Thursday, 7 December 2023

नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहितीनागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 नवउद्योजकांना एकाच छताखाली मिळणार स्टार्टअप एक्सपोमध्ये विविध माहिती

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

 

नागपूर येथे होणा-या नमो महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे'आयोजन

 

          मुंबईदि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागार्तर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे होणाऱ्या 'नमो महारोजगार मेळाव्यातस्टार्टअप एक्सपोचे आयोजन ९ आणि १० डिसेंबरला करण्यात येत आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवननागपूर विद्यापीठनागपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत या एक्सपोचे आयोजन करण्यात आले  असून या एक्सपोत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

        मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप म्हणजे काय ते यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत.स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधाइनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर, गुंतवणूकदार, ग्राहकशासनासोबत काम करण्याची संधीइनक्यूबेटर्ससाठी महत्त्वाकांक्षी नवउदयोजकस्टार्टअप्सइतर इनक्यूबेटरकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणूकदांना आशादायक स्टार्टअपसोबत जोडण्याची संधी मिळेल. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजनाशासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअपइनक्यूबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगाला लागणारे मनुष्यबळस्टार्टअप्ससाठी मार्गदर्शनइन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्सइनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा याने केले आहे.

                महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना,उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi