Saturday, 17 June 2023

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक

 महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक


आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा


रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या


                                                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


 


            मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.


            सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या आठ वरिष्ठ पदांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. हे प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला आहे. त्यामाध्यमातून रुग्णालयांना, आरोग्यसंस्थांना वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध झाले पाहिजे. प्राधिकरणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            प्राधिकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या संस्थेची विश्वासार्हता वाढवावी. त्याची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा, २७०० विविध औषधे आणि साहित्य खरेदी, कंत्राटी पद्धतीने पदभरती आदी बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे सचिव नविन सोना, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आरोग्य आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते.


 


००००                   

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक


गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश


 


            मुंबई, दि. १७:- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अबू आझमी, आमदार रईस शेख, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय.एस.चहल, जमाते उलेमाचे राज्याचे अध्यक्ष नदीम सिद्दीकी, विविध जिल्ह्यातून आलेले मुस्लिम धर्मगुरू आणि समाज बांधव संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण सर्व सण उत्सव नेहमीच सर्वधर्मीय बांधव एकत्र येऊन साजरे करतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी त्याचप्रमाणे ईद मध्येही आपला गृह विभाग नियोजन करत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दरवर्षीप्रमाणेच गृह विभाग या सणासाठी नियोजन करेल, आवश्यक ती दक्षता घेईल. या सणापूर्वी तीन-चार दिवस आधी पशूंची वाहतूक सुरु होते. त्यामध्ये काही अनधिकृत घटक अडथळा आणत असतील तर त्याबाबत पोलीस दक्षता घेतील. यापुर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अशी अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष दिले जाईल.


            यावेळी मुस्लिम बांधवाच्या वतीने श्री. सिद्दीकी यांनी यंदा ईद व एकादशी एकाच दिवशी आल्याचे सांगून. मुस्लिम बांधवांनी अशा प्रकारे एकाच दिवशी आलेल्या अनेक सणांच्या पावित्र्याचा नेहमीच आदर केल्याचे सांगितले. आमदार श्री. आझमी, आमदार श्री. शेख यांनी बाजार समित्यांबाहेर बकरी विक्रीस परवानगी दिल्याबद्दल व पशूवैद्यकीय तपासणी शुल्क पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आभार मानले.


0000

उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*

 *उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*


 उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही समस्या न सुटता आणखी वाढते. कारण पोटात अन्न नसल्याने अॅसिडीटी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. अशावेळी तोंड येण्याचा त्रास आणखी वाढतो. यामुळे तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला मदत करु शकतात.


*१) खोबरेल तेल...*

खोबरेल तेलात दाहकविरोधी गुणधर्म असल्याने ते सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. तोंडातील अल्सरचे चट्टे कमी करण्यासाठी तुम्ही कापसाचा तुकडा खोबरेल तेलात बुडवून ते प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून आराम मिळेल.


*२) मीठाचे काही...*

मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचे फोड अथवा चट्टे कमी होतात. मीठ हे संक्रमण बरे करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि चांगले मिसळून झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.


*३) काळे मनुके...*

तोंडातील लाल वेदनादायी चट्टे कमी करण्यासाठी तुम्हा काळे मनुके सुमारे ३ तास पाण्यात भिजवून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ते खा, यामुळे पोटातील उष्णता कमी होत अल्सरपासून आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....*

 *व्यायाम व योगा करण्याचे फायदे.....* 


*1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते...*🙂🙂

व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.


*2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे...*🙂🙂

व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.


*3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो...*🙂

आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.


*4) शरीराची कार्यक्षमता वाढते...*🙂

नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.


*5) मन सकारात्मक राहते...*🙂

व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नाही. उत्साहवर्धक वाटते.

*---------------------*


*कंबर दुखी.....*🙂


*१. बाभळीची साल...*

 १.१ बाभळीची साल काढायची.

 १.२ पाण्यात टाकुन कडक उकळवा.

 १.३ त्या पाण्याने गुढघे किंवा पाय दुखत असेल तिथून धुवून टाखा. १० मिनटात फरक पडतो. 


*२. जवस...* 

 २.१ रोज सकाळ संद्याकाळी बडी सौफ झाल्यासारखे जेवण झाल्यावर जवस खा.

 २.२ जवस शरीरातील वंगण सारखे काम करते, गुडखे दुखी ला खूप फरक पडतो.


*३. पांढरे तीळ...* खात जा, हाडे मजबूत होतात.


*४. एरंडेल तेल...*

 ४.१ भाकरीचा गोळ्यात अर्धा चमचा एरंडेल तेल घाला.

 ४.२ त्याची भाकरी १५ दिवस रोज रात्री जेवताना खा.

 ४.३ पंधरा दिवस करा हे, याने गुढघे दुखी, कंबर दुखी बरी होते.


*५ तिळाचे तेल...*

 ५.१ गुडखे फारच दुखत असतील तर, तिळाचे तेल सकाळ - संद्याकाळ प्या.

 ५.२ त्या वर कोमट पाणी प्या.

 ५.३ पंधरा दिवसात गुडखे दुखी थांबते.


*संतोष ढगे,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

ज्ञानात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे

 ज्ञा





नात वृद्धी होण्यासाठी वाचन महत्वाचे


बँक व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


अलिबाग, (प्रतिनिधी) : जीवनात पुढे जाऊन चांगले करिअर घडवायचे असल्यास आणि ज्ञानात वृद्धी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने हाती मिळेल त्या पुस्तकाचे वाचन करावे. असे मत अलिबागच्या एन.के.जी.एस.बी. या बँकेचे शाखा व्यवस्थापक आतिष म्हात्रे यांनी आज येथे केले.


रायगड जिल्हा फोटोग्राफर्स अँन्ड व्हीडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या स्व. अनंत पाटील सभागृहात अलिबाग तालुक्यातील दहावी व बारावी परिक्षेत चांगले यश संपादन केलेल्या गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी असोसिएशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.


चांगले करिअर घडविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शक्यतो परदेशी जाऊन चांगले शिक्षण घ्यावे असे सुचवितांनाच आपली संगत चांगल्या माणसांबरोबर असल्यास जीवनात आपण चांगले यश संपादन करु शकतो असेही म्हात्रे म्हणाले. अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा सुप्रसिद्ध वकील मानसी म्हात्रे यांनी गुणवंतांचा सत्कार करताना दहावी आणि बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असून, या टप्प्यावरच त्यांच्यात सामाजिक संस्कार रुजविण्याचे काम असोसिएशनने केल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अलिबाग नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुप्रसिद्ध वकिल प्रविण ठाकूर यांनी गुणवंतांचे अभिनंदन करीत या गुणवंतांचा सन्मान केल्याबद्दल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे कौतूक केले. अश्विनी क्लासेसच्या अश्विनी मेहता यांनी पालकांना सुचना करताना पालकांनी आपले निर्णय मुलांवर लादू नका असे सांगत, त्यांना त्यांचे करिअर करण्यासाठी त्यांनाच निर्णय घेऊ द्या असे आवाहन केले.  


अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे हे १५ वे वर्षे असून, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्य़ाचे सांगितले. या कार्यक्रमाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही असोसिएशनतर्फे राबविले जात असल्याचे मालोदे यांनी सांगितले. याप्रसंगी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, सचिन राऊळ, रायगड फोटोग्राफर्स असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, अलिबागकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीतम सुतार यांनी केले, तर अमोल नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले .....................................समाप्त......................................

वारी -लबाड लांडगा द्वांग करताय, लगीन करायचं सोंग करतय कटू अनुभव

 "संस्कृतीची कीर्ती सांभाळली पाहिजे"

वारी -लबाड लांडगा द्वांग करताय, लगीन करायचं सोंग करतय 

"अति तिथे अवज्ञा" हा जगाचा नियमच आहे मित्रहो..

