Sunday, 10 December 2023

नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

 नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयास

वैद्यकीय सुविधांसाठी १३ कोटी रुपये

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि. ८ : नागपूर शहरातील मेयो आणि मेडिकल रुग्णालयात जिल्हा नियोजन समितीने रुग्ण सेवेकरिता यंत्रसामग्रीऔषधे व सर्जिकल साहित्य या वैद्यकीय सुविधासाठी १३ कोटी रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

यासंदर्भातील प्रश्न सदस्य सर्वश्री प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

यावेळी मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले कीमेयो आणि मेडिकल रुग्णालयात रुग्ण सेवेसाठी सध्या औषधे व यंत्रसामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भात आणखी काही समस्या असतील, तर त्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेऊन समस्या सोडविण्यात येतील.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार

               सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत

            यासंदर्भातील उपप्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री सावंत बोलत होते.

            यावेळी मंत्री श्री सावंत म्हणाले की,  राज्य शासनाच्या विविध विभागांसह महानगरपालिकाजिल्हा परिषदेतील औषधेवैद्यकीय उपकरणे खरेदीतील अनियमिततेला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री यांच्याकडे असणार आहे.  आरोग्य सहसंचालक दर्जाचा व्यवस्थापकमुख्य लेखा व वित्त अधिकारीमुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे आहेत. राज्य सरकारचे विविध विभाग आपापल्या गरजेनुसार औषधेवैद्यकीय उपकरणेसाहित्यसामग्री आदींची खरेदी करतील.

            वेगवेगळे विभाग अथवा स्थानिक स्वराज्य संस्था एकाच प्रकारचे औषधेउपकरणे वेगवेगळ्या दरात खरेदी करत होते. प्राधिकरणामुळे एकात्मिक पद्धतीने खरेदी करता येणार असल्यामुळे अविलंब खरेदी प्रक्रिया पार पडणार आहे.त्यामळे यापुढील औषध खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणामार्फत औषध खरेदी करणार असल्याचे मंत्री श्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi