Wednesday, 12 July 2023

राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता

 राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता


- मंत्री सुधीर मुनगंटीवार


जीएसटी परिषदेची 50 वी बैठक


            नवी दिल्ली, 11 : वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.


            वित्त मंत्रालयाच्यावतीने आज वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अर्थमंत्री निर्मला सीतारामन होत्या. बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या परिषदेस राज्याच्यावतीने उपस्थित होते. यासह राज्याच्या वित्त सचिव शैला ए. आणि जीएसटी आयुक्त राजीव कुमार मित्तल उपस्थित होते. आज पार पडलेल्या 50व्या बैठकीत विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. 


            बैठकीनंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले, आज झालेल्या वस्तू व सेवाकर परिषदेच्या महत्वाच्या बैठकीत राज्यात वस्तू व सेवाकराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात 7 अपिलीय न्यायाधिकरण असावे, अशी राज्याची मागणी होती. आजच्या बैठकीत ही मागणी मंजुरी करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


            ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत (हॉर्स रेसिंग), कॅसीनो या बाबींवर आता 28% टक्के कर आकारण्यात येणार असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. कायद्यामध्ये ऑनलाईन हा शब्द नसल्याने यासंदर्भात काही खटले न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र कायद्यात अतिशय स्पष्टता आणण्यात आल्यामुळे ऑनलाईन गेमिंगचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे राज्याच्या महसुलात निश्चितच भर पडेल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केले.

बाणगंगा परिसर सौंदर्यीकरण आणि विकासकामांचा

 बाणगंगा परिसर सौंदर्यीकरण आणि विकासकामांचा


पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 11 : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कामांचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.


            पहिल्या टप्प्यात तलावातील अतिक्रमीत बांधकामे काढून परिसरात धार्मिक स्थळाला साजेशी रोषणाई करणे, परिसरातील घरांना एकसारखी रंगसंगती करणे, तलावातील वाहून जात असलेले पाणी थांबवणे ही कामे हाती घेण्याची सूचना श्री.केसरकर यांनी यावेळी केली. याचबरोबर नैसर्गिक सौंदर्याला बाधा न येता तलावाकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांची दुरूस्ती, ज्येष्ठ नागरिकांना आधारासाठी रेलिंग, कपडे बदलण्यासाठी खोली, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. या परिसरातील झोपडीधारकांना इतरत्र हलविणे, तलावातील अतिरिक्त माशांची व्यवस्था आदींबाबत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग आदींची एकत्रित बैठक आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी सल्लागार संस्थेमार्फत परिसर विकासाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. या बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांच्यासह जीएसबी, काशीमठ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


0000

Tuesday, 11 July 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेनिर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण

 




उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेनिर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण


            मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण झाले. निर्भया वाहन पथकात नव्याने 40 चारचाकी वाहने तर 184 दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत.


            नरिमन पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार मंत्री अतुल सावे, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्विक रिस्पॉन्स टीम या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. नवीन वाहनांचा पथकात समावेश होत असल्याने पथक नक्कीच अधिक कार्यक्षम बनेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सां

गितले.


घसा खवखवणे,घसा कोरडा पडणे.*

 *घसा खवखवणे,घसा कोरडा पडणे.*


दोन मिर्याची पुड किंचित हळद, किंचीत काथाची पुड मधात घ्यावी. काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.


गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खायची. मध व जेष्ठीमध पावडर, व हळद, कोरफडीचा


गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा. दोन


वेळा.


हळद मिठाच्या गुळण्या कराव्या तीन वेळा एक


एक लिटर पाण्याच्या


गरम पाण्यात तुरटी फिरवून गुळण्या करा नंतर चमचाभर मध खा सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री


 वैद्य.गजानन


पुणे तथे काय उणे

 शेजारच्या घरातून साजूक तूप-जिऱ्याच्या फोडणीचा सुगंध येत होता. कॅलेंडरमध्ये पाहिलं. आज चतुर्थी आहे हे समजलं. मग मी एक मध्यम आकाराचा डबा घेतला. त्यात अर्धा डझन केळी घालून शेजारच्या काकूंकडे गेलो. गावाकडची स्पेशल गावठी केळी खास तुमच्यासाठी आणलीत असं सांगितलं. तब्बेतीची चौकशी केली. काकू बारीक दिसत आहेत असंही सांगितलं. काकू खुश झाल्या. घरी परतलो आणि सोफ्यावर पाय पसरून फेसबुक वाचू लागलो. अपेक्षेप्रमाणे पाचच मिनिटात बेल वाजली. मी आनंदाने दार उघडलं. काकू डबा परत द्यायला आल्या होत्या! मी स्मितहास्य करत डबा घेतला. दार बंद करून खमंग साबूदाणा खिचडी खायला सज्ज झालो. डबा उघडताच निराश झालो. काकूंनी दोन मोठी उकडलेली रताळी घालून डबा परत केला होता. कोकणातील युक्त्या पुण्यात चालत नाहीत याचा पुनःप्रत्यय मिळाला. 


