Thursday, 7 December 2023

राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा

 राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत सविस्तर आराखडा सादर करावा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

            नागपूरदि. 7 : महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील 10 महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली.

          या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैनमहिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

          या योजनेचा सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेयामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल देण्याचा प्रस्ताव आहे. चांगल्या इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपन्यांची याबाबत माहिती घ्यावी. महिलांना फायदा होईल अशा प्रकारे प्रस्ताव तयार करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

         मंत्री श्रीमती तटकरे यांनी पिंक रिक्षा योजनेमुळे महिलांना होणाऱ्या फायद्याविषयीची माहिती दिली. या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिलाविधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

          राज्यातील मुंबई शहरनवी मुंबईमुंबई उपनगरठाणे व कल्याण, पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरनागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येणार आहे.

            यावेळी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना सॅनिटरी पॅड पुरवण्याबाबतच्या योजनेविषयीही सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही योजनांविषयीचे सविस्तर आराखडे सादर करुन त्यावर पुढील बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेण्याविषयीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

0000

मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार 'गुड गव्हर्नन्स' पुरस्काराने सन्मानित दी सीएसआर जर्नलच्यावतीने प्रतिष्ठेच्या

 मंत्री सुधीर मुनगंटीवार होणार 'गुड गव्हर्नन्सपुरस्काराने सन्मानित

दी सीएसआर जर्नलच्यावतीने प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड

 

मुंबईदि.7 : दी सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड' राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांना दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सर्वोत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल दिला जात आहे.

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवारदि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजनाअभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविणेराज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री.मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वासक्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राजअभिनेत्री भूमी पेडणेकर आदींनाही यावेळी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या वनेसांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणेछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य कराररायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच दूरध्वनी वर हॅलो’ ऐवजी वंदे मातरम्’ चे अभियानआपल्या देशातील नवीन संसदभवन आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीसाठी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार, 'जय जय महाराष्ट्र माझाया गीताला राज्यगिताचा दर्जा आणि नुकत्याच चंद्रपूर येथे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा अशा निर्णयांमुळे मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुरस्काराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

कर्तृत्वाचा गौरव

श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड,  आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियनलोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने मॅन ऑफ द इयर’, महाराष्‍ट्राच्‍या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टुडे सारख्‍या प्रतिष्‍ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व  होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोसायटी एक्सलेन्स अवॉर्ड’,  दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कारवृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कारबॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.

००००

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 'वंदे मातरम्' आणि राज्य गीताने सुरुवात

 विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 'वंदे मातरम्' आणि राज्य गीताने सुरुवात

 

            नागपूरदि. ७ : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असूनविधानसभा व विधान परिषदेत वंदे मातरम्‌’ आणि राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझाने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

            विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपाध्यक्ष नरहरी झिरवळमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह  मंत्री आणि विधानसभेचे स

नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण

इच्छुक मच्छिमारांनी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

     मुंबईदि. ०७ : मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातूनमत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन, सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रवर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसायनौकानयनाची मूलतत्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सन २०२३-२०२४ मध्ये १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी  प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात येणार असून मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेतअसे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी अ. ना. जावळे यांनी केले आहे.

सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३१ व्या सत्राचे प्रशिक्षणमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवामुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून ४५० रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. तो १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असणे आवश्यक असून मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक/आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थीच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यासअर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्यांची साक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई- ६१ येथे २० डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. अधिक माहितीकरिता अशोक जावळेमत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवामो.नं. ९८३३२६६२५१ आणि श्री. जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशकमो. नं ७५०७९८८५५२ यांचेशी संपर्क साधावाअसे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहितीनागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहिती

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

नागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 

          मुंबईदि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या 'नमो महारोजगार मेळाव्यातस्टार्टअप एक्सपोचे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवननागपूर विद्यापीठनागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले  असून या एक्सपोत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

        मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप म्हणजे काय ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधाइनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, ग्राहकशासनासोबत काम करण्याची संधीइनक्यूबेटर्ससाठी महत्त्वाकांक्षी नवउदयोजकस्टार्टअप्सइतर इनक्यूबेटरकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूकदांना आशादायक स्टार्टअपसोबत जोडण्याची संधी मिळेल. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजनाशासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअपइनक्यूबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळस्टार्टअप्ससाठी मार्गदर्शनइन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा याने केले आहे.

                महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना,उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

००००

नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन महारोजगार मेळाव्यात चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार

 नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

महारोजगार मेळाव्यात चाळीस हजारपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

नोकरी इच्छुक उमेदवारस्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सना सहभागी होण्याचे आवाहन

 

            मुंबई,दि ७ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'नमो महारोजगार मेळाव्याचे'  दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजताजमनालाल बजाज प्रशासकीय भवननागपूर विद्यापीठनागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. 'शासन आपल्या दारीया कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महा-मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यात ७०० नियोक्त्यांच्या माध्यमातून तब्बल ४० हजारहून अधिक जागांसाठी पदभरती होणार असून याचा लाभ घेण्याच आवाहन कौशल्यरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www. rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करूनविचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी.

मंत्री श्री.लोढा म्हणाले कीया महारोजगार मेळाव्यात स्टार्टप्सइनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स तसेच नामांकित कंपन्या सहभागी होणार असून नागपूर जिल्ह्यातील दहावीबारावीआयटीआयपदविकापदवीधरपदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत. स्टार्टप्स उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे.एकाच छताखाली इनोव्हेटर्सइनकुबेटर्स आणि इनवेस्टर्स यांच्यासाठी हा मेळावा पर्वणी ठरेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळस्टार्टअप्ससाठी मार्गदर्शनइन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे - राज्यपाल रमेश बैस सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या

 माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे

                                                                                                 - राज्यपाल रमेश बैस

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या

अधिकारी आणि विविध संस्थांचा सत्कार

 

            मुंबई, दि.7 : भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी,युद्धात अपंगत्व तसेच  सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसना करिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावेअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

      राजभवन येथे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित  सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठीजीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.

        शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्यागआणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीरडोकलामअरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट  काम करत  आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.  

            भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हाचा कालावधी हा अनेक गोष्टींवर परिणाम करणारा होता. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसाआपली शिक्षण पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. इ.स. 1700 पर्यंत भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. आज आपल्या देशाने हे गतवैभव पुन्हा प्राप्त केले असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अत्यंत अभिमानीची गोष्ट आहे. जेव्हा आपण राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवू आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळू तेव्हांच आपण आपले स्वातंत्र्य आणि आपली लोकशाही टिकवू शकतो. त्यामुळे या देशाला सर्वोत्तम सुरक्षा देणाऱ्या या शूरविरांच्या कुटूंबियांसाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज दिनासाठी  मदत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाडमुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध देणगी  देणा-या  शासकीय संस्था,शाळामहानगरपालिकाशासनाचे विविध विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी,नामवंत देणगीदार यांचा सन 2022-23 या वर्षात  ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सन 2023-24 साठी उपस्थित मान्यवरांनी ध्वजनिधी संकलनात आपला सहभाग नोंदवला.  

000

श्रीमती संध्या गरवारे/विसंअ


 

वृत्त 

Featured post

Lakshvedhi