Tuesday, 27 June 2023

पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा

 पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे तर वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा


- मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन


               मुंबई, दि 27 : पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.


            मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा काल घेतला, तसेच वारकऱ्यांची संवादही साधला. यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनादेखील आवश्यक त्या सूचना केल्या.


००००

भवताल खजुराहो" च्या पलीकडे !

 खजुराहो" च्या पलीकडे !

- भवताल मासिक : जून २०२३ अंक प्रसिद्ध 


“भवताल मासिका” चा जून २०२३ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्याचे कव्हर आणि पीडीएफ अंक सोबत शेअर करत आहोत. हा अंक इतर अंकांपेक्षा वेगळा आहे. यातून एका महत्त्वाच्या, पण सर्वसामान्यांसाठी त्याज्य ठरलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे. हा विषय आहे, महाराष्ट्रातील मंदिरांवर किंवा त्यांच्या परिसरात असलेली कामशिल्पं!


भारतीय संस्कृतीत बराच काळ या विषयाकडे ‘पूज्यभाव’ किंवा ‘सर्जनशीलतेची उपासना’ म्हणून पाहिले जात होते. म्हणून तर या शिल्पांना मंदिरांवर, त्यांच्या आवारात स्थान मिळू शकले. अशा विषयाला त्याज्य ठरवण्याऐवजी किंवा त्याबाबत नाके मुरडण्याऐवजी तो गांभीर्याने समजून घ्यायला हवा. या शिल्पांचा अर्थ, त्या काळातील या विषयीच्या धारणा समजून घेणे महत्त्वाचे आहे.


त्यासाठी या विषयाच्या अभ्यासक डॉ. अनुजा जोशी या ‘भवताल’ साठी "महाराष्ट्रातील कामशिल्पे" या विषयावर तीन भागांची मालिका लिहित आहेत. त्याचा पहिला भाग या अंकात प्रसिद्ध करत आहोत. या मालिकेत महाराष्ट्रातील कामशिल्पांचे स्वरूप, मांडणी, प्रकार, प्रतिकात्मकता, मंदिर कलेतील त्यांचे स्थान, तसेच इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून असलेली त्यांची उपयोजिता अशा विविध विषयांचा परामर्श यामध्ये घेतला जाणार आहे.


याशिवाय या अंकात पुढील विषयांवरही अभ्यासपूर्ण लेख आहेत=


• मान्सूनची "केरळ स्टोरी"

• "कोतवाल" चा कोतवाल कोण बनेल?

• रानकुत्री, वानरे, खवले मांजर...

• आणि बरेच काही


‘भवताल मासिका’ साठी आपण साठी नोंदणी केली आहेच. ते आपल्या संपर्कातील व्यक्तिंपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावा. त्यासाठीची लिंक सोबत देत आहोत.


नावनोंदणीसाठी लिंक:

https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information


- संपादक, भवताल मासिक

........



"भवताल"चे आगामी उपक्रम :


• Exploring Monsoon @Cherrapunjee

(चेरापुंजी-मेघालयातील मान्सून इको-टूर)

१८ ते २२ जुलै २०२३


माहितीसाठी लिंक :

https://bhavatal.com/Ecotour/Meghalaya


• महाराष्ट्राचे पाणी

(पाण्याचे सर्व पैलू मांडणारा ऑनलाईन, वीकेंड सर्टिफिकेट कोर्स)


ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ : घोषणा लवकरच...

https://bhavatal.com


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and


 sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

वृतकान असेच करायचे असतें, पहा तर खर


 

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

 आहे.बस्ती🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿𝙵𝚋 वरून

*"🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌩️🌩️⛈️पावसाळा आणि आरोग्य"*


      आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद व हेमंत.

     ग्रीष्म(उन्हाळा) ऋतुनंतर येणारा वर्षा ऋतु हा सर्वप्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो. ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते, हवेतील रुक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थीती दाखवु लागते. वातावरण शीत व उल्हासित करणारे होते.

     कवींचा व प्रेमी युगुलांचा आवडता रोमॅंटीक ऋतु सुरु होतो. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतु चांगल्या बदलांसोबत काही वाईट बदल देखिल सोबत घेऊन येतो व यामुळे नंतर मात्र शरीरबल कमी करुन व्याधी उत्पन्न होण्यास अनुकुल ठरतो.


     हवेतील आर्द्रता व सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणु, विषाणुंच्या वाढीसाठी पोषक असतो. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढु लागते. परंतु आयुर्वेदाने हजारो वर्षांपुर्वी या ऋतुतील बदलांविरुद्ध राहणीमान व आहार कसे बदलायचे याचे वर्णन करुन ठेवले आहे.


    वर्षाऋतु हा उत्तरायणामधे येणारा ऋतु असुन या काळात शरीर बल हे कमी असते. तसेच जाठरग्नि मंद झाल्यामुळे पचन शक्ती देखिल मंदावते. यामुळेच रोगप्रतिकार शक्ती देखिल कमी होते.


     हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असुन या काळात शरीरातील वात वाढतो व तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात.

    वात प्रकोपास पोषक वातवरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात, आमवात,

दमा, मनक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार अशा आजारांना उत्पन्न करतो.

     तसेच या काळातील दुषित पाण्यामुळे देखिल अतिसार, काविळ, त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात. 

     यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षा ऋतुमधे देखिल आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमधे विशिष्ट आहार व राहणीमान ( ऋतुचर्या) यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.   


*✅वर्षा ऋतूमधे आहार पद्धती* -:


- आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे. त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.


- वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे युष ( सुप) हे पाचक व जठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कटु (तिखट),तिक्त(कडू),कषाय(तुरट) चवीचे पदार्थ या ऋतुत कमी प्रमाणात सेवन करावेत.


- हलके मसाले जसे लसुन, आले, हींग, हळद, मिरे यांच्यासारख्या मधुर, अम्ल, लवण (खारट) रस युक्त पदार्थांचा सुयोग्य वापर आहारात करावा.


*पावसाळ्यातील आहार आणि पथ्ये-:*


- आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा, यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.


- या ऋतुमधे मांसाहार टाळावा व मासे तर पुर्णपणे टाळावेत कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखिल दुषित असण्याची संभावना अधिक असते, यामुळेच या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते.


- हिरव्या पालेभाज्या या ऋतुमधे दुषित असतात व त्यावर जीवाणु, विषाणुंची अतिरिक्त वाढ होत असते, त्यावर अळ्या व लार्वा यांचीही वाढ होत असते तसेच या कालावधित असा भाजीपाला वातवर्धक असतो त्यामुळे तो कमी खावा व खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.


- या कालावधीत बाहेरचे तळलेले व चमचमीत खाद्य पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते परंतु त्याने पचनाचे व इतर आजार वाढु शकतात त्यामुळे *भजी, वडापाव, चाट* असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.


*पावसाळ्यातील जीवनशैली -:


- या ऋतुमधे जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री/ रेन कोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पुर्ण कोरडे करावे, पावसात अधिक भिजणे टाळावे.


- कपडे योग्य न सुकल्यामुळे बर्‍याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परीधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो त्यामुळे परीधान करावयाचे सर्व बाह्य व अंतर्वस्त्र चांगले सुकवुन मगच वापरावेत.


- दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते व ती वर्षा ऋतुत कमी झालेली पचनशक्ती अजुन कमी करण्यास मदत करते.


- घरातील वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवावे, आजुबाजुस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामधे अगरु, गुग्गुळ, चंदन, कापूर यांचे धूपण केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो व वातवरण सुगंधी व आल्हाददायक राहते. आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवुन डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा.


-अभ्यंग्यमाचरेन्नित्यं, स जराश्रमवातहा । (अ.सू. २/८)। 

 स्नानापुर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करने वातनाशक आहे त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.


- या ऋतुमधे प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमधे केले आहे. पक्वाशय हे वाताचे मुल स्थान सांगितले आहे.बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असुन याने वाताची अर्धी चिकित्सा त्वरीत होते यामुळे या ऋतुत बस्ती हे पंचकर्म करुन घ्यावे.


- जास्त शारीरीक श्रम करणे टाळावे, रात्री जागरण करु नये. तसेच मद्यपान टाळावे असे वर्णन आयुर्वेद ग्रंथामधे आहे.


   वर्षा ऋतु हा आजार होण्यास पोषक ऋतु  असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात योग्य ऋतुचर्या पाळल्यास व योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतु आनंदी, आल्हाददायक व निरोगी होवून जाईल.

हो नक्कीच सुधारणा होईल.

Thank you..🙂

भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*

 *भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*


भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यामुळं शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळंच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो. त्यामुळं शरीराला आवश्यक पोषकघटक मिळतात. आणि मधुमेह, रक्तदाबाची समस्या कमी होते.


याशिवाय गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठीही भेंडी ही फायदेशीर मानली जाते. महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांच्या शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळतात. बाळंतपण झालेल्या महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांना अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळत असतातभारतातल्या लोकांना अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायला आवडतं. भेंडी ही त्यातलीच एक चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. भेंडीत असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात. भेंडीत असलेल्या फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं त्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं

वजन कमी करण्यासाठी

भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पण केवळ भेंडीची भाजी खाऊन वजन कमी होईल अजिबात नाही. पण याने वजन कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 


हृदयरोगांपासून बचावासाठी


भेंडीमध्ये असलेल्या पेक्टिन विरघळणारं फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आणि याप्रकारे भेंडी हृदय रोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेल्या करसेटिन तत्व कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिकरण रोखण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होऊ शकतो. 


डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी


फायबर भरपूर प्रमाणात असलेली भेंडी पचन क्रियेसाठी आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भेंडी अ‍ॅंटी डायबिटीक गुण एंजाइम मेटाबॉलिज्म कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी आणि इंसुलिनचं उत्पादन वाढण्यासाठी मदत करते. 


इम्यूनिटी मजबूत करा


भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. १०० ग्रॅम भेंडी आपली व्हिटॅमिन सी ची ३८ टक्के गरज भागवते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे फायदेशीर ठरते.


 प्रमोद पाठक.



मला बाई स्लीम व्हायचंय

 वजन कमी करायचंय मला,मला बाई स्लीम व्हायचंय.

मेदोवृध्दी अर्थात लठ्ठपणा Obesity✍

उपाय

१)सकाळी १कप कोमट पाण्यात १/४;१/२ चमचा काताची पुड

२)रात्री झोपतांना १चमचा तिळाचे तेल १डाळीच्या दाण्या ऐवढे सेंधव घालून प्यावे.

३)कुळीथाचे पाणी शिजवून प्यावे.

४)जेवणानंतर ३चमचे सफरचंदाचा शिरका व्हेनिगर प्यावा. मेद झडतो.

५)आहारात कोबी,गाजर,मुळा यांचा वापर करा.

६)सकाळी त्रिफळा पुरक म्हणून दुधा सोबत व रात्री रेचक म्हणून गरमपाण्यात झोपतांना घ्या.

फरक शंभरटक्के पडेलच.

७)तिळाचं तेल एक चमचा व एक डाळी एवढं सैंधव.

८)दालचिनी पावडर चा काढा करून घ्या.

९)गरमपाणी लिंबू मध रोज घ्या.


फक्त तोंडावर ताबा हवा.धर की खा करु नये🙂

वैद्य.गजानन 


_

मानवी स्वभाव, गमवण्याचे दुःख तर कमवणायच आनंद

 


Featured post

Lakshvedhi