खजुराहो" च्या पलीकडे !
- भवताल मासिक : जून २०२३ अंक प्रसिद्ध
“भवताल मासिका” चा जून २०२३ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. त्याचे कव्हर आणि पीडीएफ अंक सोबत शेअर करत आहोत. हा अंक इतर अंकांपेक्षा वेगळा आहे. यातून एका महत्त्वाच्या, पण सर्वसामान्यांसाठी त्याज्य ठरलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे. हा विषय आहे, महाराष्ट्रातील मंदिरांवर किंवा त्यांच्या परिसरात असलेली कामशिल्पं!
भारतीय संस्कृतीत बराच काळ या विषयाकडे ‘पूज्यभाव’ किंवा ‘सर्जनशीलतेची उपासना’ म्हणून पाहिले जात होते. म्हणून तर या शिल्पांना मंदिरांवर, त्यांच्या आवारात स्थान मिळू शकले. अशा विषयाला त्याज्य ठरवण्याऐवजी किंवा त्याबाबत नाके मुरडण्याऐवजी तो गांभीर्याने समजून घ्यायला हवा. या शिल्पांचा अर्थ, त्या काळातील या विषयीच्या धारणा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
त्यासाठी या विषयाच्या अभ्यासक डॉ. अनुजा जोशी या ‘भवताल’ साठी "महाराष्ट्रातील कामशिल्पे" या विषयावर तीन भागांची मालिका लिहित आहेत. त्याचा पहिला भाग या अंकात प्रसिद्ध करत आहोत. या मालिकेत महाराष्ट्रातील कामशिल्पांचे स्वरूप, मांडणी, प्रकार, प्रतिकात्मकता, मंदिर कलेतील त्यांचे स्थान, तसेच इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून असलेली त्यांची उपयोजिता अशा विविध विषयांचा परामर्श यामध्ये घेतला जाणार आहे.
याशिवाय या अंकात पुढील विषयांवरही अभ्यासपूर्ण लेख आहेत=
• मान्सूनची "केरळ स्टोरी"
• "कोतवाल" चा कोतवाल कोण बनेल?
• रानकुत्री, वानरे, खवले मांजर...
• आणि बरेच काही
‘भवताल मासिका’ साठी आपण साठी नोंदणी केली आहेच. ते आपल्या संपर्कातील व्यक्तिंपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करावा. त्यासाठीची लिंक सोबत देत आहोत.
नावनोंदणीसाठी लिंक:
https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information
- संपादक, भवताल मासिक
........
"भवताल"चे आगामी उपक्रम :
• Exploring Monsoon @Cherrapunjee
(चेरापुंजी-मेघालयातील मान्सून इको-टूर)
१८ ते २२ जुलै २०२३
माहितीसाठी लिंक :
https://bhavatal.com/Ecotour/Meghalaya
• महाराष्ट्राचे पाणी
(पाण्याचे सर्व पैलू मांडणारा ऑनलाईन, वीकेंड सर्टिफिकेट कोर्स)
ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ : घोषणा लवकरच...
https://bhavatal.com
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and
sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment