्यवाही केली नसल्याने जमिन परत देण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्या आल्या आहेत. तसेच यासंदर्भात न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एमआयडीसी कायदे व न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. तसेच या प्रकल्पामुळे प्रकल्पबाधित झालेल्यांना वाटप करण्यात येणाऱ्या एकूण ४८२ भूखंडापैकी आतापर्यंत २८२ भूखंडाचे वाटप करण्यात आले असून २०० भूखंड वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

            महाड येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण करण्यास बहुसंख्यांचा विरोध असल्यास ही एमआयडीसी रद्द करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचा विचारही करण्यात येईलअसेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

 

०००००


महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

 महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

 

            नागपूरदि. :  महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊ याअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारराजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्यज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपरिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रम ऐतिहासिक आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

           या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचेत्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करु या. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करू या. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

          उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीराज्याला महर्षी कर्वेमहात्मा जोतिराव फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरराजर्षी शाहू महाराजक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

          विधान परिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले कीपरिषदेमुळे शिक्षकपदवीधरलेखककवीसाहित्यिकसामाजिक कार्यकर्तेखेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

          चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000


 

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

 

       मुंबईदि. ०८ : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोहिणी पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    आज मंत्रालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

 मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील समित्यांचे गठन करण्यात येत आहे. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले नाव आठ दिवसांच्या आत कळविण्याचे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.


अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा नुकतीच केली आहे. यात, निधी संकलन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती (गाळे व्यवस्थापन), विविध शासकीय परवानगी समिती, शाळा महाविद्यालय समन्वय समिती, कार्यालय समिती, हिशोब लेखन व लेखापरीक्षण समिती, कवी कट्टा समिती, सांस्कृतिक समिती, बालमेळावा व नाटय समिती, प्रसिध्दी व माध्यम समिती, प्रतिनिधी नोंदणी समिती, विविध कार्यशाळा समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष समिती, समन्वय समिती, ग्रंथ दिंडी समिती, स्वच्छता समिती, स्मरणिका समिती या समित्यांमधील काही सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


दुसऱ्या टप्प्यात अन्य सदस्यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे तसेच अन्य काही समित्यांचे देखील गठन करण्यात येणार आहे. यासाठी समित्यांमध्ये काम करु इच्छिणाऱ्यांकडून नावे मागविण्यात येत आहेत. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले पूर्ण नांव, गांव, पत्ता आठवडाभरात अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर या नावाने आठ दिवसांच्या आत लेखी कळवावे अथवा प्रा.डॉ. सुरेश माहेश्वरी यांच्या ८८०६७१११९९ किंवा भैय्यासाहेब मगर ९४२३९०४४८३ या व्हॉटस्अॅपवर क्रमांकावर कळवावे. तसेच प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी, बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी, गझलकट्टा नोंदणी, टेंडर प्रक्रिया आदी माहितीसाठी www.marathisahityasammelan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi