Saturday, 9 December 2023

महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

 महाराष्ट्र विधान परिषदेची कामगिरी पुढील पिढीसाठी मार्गदर्शक

-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त चर्चासत्र

 

            नागपूरदि. :  महाराष्ट्र विधान परिषदेचे कामकाज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. परिषदेतील चर्चा या देशाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या आहेत. या सकारात्मक चर्चांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देऊ याअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

          विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त ‘महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे योगदान’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलविधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारराजेंद्र गवई यांच्यासह विधान परिषद सदस्यज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपरिषद सभागृहामध्ये विचार मांडण्याची मुभा असते. जनतेला न्याय देणेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सभागृहात येतो. महाराष्ट्र सर्व क्षेत्रासोबतच  संसदीय कार्यप्रणालीमध्येही अग्रेसर आहे. ऐतिहासिक वास्तूमध्ये होत असलेला आजचा हा शतक महोत्सवी कार्यक्रम ऐतिहासिक आहे. राज्याची संसदीय परंपरा ही वैभवशाली असून जगाने गौरवलेली आहे. या परंपरेमध्ये नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे संसदीय परंपरा समृद्ध करणारे असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

           या अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचेत्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करायचे आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची बेरीज करु या. विदर्भातील जनतेला या अधिवेशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी काम करू या. सर्वांनीच हे अधिवेशन गांभीर्याने घ्यावे. या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही आमची भावना आहे. विदर्भाला जोडणारे माध्यम हीच या अधिवेशनाची मोठी उपलब्धता असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

          उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या कीराज्याला महर्षी कर्वेमहात्मा जोतिराव फुलेभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरराजर्षी शाहू महाराजक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या योगदानामुळेच राज्यात शिक्षण चळवळ यशस्वी झाली आहे. समाजप्रबोधनाची ही परंपरा जपण्याचे काम विधान परिषदेच्या माध्यमातून होत आहे. विधान परिषदेच्या आजपर्यंतच्या वाटचालीविषयी लवकरच पुस्तकही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.

          विधान परिषदेचे महत्व सांगताना विरोधी पक्षनेते श्री. वडेट्टीवार म्हणाले कीपरिषदेमुळे शिक्षकपदवीधरलेखककवीसाहित्यिकसामाजिक कार्यकर्तेखेळाडूंना प्रतिनिधित्व मिळाले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांनी चर्चासत्राच्या कार्यक्रमास शुभेच्छा देताना या अधिवेशनाचे सर्वांनाच कुतुहल असल्याचे सांगितले.

          चर्चासत्रामध्ये नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकारांनी तसेच विधान परिषद सदस्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमावेळी ज्येष्ठ पत्रकार व सदस्यांना मुख्यमंत्री श्री शिंदे व उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi