सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 1 October 2023
अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष
अन्नपुर्णेचे किंवा सुगरणीचे घरातले अन्नपदार्थ चांगले ठरविण्याचे काही निकष
★आमटी कशी एकसंध असावी....डाळ व पाणी फारकत झाल्यासारखे वेगळे -वेगळे नको.
★भात कसा मोगर्याच्या कळ्यांसारखा दिसावा. पांढराशुभ्र, मोकळा पण मऊ शीत असावे.
★भाजी नुसती तिखट व तेलकट म्हणजे चवदार नाही. योग्य तितका मसाला पण असावा.
★पुरणपोळी मधे अंगठ्याने दाबून मधे खळगा करता आला पाहिजे व त्यात तूप घेता आले पाहीजे .इतके पुरण असावे.
★भाकरीला पोट व पोळीला काठ असता कामा नये.
★हिरवी चटणी म्हणजे नुसता नारळाचा चोथा नको. पुरेसा तिखटपणा असावा.
★तूप कणिदार व रवाळच असलं पाहीजे नाहीतर डालडा किवा तेल वाढल्यासारखे वाटते.
★चहा दाट असला तरी चहा म्हणजे साखरेचा पाक नको (खडा चम्मच). त्याला चहाचा सुगंध आला पाहिजे,रंघी लाल किंवा काळपट नसावा. चहा योग्य तितका मुरलेला असेल तरच तरतरी येते.
★ताक कसं थोडे आंबट व मधुर असावे. नाहीतर नुसते नासवलेले दूध वाटते.
★जेवायला काहीही करा,पण जेवण चवदार व वेळेत बनवा. भूक परतली तर जेवणाची मजा जाते.
★जेवणाचे ताट इतके सुबक व स्वच्छ रीतीने वाढावे की,भूक नसणार्यालाही जेवावेसे वाटले पाहीजे. नाहीतर जेवणाचे अयोग्य पद्धतीने वाढलेले ताट म्हशीला अंबोण ठेवल्यासारखे दिसते.
★सगळ्यात शेवटी महत्वाचे म्हणजे, जेवणार्याने इतके आकर्षक पध्दतिने जेवावे की, तुम्हाला जेवताना कोणी पाहीले तर,त्यानाही भूक लागली पाहीजे. नाहीतर एकेकजण इतके किळस वाणे जेवतात की,शेजारी जेवणार्याची भूकच मरते.
★पदार्थ खाण्यापूर्वी मला आवडत नाही असं म्हणू नये आधी खाऊन पहावा आवडला नाही तर परत घेऊ नये पानात काही टाकू नये आज कोणती भाजी आहे विचारून नाक मुरडणे चांगले नाही.
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे।.
ज्ञानवैराग्य सिद्यर्थम्
भिक्षांदेहिच पार्वती ।।
एक साथ एक तास स्वच्छता' अभियान मोहीम उत्स्फूर्तपणे सुरुवात भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वत्र 'एक साथ एक तास स्वच्छता' या अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात हे अभियान संपूर्ण विधानभेत पूर्ण ताकदीने राबवणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिवार, आकुर्ली रस्ता येथे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आमदार भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे. कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला तीन ठिकाणी आणि कांदिवली पूर्वमध्ये ठिकठिकाणी या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. येणाऱ्या काळातही स्वच्छता अभियान आम्ही पूर्ण ताकदीने राबवू. यावेळी कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर ते आकुर्ली रस्ता अशी तासभर स्वच्छता करण्यात आली.
या अभियानात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, एनएनएसचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कांदिवली पूर्व विधानसभेत सर्वत्र स्वछता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा
ला.
डीजे वाले बाबु -मला अंध नका कर, हृदय कमकुवत नका कटू
डीजे वाले बाबु -मला अंध नका करु ........
कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा! आत्ता सध्या D J च्या ट्रेण्डिंग गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला !
दुसर्याच दिवशी मी'नेहमी प्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो .
थोड्या वेळात ;एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्रार्थमिक तपासणी करून बघितला तर त्याची नजर खूपच कमी झाली होती मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणी साठी घेतले. बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळे होते आणि नेत्रपटलावर भाजल्या सारख्या जखमा आढळल्या.
नेहमी प्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं कि काही मार लागला होता का? , किंवा तू काही ग्रहण बबघितले का? ,कि कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉसिटीव्ह नव्हते . खोलवर विचार केल्या वर त्याने सांगितलं कि काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला .
मग मनात पाल चूक चूक ली आणि लेसर शो चा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली.
मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं .पुढील दोन तासात असेच आजून दोन रुग्ण आलेत त्यांना पण रेटिना वर याच प्रकारचे चित्र दिसले.
मग मात्र मी आमच्या नेत्र रोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्प्पिटल ला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.
बापरे! म्हणजे ५ च्या वर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शो चे शिकार झालेले पहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्ट चे असतील.
हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा
नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत.
हा काही तरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृती साठी हा पत्रप्रपंच केला.
मग प्रश्न पडला कि, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले कि या green लेसर चे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थ वर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले त्यांनाच हे प्रकार घडले.
आपण लहानपणी भिंग घेऊन ज्या प्रमाणे ऊन्हात कागद पेटवायचो तसाच प्रकार या लेसर ने या तरुणाई वर केला होता.
असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल . आपल्या कडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमको गिरी साठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसर चा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही.
या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या कॅर्रीयर साठी किती भयावह असेल? यातील बरीच मंडळी ऊच्च शिक्षण घेणारी होती.
प्रशाशनाला याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबावा
नाहीतर लातूरच्या अंनत चतुर्दशीच्या भूकंपा प्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.
लेखक
डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )
डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )
जनहितार्थ
नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना
[लक्षवेधी मास मीडिया : 😇🤔🫲🖐️✊ok मी पण ह्यावर human right commission la apply करते,मिरवणूक, वराती हॉस्पिटल रस्त्यावरून जातात तेव्हा छोटी बालके,आजारी,वृद्ध, माणसांना सहन होत नाही अवजाचे दणके,हृदयात कल येते, कानाचे पडदे phàtail ,सहन होत नाही,वर्गणी देतानाच त्यांना कल्पना द्यावी सर्व सोसायटी ने ठराव करावा,नगरसेवकांना ही अट सांगावी. सुधारणा आरोग्याशी निगडित असेल तर सर्वांनीच आवाज उठवला पाहिजे
स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे
स्वच्छतेसाठी महाश्रमदानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
मुंबई. दि.30 : दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाअंतर्गंत ‘कचरामुक्त भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राज्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘1 तारीख, एक तास’ उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक गावात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण भागात सुमारे 56,786 ठिकाणी नियोजन करण्यात आले असून यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
या पंधरवड्यानिमित्त दैनंदिन स्वच्छता विषयावर उपक्रम राबविण्याबाबत जिल्ह्यांनी नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सद्यस्थितीत 19,461 उपक्रम राबविण्यात आले असून सुमारे 95,84,680 नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे राज्यात स्वच्छतेचे जनआंदोलन उभारले गेले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या प्रशासनाबरोबर ग्रामपंचायती व नागरिकांचा सहभाग मोलाचा आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, खुल्या जागा येथे साफसफाई, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागाने नदी, समुद्र किनारे, नाले काठावरील व तळ्यातील प्लास्टिक कचरा गोळा करण्याबाबत मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर स्वच्छता मोहिमेत राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह महिला बचतगट सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वंयसेवी संस्था, युवा ग्रुप, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
000
Featured post
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...