Saturday, 9 December 2023

विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही

 

                                                  
विकसित भारत संकल्प यात्रेपासून कोणीही वंचित राहणार नाही
                                                     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

          मुंबईदि. 9 : भारतातील प्रत्येक नागरिकाचागावाचाशहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यातत्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिलायुवकशेतकरीखेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
        राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नयेयासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            'विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज  देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.

              बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी’ विभागातील माधव बागकावसजी पटेल मार्गसी. पी. टँक सर्कलभुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

            यावेळी केंद्रीय सूक्ष्मलघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेशालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकरआमदार राम कदममाजी आमदार अतुल शहामहानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचंदीगढजम्मू काश्मिरबिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.

    'विकसित भारत संकल्प यात्रेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेदेशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणेआधुनिक अवजारेवीज-पाणीरुग्णांना वेळेवर उपचार-औषधेबेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल,  युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi