अब माला जपना भी हुआ डिजिटल 😃
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 9 December 2023
मुंबई की स्वच्छता के 'असली हीरो स्वच्छता कर्मचारी'
मुंबई की स्वच्छता के 'असली हीरो स्वच्छता कर्मचारी'
मुख्यमंत्री के हाथों आज दुसरे चरण में मुंबई के
पूर्व और पश्चिम उपनगर में संपूर्ण स्वच्छता अभियान चलाया
जुहू बीच पर समुद्र किनारा स्वच्छ करनेवाली मशीन चलाकर मुख्यमंत्री ने किया स्वच्छता का निरिक्षण
मुंबई, दि 9:- मुंबई के लोगों की स्वास्थ के लिए, मुंबई की स्वच्छता के लिए, सुंदरता के लिए जारी स्वच्छता अभियान यह महापालिका कर्मचारी, अधिकारी तक ही सीमित न रखते हुए यह जन अभियान होने के लिए मुंबई के प्रत्येक व्यक्ति की इसमें सहभागिता आवश्यक है. मुंबई को स्वच्छ, सुंदर और निरोगी रखने के लिए, मुंबई पालिका के सफाईकर्मी दिन-रात काम करते हैं, उनकी वजह से ही मुंबई, स्वच्छ और सुंदर है और स्वच्छता कर्मचारी ही ‘असली हीरो है’ यह सराहनास्पद शब्द कहते हुए सफाईकर्मियों को सभी सहयोग ने करने का आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने किया.
प्रदूषणमुक्त और स्वच्छ, सुंदर मुंबई के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के निर्देश के अनुसार संपूर्ण स्वच्छता अभियान (डीप क्लिन ड्राईव्ह) चलाया जा रहा है. दि. 3 दिसंबर को मुख्यमंत्री के हाथों इस अभियान का धारावी से शुभारंभ होने के बाद आज दुसरे चरण में मुंबई के पूर्व और पश्चिम उपनगर में मुख्यमंत्री श्री. शिंदे की प्रमुख उपस्थिति में संपूर्ण स्वच्छता अभियान चलाया गया.
जुहू चौपाटी स्थित महात्मा गांधी की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर स्वच्छता अभियान का प्रारंभ हुआ. इस दौरान मुख्यमंत्री ने समुद्र किनारा स्वच्छ करनेवाला यंत्र स्वयं चलाकर स्वच्छता का निरिक्षण किया. इस दौरान शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिले के पालकमंत्री दीपक केसरकर, विधायक अमित साटम, पूर्व मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिका के आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित थे.
इस अवसर मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि स्वच्छ्ता अभियान के लिए बड़े पैमाने पर मानव संसाधन और विभिन्न प्रकार के अत्याधुनिक प्रोद्योगिकी पर आधारित संयंत्र और वाहन का उपयोग किये जाने से परिसर कम समय में अधिक अच्छे से स्वच्छ हो रहा है. इससे लोगों को भी परिसर स्वच्छ रखने की आदत लगेगी. स्वच्छता अभियान यह अब एक लोकसहभगिता का लोकप्रिय अभियान हुआ है. लोकप्रतिनिधियों की भी इसमें सक्रिय सहभाग है, जो की, निश्चित ही प्रेरणादायी है.
मुख्यमंत्री श्री शिंदे ने आगे कहा कि संपूर्ण मुंबई शहर में चरणबद्ध तरीके से डीप क्लीनिंग अभियान चलाया जाएगा. इस स्वच्छता अभियान के द्वारा बढ़ते प्रदुषण पर भी प्रतिबन्ध लग सकेगा. धारावी जैसे झोपडपट्टी के परिसर में स्वच्छता का काम प्रभावी रूप से हो रहा है. इसमें सड़क, नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह की स्वच्छता प्राथमिकता से की जा रही है. निर्माणकार्य क्षेत्र के जगह (राडारोडा) की भी सफाई की जा रही है. डीप क्लीनिंग अभियान के द्वारा स्वच्छ, सुंदर और निरोगी मुंबई की ओर बढ़ रहे है.
इस्कॉन मंदिर में मुख्यमंत्री ने भाविकों से साधा संवाद
इस्कॉन मंदिर में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भाविकों से संवाद साधा. इस दौरान मंदिर समिति की ओर से मुख्यमंत्री को सम्मानित किया गया.
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने कहा कि महाराष्ट्र में इस्कॉन के 39, वहीँ मुंबई में करीबन चार सेंटर है और 897 मंदिरों का व्यवस्थापन और सामाजिक उपक्रम इस्कॉन के द्वारा चलाएं जाते हैं. शाला और अस्पतालों में जरुरतमंद छात्र और मरीजों को मदद करने के साथ-साथ पर्यावरण की रक्षा के लिए विभिन्न उपाययोजना, समाज के सभी वर्गों के सामाजिक सेवा की प्रेरणादायी ऊर्जा देने का काम इस्कॉन कर रहा है. साथ ही मुंबई महापालिका के 160 शालाओं में 27 हजार विद्यार्थियों को और नवी मुंबई महापालिका के 23 हजार विद्यार्थियों को पौष्टिक आहार देने के काम भी किया जाता है.
मुख्यमंत्री श्री. शिंदे ने बताया कि इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस देश को एक ऊंचाई पर ले जाने का काम किया है. महासत्ता की ओर ले जाने का काम किया है. सही मायने में देश का सम्मान समूचे विश्व में बढाया है. इसलिए इस देश की, राज्य की और इस विश्व की सेवा करने में आपका योगदान अपेक्षित है.
स्वच्छता के लिए मुंबई महापालिका कर्मचारी तथा अधिकारी तक ही यह अभियान सीमित न रखते हुए स्वच्छता का अभियान जन अभियान होना चाहिये, इस तरह का काम हमें ध्यान देते हुए करने की बात मुख्यमंत्री
श्री.शिंदे ने कही.
मुंबईच्या स्वच्छतेचा 'खरा हिरो स्वच्छता कर्मचारी' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम जुहू बीचवर समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र चालवून
मुंबईच्या स्वच्छतेचा 'खरा हिरो स्वच्छता कर्मचारी'
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम
जुहू बीचवर समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र चालवून मुख्यमंत्र्यांकडून स्वच्छतेची पाहणी
मुंबई, दि 9:- मुंबईकरांच्या आरोग्यासाठी,मुंबई च्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, स्वच्छ्ता अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि विविध प्रकारची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सयंत्रे व वाहने वापरण्यात येत असल्यामुळे परिसर कमी वेळात अधिक दर्जेदारपणे स्वच्छ होत आहे. लोकांनाही यामुळे परिसर स्वच्छ राखण्याची सवय अंगवळणी पडते. स्वच्छता अभियान ही आता एक लोकसहभाग लाभलेली लोकप्रिय चळवळ झाली आहे. लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग या अभियानात आहे, ही बाब देखील नक्कीच प्रेरणादायी आहे. संपूर्ण मुंबई शहरात टप्प्या टप्प्याने डीप क्लीनिंग मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाद्वारे वाढत्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीतील भागातही ही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे होत आहेत. यामध्ये रस्ते,नाले, फूटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे.बांधकाम क्षेत्रातील राडारोडा याचीही सफाई करण्यात येत आहे. डीप क्लीनिंग मोहिमेद्वारे स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबईकडे वाटचाल होत असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
इस्कॉन मंदिरात मुख्यमंत्र्यांचा भाविकांशी संवाद
इस्कॉन मंदीर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री यांची ग्रंथतुला करुन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले महाराष्ट्रात इस्कॉनचे 39 तर मुंबईमध्ये जवळपास चार सेंटर असून 897 मंदिराचे व्यवस्थापन तसेच सामाजिक उपक्रम इस्कॉनद्वारे राबवले जातात. शाळा व रुग्णालयांमध्ये गरजू विद्यार्थी व रुग्णांना मदत करण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठी विविध उपाय योजना, समाजातील सर्व घटकांना सामाजिक सेवेची प्रेरणादायी ऊर्जा देण्याचे काम इस्कॉन करीत आहे. मुंबई महापालिकेच्या 160 शाळांमध्ये 27 हजार विद्यार्थ्यांना तसेच नवी मुंबई महापालिकेच्या 23 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याचं कामही केले जाते असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशाला एका उंचीवर नेण्याचे काम केले. महासत्तेकडे नेण्याचं काम केले. ख-या अर्थाने देशाचा मान जगभरामध्ये वाढवला. म्हणूनच या देशाची,राज्याची आणि या जगाची सेवा करण्यात आपले योगदान अपेक्षित आहे.
स्वच्छतेसाठी मुंबई महापालिका कर्मचारी किंवा अधिकारी एवढ्यापुरती ही चळवळ आपण मर्यादित ठेवायची नाही. स्वच्छतेची चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचे काम आपल्याला लक्ष देऊन करायचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रमाई नगरात लोटला जनसागर
संपूर्ण स्वच्छता मोहीमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपरमधील रमाई नगर येथे स्वच्छता केली. मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर परिसरातील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्ता क्र. 1 ची स्वच्छता करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. मुंबईतले संपूर्ण मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, अंतर्गत वसाहतीचे डीप क्लिनींग या अभियानाच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. यासाठी पिण्याचे पाणी आपण वापरत नाही, तर रिसायकलींग केलेले पाणी वापरतो. या मोहिमेत चार-पाच वार्डाचे मिळून किमान दोन हजार लोक एकावेळी एका परिसरात काम करीत असल्याने परिसर पूर्णपणे स्वच्छ होतो. रस्ते, गटार, नाल्या सार्वजनिक शौचालये स्वच्छ होत आहेत. झोपडपट्टी सुधार योजनेचा देखील यात समावेश केला असल्याचे श्री शिंदे यावेळी म्हणाले.