एका नव्याने पुण्यात गेलेल्या कोकणी माणसाची व्यथा

😂😂😂

कच्ची पपयी.*

 *कच्ची पपयी.*



काही आवश्यक माहिती. शरीरातील वाढतं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कच्ची पपई हा रामबाण उपाय ठरतो. हा नैसर्गिक उपाय असल्याने कच्ची पपई खाल्ल्याने कुठलेच साईड इफेक्ट्स होत नाहीत.शरीरात युरिक अ‍ॅसिड वाढल्याने विविध आजारांना आणि दुखण्यांना सामोरं जावं लागतं. संधिवात म्हणजेच अर्थरायटिस सारखं गंभीर दुखणं कोणत्याही वयात होऊ शकतं. यासाठीच युरिक अ‍ॅसिड आणि इतर अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचं शरीरातील वाढणारं प्रमाण नियंत्रणात राखणं गरजेचं आहे. संधिवात हा आजार बहुतांशपणे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत दिसून येणारा आजार आहे. या आजाराची लागण होऊ नये यासाठी आहारात कच्च्या पपईचा वापर अनिवार्य ठरतो. संधिवात झालेल्या व्यक्तींना उठणं, बसणं, फिरणं या साध्या हालचाली करताना अत्यंतिक वेदना होतात.शरीसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंटचं आणि खनिजांचं, जीवनसत्त्वांचं प्रमाण कच्च्या पपईत भरपूर प्रमाणात आढळून येतं. कच्च्या पपईत कॅलरीजचं प्रमाणही अतिशय कमी असतं तर व्हिटॅमिन सी, फोलेट अर्थात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई यांचं प्रमाण मुबलक असतं. या तीन व्हिटॅमिन्समुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहतं, पर्यायाने संधिवाताच्या पेशंट्सच्या तब्येतीला आराम पडतो.शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात राहण्यासाठी दररोज सकाळी कच्च्या पपईचा ज्युस घेणं गुणकारी आहे. या ज्युसमध्ये लिंबू किंवा मध घालून सेवन केल्यास तो शरीराला विपुल प्रमाणात आवश्यक ते पोषक घटक देतो. हा ज्युस सकाळी उठल्यावर अनुशापोटी घेतल्यास निश्चितच खूप फायदा होतो. इतकंच नाही तर वजन घटवण्यासाठी ही कच्ची पपई वरदानच ठरते. यासोबतच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात कच्च्या पपईच्या भाजीचा नियमितपणे समावेश केल्यास तब्येतीसाठी गुणकारी ठरतं. फक्त कच्च्या पपईच्या भाजीला थोडीशी मेथी आणि हिंग यांची फोडणी देऊन हळद आणि मीठ घालून शिजवून घ्यावी. म्हणूनच शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यास अँन्टिबायोटिक् घेण्याऐवजी नैसर्गिक अशा कच्च्या पपयांचा आहारातला समावेश विविध आजारांना रोखतोच, पण तब्येतही तंदुरूस्त ठेवतो.        प्रमोद पाठक.




नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांची उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट

 नेदरलँडचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांची




प सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या समवेत सदिच्छा भेट

मुंबई ११: भारत आणि नेदरलॅंड देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेदरलँडचे मुंबईतील कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी व्यक्त केले.


श्री. हेल्डन यांनी आज विधानभवनातील उप सभापती यांच्या दालनात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. हेल्डन यांच्यासमवेत नेदरलँड उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सौरभ सांगळे हे देखील उपस्थित होते.


युरोपीय देशांमधील संसद, संसदीय समित्या, महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला संरक्षण विषयक कायदे, ज्येष्ठांसाठीचे कायदे, बाल आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींसाठी चर्चा-अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. नेदरलँडमध्येदेखील अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. नेदरलँडमधील आगामी अभ्यासभेटीसंदर्भातील नियोजन यादृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. भारत आणि नेदरलँडचे संबंध व्यापार आणि सामाजिक दृष्टीने अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा श्री. हेल्डन यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आरोग्य, कृत्रीम बुद्धीमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात आणखी करारमदार व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रात नगरपालिकास्तरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी सामजंस्य कराराच्या माध्यमातून काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत वातावरणीय बदल, प्रदूषण, महिलांचे सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरूष समानता यासंदर्भात विचार मांडले. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जागतिक महिला धोरणासंदर्भात परिषद होत आहे. त्यात नेदरलँडचे प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे, असे निमंत्रण उप सभापती यांनी श्री. हेल्डन यांना 

दिले.


0000


Featured post

Lakshvedhi