*इसबगोल:-*
इसबगोल आता भारतामध्ये गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात इंदोर इ. ठिकाणी याची लागवड होते. इसबगोल साधारण तीन फूट उंच वाढते. या वनस्पतीला गव्हासारख्या ओंब्या येतात. त्यामध्ये इसबगोलाच्या बिया असतात. इसबगोलामध्ये सफेद, तांबडे व काळे असे तीन प्रकार असतात. त्यातील औषधांमध्ये सफेद श्रेष्ठ असते तर काळे रंगाचे औषधांत वापरत नाही.
इसबगोलात फायबरचे प्रमाण भरपूर असते
इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, वीर्यस्तंभक इ. गुणधर्म असतात.
*औषधी उपयोग:-*
◼️वीर्यक्षय, दाह, प्रमेह यांवर इसबगोल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावे.
◼️डोकेदुखीवर इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप करावा.
◼️दमारोगात दोन ते तीन ग्रॅम इसबगोल कोमट पाण्यातून सकाळ- संध्या. द्यावे.
◼️रक्त-संग्रहणीवर इसबगोल आणि खडीसाखर चावून खाण्यास द्यावी.
◼️जीर्ण आमातिसार व रक्तातिसार यांवर इसबगोल दोन चमचे दह्यातून दोन वेळेस द्यावे.
◼️पोटात आग पडते, आतड्यांना सूज येते अशा वेळी दहा ग्रॅम इसबगोल थंड पाण्यात भिजत घालून ते फुलल्यावर खाण्यास द्यावे.
◼️कब्जरोगात इसबगोल एक चमचा रात्री झोपताना दुधातून द्यावे.
◼️अर्सेनिक (एक विषारी पदार्थ) मुळे विषार झाल्यास इसबगोल भिजवून त्यात बेदाणा, दही व गुलाबपाणी एकत्र करून द्यावे; म्हणजे विषार कमी होतो.
◼️ज्वरातिसारामध्ये इसबगोलाचा काढा करून द्यावा.
◼️धात-पुष्टतेस इसबगोल दोन भाग, वेलची एक भाग व खडीसाखर तीन भाग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.
◼️स्वप्नदोषावर इसबगोल आणि खडीसाखर समप्रमाणात एकत्र करुन त्यातून एक चमचा मिश्रण अर्धा ग्लास दुधातून झोपण्याच्या एक तास अगोदर द्यावे. झोपण्याच्या अगोदर लघवीला जाऊन झोपावे.
◼️लघवीला आग होणे, जळजळ होणे अशावेळी एक ग्लास पाण्यात चार चमचे इसबगोल भिजवून स्वादानुसार खडीसाखर मिसळवून पिण्यास द्यावे.
◼️वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर एक चमचा इसबगोल पाण्यातून द्यावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव राहते व पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.
◼️मधूमेहात याच्या सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रीत राहण्यास मदत होते परंतू इसबगोलाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होऊ शकते.
◼️गर्भिणी स्रीने इसबगोल खाणे टाळावे.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,
_*(
No comments:
Post a Comment