शहाजी राजे मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत विलेपार्ले (पूर्व) येथील नेहरू मार्गाच्या स्वच्छतेची पाहणी करुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन शहाजी राजे विद्यालयातील विद्यार्थ्याँशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची पाहणी करुन त्यांचे कौतुक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुल सोसायटीमध्ये आयोजित स्वच्छता जनजागृती रॅलीला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर पथनाट्य सादर केले. मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
अंधेरी पूर्व येथील गोखले उड्डाणपूलाची पाहणी
अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी पाहणी केली. या पूलाचा पहिला गर्डर नुकताच टाकण्यात आला आहे. या पुलाची पहिली मार्गिका सुरु करण्याच्या दृष्टीने ठरलेल्या वेळेत सगळी कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी संबंधितांना दिले.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात
महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा.
प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहचण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी हा प्रयत्न असणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत सुचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकास कामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर, सी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशसनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.
***
विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही
विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही
मुंबई, दि. 9 : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
'विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.
बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील माधव बाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, माजी आमदार अतुल शहा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंदीगढ, जम्मू काश्मिर, बिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.
'विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल, युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.
ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा
ठाणे मनपा क्षेत्रातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सर्वांगीण आराखडा
- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. ८: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका शाळांच्या दुरुस्तीबाबत सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येईल. सर्वोच्च प्राथमिकता असणाऱ्या शाळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शाळांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेकडे निधीची कमतरता असेल, तर जिल्हा नियोजन मंडळाकडून त्यासाठी निधी मिळण्याबाबत पालकमंत्र्यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य संजय केळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ९३ इमारती / संरचनेत एकूण १९४ शाळा व बालवाड्या भरत आहेत. शिक्षण विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाडी दुरुस्ती करण्याकरिता केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेमार्फत माहे मार्च, २०२३ पासून या शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या शाळांच्या इमारती (शाळा व बालवाडीसह) ऑडिट करण्याकरीता प्रस्ताव तयार करण्यात आला असून महानगरपालिकेच्या तालिकेवर नियुक्त असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्स मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेच्या शाळांपैकी सद्य:स्थितीत शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३४ शाळा व ११ बालवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी घेऊन निविदा मागविण्यात आल्या. सद्य:स्थितीत ही कामे महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये सुरु असून, सुमारे ७० टक्के काम पूर्ण करण्यात आले असल्याचे ठाणे महानगरपालिकेने कळविले असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळा इमारतीच्या दुरुस्तीची निकड व उपलब्ध आर्थिक तरतूद या बाबींचा विचार करून शाळा इमारती दुरुस्तीचे कामे महानगरपालिका हाती घेत आहे. तसेच या शाळांच्या इमारतींची तपासणी व सुरक्षा उपाययोजना इ. बाबी लक्षात घेता, शाळांचे दुरुस्ती व नुतनीकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
0000
नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार
नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार
-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
नागपूर, दि. ८ - नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी दिलेल्या उत्तरात मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही माहिती दिली.
राज्य शासनाच्या सुरु असेलेल्या उपयायोजनांमुळे बालकांचा मृत्युदर कमी होत आहे. नवजात शिशुंची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. राज्यात आजारी नवजात शिशूच्या उपचाराकरिता एकूण ५२ विशेष नवजात काळजी कक्ष (SNCU) स्थापन करण्यात आले असून त्याअंतर्गत श्वसनाच्या उपचाराकरिता (सीपीएपी) मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, या कक्षात बालरोग तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विशेष नवजात काळजी कक्षामधील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे प्रशिक्षण राज्यस्तरावरुन घेण्यात आले असल्याची माहिती, मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी दिली.
याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुसज्ज प्राथमिक अतिदक्षता केंद्र (PICU) तसेच बालरोग व नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) उपलब्ध आहेत. तेथे रुग्णखाटा व्हेंटीलेटरसह उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या बालकांना रुग्णालय प्रशासनातर्फे सुयोग्य उपचार देण्यात येतात. कुठलाही रुग्ण उपचाराविना वंचित राहत नाही. सर्व आजारी नवजात शिशुकरिता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधे, तपासण्या तसेच वाहतूक लाभ देण्यात येतो. तसेच नवीन सुविधा वाढविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सन २०१८-१९ मध्ये ३७ विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत होते, तर सन २०२३-२४ मध्ये ५२ विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत आहेत. माता व नवजात बालकांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी रुग्णालयांना प्रथम संदर्भ सेवा केंद्र म्हणून स्थापित केले आहे व तेथे स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, रक्ताची सोय, सोनोग्राफी, सिझेरीयन सेक्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच मोफत संदर्भ सेवा आजारी नवजात बालकांसाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली
राज्यात माता व बालकांच्या आरोग्याकडे सतत व विशेष लक्ष दिल्याने अर्भक मृत्यू दर १६ तर बालमृत्यु दर १८ झालेला आहे. देशातील मोठ्या राज्यांमध्ये हा दर कमी करण्यामध्ये राज्याचा ३ रा क्रमांक आहे. यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे.. तसेच पायाभूत सविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविदयालये यांची आवश्यकतेनुसार नवीन निर्मिती करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य श्री. रवी राणा, श्री.योगेश सागर, श्री.प्रताप अडसड, श्री.राजेश एकडे, श्री.राम सातपुते यांनी या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभाग घेतला.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...