Thursday, 1 June 2023

कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात

 कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात




आमदार अतुल भातखळकर यांचा पाठपुरावा

मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाचा सरकता जिना आता सुरु होणार आहे. मागील तीन वर्षांपासून हा जिना सुरु करण्यात यावा, यासाठी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपोषण, मोर्चा अशी विविध आंदोलने केली. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळाले असून गुरुवारी आमदार भातखळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.


यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, आज या सरकता जिना कामाचे भूमिपूजन झाले आहे. येणाऱ्या अडीच, तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. कांदिवली पूर्व स्थानकाचा उपयोग करणारे अशोकनगर, चाणक्य नगर, पोईसर, ठाकूर कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणच्या नागरिकांना या कामामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय गोशाळेजवळील बंद असलेला सरकत जिनाही येणाऱ्या काळात सुरु करण्यात येईल. मागील तीन वर्षापासून हा सरकता जिना बंद असणे हा २५ वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या 'कारभाराचा' हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुंबई पालिकेचा कारभार अत्यंत संथ गतीने आणि नियमांच्या जंजाळयात अडकवण्याचे काम आतापर्यंत केले, अशी टीकाही आमदार भातखळकर यांनी केली.


स्वागत प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ठाकूर सागरसिग यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विधानसभेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान

 क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली 'इंडिक टेल्स' वेबसाइट पर कार्रवाई करने का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का निर्देश


· आपत्तिजनक सामग्री की जांच कर उस पर कार्रवाई करने के लिए मुख्य सचिव को निर्देश


· महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को बख्शा नहीं जाएगा - मुख्यमंत्री की चेतावनी


 


               मुंबई, दि. 31: क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली वेबसाइट 'इंडिक टेल्स' पर कार्रवाई करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुख्य सचिव को दिए हैं।


               वेबसाइट 'इंडिक टेल्स' ने अपने प्रकाशित लेख में क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में कई आपत्तिजनक बातें लिखी हैं, कई राजनीतिक संगठनों और सामाजिक संगठनों ने सरकार के पास आपत्ति जताई है। इन आपत्तियों को संज्ञान में लेते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस वेबसाइट की सामग्री की जांच करने और इसके खिलाफ कार्रवाई करने का निर्देश दिया है।


                महापुरुषों के बारे में लिखते समय अत्यंत अध्ययनशील होना चाहिए, साथ ही लेखकों व प्रकाशकों को यह ध्यान रखना जरूरी है कि उससे उनका अपमान न हो। महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को सरकार नहीं बख्शेगी।‌ यह चेतावनी देते हुए मुख्यमंत्री शिंदे ने स्पष्ट निर्देश दिए हैं कि 'इंडिक टेल्स' के लेख में आपत्तिजनक बातें होने पर उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए।


0000

इसबगोल औषधी उपयोग

 *इसबगोल:-*


इसबगोल आता भारतामध्ये गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात इंदोर इ. ठिकाणी याची लागवड होते. इसबगोल साधारण तीन फूट उंच वाढते. या वनस्पतीला गव्हासारख्या ओंब्या येतात. त्यामध्ये इसबगोलाच्या बिया असतात. इसबगोलामध्ये सफेद, तांबडे व काळे असे तीन प्रकार असतात. त्यातील औषधांमध्ये सफेद श्रेष्ठ असते तर काळे रंगाचे औषधांत वापरत नाही.


इसबगोलात फायबरचे प्रमाण भरपूर असते


इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, वीर्यस्तंभक इ. गुणधर्म असतात.


*औषधी उपयोग:-* 


◼️वीर्यक्षय, दाह, प्रमेह यांवर इसबगोल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावे.


◼️डोकेदुखीवर इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप करावा.


◼️दमारोगात दोन ते तीन ग्रॅम इसबगोल कोमट पाण्यातून सकाळ- संध्या. द्यावे.


◼️रक्त-संग्रहणीवर इसबगोल आणि खडीसाखर चावून खाण्यास द्यावी.


◼️जीर्ण आमातिसार व रक्तातिसार यांवर इसबगोल दोन चमचे दह्यातून दोन वेळेस द्यावे.


◼️पोटात आग पडते, आतड्यांना सूज येते अशा वेळी दहा ग्रॅम इसबगोल थंड पाण्यात भिजत घालून ते फुलल्यावर खाण्यास द्यावे.


◼️कब्जरोगात इसबगोल एक चमचा रात्री झोपताना दुधातून द्यावे.


◼️अर्सेनिक (एक विषारी पदार्थ) मुळे विषार झाल्यास इसबगोल भिजवून त्यात बेदाणा, दही व गुलाबपाणी एकत्र करून द्यावे; म्हणजे विषार कमी होतो.


◼️ज्वरातिसारामध्ये इसबगोलाचा काढा करून द्यावा.


◼️धात-पुष्टतेस इसबगोल दोन भाग, वेलची एक भाग व खडीसाखर तीन भाग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.


◼️स्वप्नदोषावर इसबगोल आणि खडीसाखर समप्रमाणात एकत्र करुन त्यातून एक चमचा मिश्रण अर्धा ग्लास दुधातून झोपण्याच्या एक तास अगोदर द्यावे. झोपण्याच्या अगोदर लघवीला जाऊन झोपावे.


◼️लघवीला आग होणे, जळजळ होणे अशावेळी एक ग्लास पाण्यात चार चमचे इसबगोल भिजवून स्वादानुसार खडीसाखर मिसळवून पिण्यास द्यावे.


◼️वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर एक चमचा इसबगोल पाण्यातून द्यावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव राहते व पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.


◼️मधूमेहात याच्या सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रीत राहण्यास मदत होते परंतू इसबगोलाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होऊ शकते.


◼️गर्भिणी स्रीने इसबगोल खाणे टाळावे.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,


_*(

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण

 बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण


वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती


            मुंबई दि. 31 : बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


            राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी दिली.


            सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.


            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


0000

 पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठीनिधी उपलब्ध करुन देणार


- मंत्री संदिपान भुमरे


            मुंबई, दि. ३१ : “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.


            मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांतील प्रलंबित कामांसह विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.


            पैठण तालुक्यातील १० गावांमधील प्रकल्पबाधितांच्या २६ नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुतुबखेडा, तांदूळवाडी, तुळजापूर, अमरापूर, पिंपळवाडी पि., तारुपिंपळवाडी, आगरनांदूर, घेवरी, लाखेफळ, इसारवाडी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवाव्यात. प्रकल्पबाधित गावांमध्ये न झालेल्या कामांची चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरून संबंधित कामे तातडीने करण्यात येतील, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.


0000000

पुरस्कार प्राप्त महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्यासाठी मिळेल प्रोत्साहन

 पुरस्कार प्राप्त महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्यासाठी मिळेल प्रोत्साहन

- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान.

            मुंबई,दि, ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कार प्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतींधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला उपस्थित होत्या.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देवून आज गौरविण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर 10,12वी विद्यार्थ्या करिता

 बोरीवली पश्चिम येथे 3 जून रोजी

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर

            मुंबई, दि. 31 : बोरीवली पश्चिम येथील साईली इंटरनॅशनल स्कूल येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शनिवार, दि.3 जून रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.


          कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवली, जि.मुंबई उपगनर यांनी इयत्ता दहावी, बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती तसेच याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होण्याकरीता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर साईली इंटरनॅशनल स्कूल, एम.एच.बी. कॉलनी जवळ, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई - 400091 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होईल.


                 या शिबिरास कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री श्री. लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सर्वश्री सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, योगेश सागर, अस्लम शेख आणि संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण दिगांबर दळवी, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, मुंबई, किशोर खटावकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, मुंबई उपनगर प्रदीप दुर्गे,सहाय्यक आयुक्त, कौशल्य, रोजगार उद्योजकता नावीन्यता विभाग, मुंबई, रवींद्र सुरवसे, यांची प्रमुख उपस्थिती राहील.


             केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून पहिल्या आलेल्या डॉ. कश्मिरा संख्ये यांचे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रा.डॉ.दिनेश गुप्ता, लेखक अल्मेडा रॉबर्ट, समन्वय तज्ञ, राज्य कल मापन समिती यांचे मार्गदर्शन या शिबिरात लाभणार आहे. इ.10 वी व इ.12 वी उत्तीर्ण तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीवलीचे, प्राचार्य अनिल एम. सदाफुले यांनी केले आहे.


*****

Featured post

Lakshvedhi