वारीत चालणारा प्रत्येकजण वारकरी नसतो. त्याला पोट असलं तरीही ते माणसाचं पोट असतं, बकासुराचं नसतं, हे आपण लक्षात कधी घेणार?


वर्षानुवर्षं मीच काय, माझ्यासारखे शेकडो लोक पाहत असतील - विविध पदार्थ किंवा वस्तू वाटणाऱ्या लोकांच्या अंगावर ही वारीत चालणारी माणसं चक्क धावून जातात. त्यांच्या हातून पदार्थ अक्षरशः ओरबाडून घेतात. वाटणाऱ्या माणसाला प्रचंड धक्काबुक्की करतात. कधी चिमटे काढतात, कधी त्याच्याशी अर्वाच्य भाषेत भांडतात सुध्दा...!


आज माझ्या शेजारी एक बाई बिस्किटांचे पुडे वाटण्यासाठी उभ्या होत्या. त्या अगदी शांतपणे देवाचं नाव घेत घेत पुडे वाटण्याच्या प्रयत्नात होत्या. पण पंधरावीस जणांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांची पिशवी चक्क हिसकावून घेऊन तिथून पोबारा केला. झडप घालणारे सगळे वारकरी पोशाखातलेच होते. त्यात स्त्रियाही होत्या. कपाळाला वारकरी गंध होतं, गळ्यात तुळशीची माळ होती, हातात पताका आणि टाळ होते. म्हणजे वरवर पाहता तरी वारकरी संप्रदायातीलच वाटले. पण त्यांनी त्या बाईंना धक्काबुक्की केली, त्यांच्यावरच आवाज चढवला आणि त्यांना धाडकन खाली पाडलं..! 


बरं, हे सगळं टोळकं ( कारण, ह्या प्रकारानंतर त्यांना वारकरी कोण म्हणेल?) ज्या वारीत सामील झालं होतं, त्या संतश्रेष्ठींना त्यांच्या काळात एक साधा खापराचा तुकडा सुध्दा लोकांनी मिळू दिला नव्हता, हा इतिहास आहे. पण केवळ त्या संतांच्या श्रेष्ठत्वामुळे आज लोक ह्यांना वारकरी समजून रेनकोट वाटतायत, हेल्थ कीट वाटतायत, खाद्यपदार्थ तर अमर्याद उपलब्ध आहेत, मोफत दवाखाना आहे, मोफत रुग्णवाहिका आहे, पिण्याचं शुद्ध पाणी मोफत उपलब्ध आहे...! पण ह्या सगळ्या गोष्टी योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत का? याचा पत्ताच नाही. 


कोणा एका अज्ञात परम बुद्धिमान दात्यानं आज लक्ष्मी रस्त्यावर चिकू वाटप केलं. लोकांनी घेताना मोठ्या हातानं घेतले, पण खाल्ले नाहीत. अनेकांनी चालता चालता तसेच पायाखाली टाकून दिले. त्या कुस्करलेल्या चिकूवरुन एका आजींचा पाय घसरला आणि त्या जोरात पडल्या. पलिकडून एक तरुण मोठ्या उत्साहात स्मार्टफोनवरुन गर्दीचे व्हिडिओ काढत होता, त्याचं पाठीमागं लक्षच नव्हतं. अनपेक्षितपणे त्याचा पाय अडखळला आणि तो उंचापुरा, सुदृढ तरुण त्या आजींवर धाडकन पडला. हा सगळा अनर्थ एका बापड्या चिकूमुळे घडला असला तरी, त्या चिकूची शेकडो भावंडं लोकांमध्ये वाटून टाकून, भरघोस पुण्य पदरात पाडून घेतल्याच्या आनंदात तो विवक्षित दाता निवांत होता..! 


वारकरी म्हणून वावरणारे कितीतरी लोक खरे वारकरी नाहीतच, हे सहज लक्षात येतं. पिशव्या,पोती,बोचकी असं जे मिळेल ते गच्च भरुन घेण्याकडे कल असणारे हजारो लोक आहेत. यांच्यामुळे भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? अन्नाची प्रचंड नासाडी अन् अपमान करणाऱ्यांकडून वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का? आपण वारकरी आहोत, पोटार्थी नाही, याची जाणीव यांना कुणी का करुन देत नाहीत? हाच प्रश्न फार महत्वाचा आहे. ही माणसं निश्चित अडाणी आहेत. कदाचित वारकरी संप्रदायाची शुचिता त्यांना माहितीही नसेल. पण वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्यांचं काय? 


वारकरी संप्रदायात नियम पाळण्याला आणि वडीलधाऱ्यांचा मान राखण्याला फार महत्त्व आहे. तुळशीची माळ गळ्यात घातली की,जगण्या-वागण्याची नीती पाळलीच पाहिजे. जे आपलं नाही किंवा ज्यावर आपला काहीही अधिकार नाही, त्याचा हव्यास धरणं वारकरी संप्रदायात पूर्ण निषिद्ध आहे. ज्यातलं आपल्याला काहीही माहिती नाही, आणि ज्याचे संभाव्य परिणाम काय होतील, याची कल्पना करण्याइतपत बुद्धी नाही,अशा माणसानं तर मौनातच राहायला हवं. 


वेळ काय आहे, प्रसंग काय आहे आणि आपण कसं वागतो आहोत, याचं साधं भान असू नये, याचं वाईट वाटलं. मी हौशी वारकरी नाही तर, मी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, याचं भान त्या विद्यार्थ्यानं सांभाळणं अगदी स्वाभाविक अपेक्षित होतं. "आत्ताचा क्षण संपूर्ण संप्रदायाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा क्षण असतो. माझ्यासारख्याच अनेकांना प्रस्थानप्रसंगी आत जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. कितीतरी वारकरी माझ्या वयाच्या तिपटीने मोठे असूनही त्यांनाही पास मिळालेला नाही. हजारो लोक लांबून लांबून पायी चालत आलेले असूनही त्यांनाही प्रस्थानप्रसंगाचा पास नाही. आम्ही तर आळंदीतच राहतो आणि माऊलींचं दर्शन रोजच घेतो. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. कसलाही अधिकार नसताना मी नियम मोडणं योग्य ठरणार नाही." असा विचार यांना का करता आला नाही ? हा फार महत्वाचा प्रश्न आहे.


पण काहीही कारण नसताना नियम मोडल्यानं सोहळ्याला गालबोट लागलं. वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते लागलं. मग मीडियानं त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना प्रश्न का विचारले नाहीत? हे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या ऐकण्यात नाहीत का? ज्यांना परवानगीच नव्हती असे विद्यार्थी अनधिकृतपणे घुसत होते तेव्हा त्यांचे संस्थाचालक काय करत होते ? असे प्रश्न राहुल कुलकर्णींनी विचारले नाहीत. "इतक्या वर्षांत असं कधी झालं नाही, मग आताच असं कसं झालं ? आणि यात पोलिसांची चूक आहे" असंच ते म्हणत राहिले. वारंवार म्हणत राहिले. ब्रेकिंग न्यूज सुरु राहिली, सोशल मीडियावर पडसाद उमटत राहिले. परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांनी राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळ केली. पुन्हा एकदा लोक त्यांच्या जातीवर गेले. महाराष्ट्रातल्या अत्यंत शुभ प्रसंगी आपण चुकीची गोष्ट ब्रेकिंग न्यूज म्हणून लावल्यानं लोक देवेंद्र फडणवीसांच्या थेट जातीवर गेले, याचं मिडीयाला सोयरसुतक नाही...!


वीस बावीस वर्षांचा मुलगा स्वतःच नियम मोडून, पुन्हा "महाराष्ट्रात असं पुढच्या काळातही घडू शकतं" असं म्हणतो, त्याच्या या मताशी मिडिया सहमत कसा होतो? सगळी जाणती माणसं याला थांबवण्याऐवजी दुजोरा कसा काय देतात? त्याचा संबंध ब्राह्मण जातीशी लावून लोक मोकळे कसे होतात? आणि हे सगळं प्रकरण पेटवून देण्यात आपल्या टीआरपी विषयक हावरटपणाचा वाटा सगळ्यात मोठा आहे, हे मिडीयाला अजूनही समजत नाहीय? 


आपल्या स्वार्थापेक्षा आपल्या संप्रदायाची, आपल्या सांस्कृतिक परंपरांची आणि आपल्या सामाजिक शांततेची प्रतिष्ठा फार मोठी आहे, याची जाणीव प्रत्येकालाच असली पाहिजे. त्या परंपरेला आपण झळाळी प्राप्त करुन देऊ शकत नसू तरी एकवेळ चालेल. पण तिचा अपमान होईल असं वागण्याचा अधिकार आपल्याला कुणीही दिलेला नाही, हेही समजून घेण्याची गरज आहे. वडीलधाऱ्यांनी आणि अनुभवी जाणत्यांनी तरुणांना नीट समजावण्याची गरज आहे. प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. ज्याला त्याला आपलं उत्तरदायित्व नीट ओळखता आलंच पाहिजे. 


वारी सगळ्यांचीच आहे. ती जशी देणाऱ्यांची आहे, तशीच ती घेणाऱ्यांचीही आहे. तिथं प्रत्येकाला स्वीकृती आहे. पण वारीचीही एक आचारसंहिता आहे, तिचा विचार प्रत्येकानंच केला पाहिजे. वारी निर्विघ्न पार पाडण्याचं उत्तरदायित्व प्रत्येकाचं आहे. 


संप्रदाय सगळ्यांचाच आहे. पण त्याचेही नियम आहेत, त्याचीही बंधनं आहेत. सामाजिक नैतिकतेची आणि शिस्तीची बंधनं तर निश्चित आहेत. "नाठाळाचे माथी हाणू काठी" असं साक्षात् तुकोबारायांचं वचन आहे. त्याचा विसर संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनाच पडावा, हेच आश्चर्य आहे. "मी कुणी विशेष आहे" असं कधी ज्ञानोबाराय - तुकोबाराय सुद्धा म्हणाले नाहीत, तिथं माझी काय पात्रता? असा विचार हे विद्यार्थी करु शकले नाहीत, हे या घटनेतून उघड झालं आहे. 


प्रत्येकाला सुबुद्धी देण्यासाठी परमेश्वर आहेच. पण, एकूणच सुधारण्याची आणि बदलण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांनाच...!


मयुरेश डंके

उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*

 *उष्णतेमुळे सतत तोंड येतय? मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय करत मिळवा आराम.....*


 उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही समस्या न सुटता आणखी वाढते. कारण पोटात अन्न नसल्याने अॅसिडीटी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. अशावेळी तोंड येण्याचा त्रास आणखी वाढतो. यामुळे तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला मदत करु शकतात.


*१) खोबरेल तेल...*

खोबरेल तेलात दाहकविरोधी गुणधर्म असल्याने ते सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. तोंडातील अल्सरचे चट्टे कमी करण्यासाठी तुम्ही कापसाचा तुकडा खोबरेल तेलात बुडवून ते प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून आराम मिळेल.


*२) मीठाचे काही...*

मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचे फोड अथवा चट्टे कमी होतात. मीठ हे संक्रमण बरे करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि चांगले मिसळून झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.


*३) काळे मनुके...*

तोंडातील लाल वेदनादायी चट्टे कमी करण्यासाठी तुम्हा काळे मनुके सुमारे ३ तास पाण्यात भिजवून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ते खा, यामुळे पोटातील उष्णता कमी होत अल्सरपासून आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi