Tuesday, 9 May 2023

                                                                            ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे या उपक्रमातूनइंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहचेल


- कान्हुराज बगाटे


            मुंबई, दि. 8 : ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नियंत्रक (शिधावाटप) व संचालक (नागरी पुरवठा) कान्हुराज बगाटे यांनी व्यक्त केले.


           यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) समारोप कार्यक्रमात श्री. बगाटे बोलत होते.


           यावेळी बीपीसीएल चे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लि. (गेल) चे व्यवस्थापक शंतनू बासू, कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडीयन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएल चे व्यवस्थापक अकेला वि. एन. एस. के. लक्ष्मणराव, ऑलिम्पिक प्रशिक्षक तुषार खांडेकर, तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यावेळी उपस्थित होते.


         श्री. बगाटे म्हणाले, आज भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येबरोबरच सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देखील देश आहे.वाढत्या ऊर्जा वापराबरोबर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढत आहे. कार्बनचे वातावरणातील वाढते प्रमाण हे पृथ्वीवरील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल करत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. नैसर्गिक इंधन वापरताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही श्री.बगाटे म्हणाले.


            ऑलिम्पिक प्रशिक्षक श्री. खांडेकर म्हणाले, सक्षम महोत्सव या शब्दाचा अर्थ नव्या पिढीला समजत आहे हीच मोठी गोष्ट आहे. भारताला विकासात पुढे नेण्यासाठी शाश्वत विकासासाठी इंधन बचतीची गरज आहे आणि शालेय मुलांपासून याची सुरूवात झालेली ही गोष्ट निश्च‍ितच आनंदाची आहे असेही श्री.खांडेकर म्हणाले.


        या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध नाटिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद इतर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. निवदेन डॉ.मृण्मयी भजक यांनी केले. अतिरिक्त संचालक दीपक वाघ यांनी आभार मानले. यावेळी सक्षम २०२३ मध्ये १००० पेक्षा जास्त विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.


*****

मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर

 मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर

- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर.

            मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसूदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी हा अहवाल सादर केला.


          मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षणात, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी गठीत केलेल्या समितीने हा मसुदा तयार केला असून हे धोरण शासनातर्फे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 


            मराठी भाषा धोरणासाठी शासनाने पुढाकार घेतला असून मराठी भाषा अधिक लोकाभिमुख, रोजगाराभिमुख व्हावी यासाठी समितीने सूचना केल्या असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली आहे.


            महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली. या समितीला इतर अनेक महत्वाच्या कामांसोबत महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील '25 वर्षांचे मराठी भाषा धोरण ठरवणे' हे काम अग्रक्रमाने करण्याचे निदेश दिले आहेत. हे धोरण सर्वंकष स्वरुपाचे व सर्व स्तरांवरील लोकव्यवहार, ज्ञान-अर्थ-प्रशासन आणि संवाद - संपर्क आणि अभिसरणासाठी उपयुक्त असेल असा विश्वास समितीने धोरणाच्या प्रास्ताविकेत व्यक्त केला आहे.


***

स्वयंपुनर्विकासासाठीसहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य

 स्वयंपुनर्विकासासाठीसहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वतोपरी सहकार्य


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकाससंदर्भात बैठक


 


            मुंबई, दि. 8 :- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या व्यवहारांसाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक व्यवस्था उभारावी, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार्याची भूमिका ठेवून यासंदर्भातील सर्व कामे कालबद्ध पद्धतीने करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास- पुनर्विकास यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय एस चहल, 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने द्यावयाच्या सवलतीबाबत शासन निर्णय 2019 मध्ये जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या विषयाला चालना देण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी तसेच या सर्व व्यवहारांसाठी 'इज ऑफ डुईंग' अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रस्तावांना तीन महिन्यांत परवानगी देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'एक खिडकी' योजना चालू करावी. स्वयंपुनर्विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांसाठी नोडल एजन्सी म्हणून राज्य सहकारी बँकेसह पात्र अन्य सहकारी बँकांनाही अनुमतीचा प्रस्ताव द्यावा. गृहनिर्माण संस्थांना डीम्ड कन्व्हेयन्स प्रमाणपत्र देणे, नोंदणी करणे, मालमत्ता पत्रकात नोंद करणे, स्टॅम्प अॅडज्युडीकेशन देण्याची प्रक्रिया गतिमान आणि कालबध्द करावी असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.


मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी अभय योजना


            मानीव अभिहस्तांतरणाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा एक वर्षाच्या कालावधीकरिता महसूल विभागाने अभय योजना (amnistey scheme) लागू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच मानीव अभिहस्तांरणामध्ये व्यवसायातील सुलभता (ईज ऑफ डुईंग बिझनेस - ease of doing business) चा वापर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.


            'महारेरा' कायदापूर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना सरसकट मानीव अभिहस्तांतरण देण्याबाबत तपासणी करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयंपुनर्विकास - पुनर्विकास यासंदर्भात


            स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रकल्पांची वाटचाल सुरळीत होण्यासाठी गृहनिर्माण विभागामार्फत जारी शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, स्वयंपुनर्विकासासाठी जुनी इमारत संदर्भातील अट बदलावी, स्वयंपुनर्विकासासाठी 'एफएसआय'मध्ये बदल करावा, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना पतपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, मुंबईत स्वतंत्र, सुसज्ज सहकार भवन मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी,या

 सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे126 तक्रारींचे जलद निराकरण.

               मुंबई, दि. 8 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १४९८ तक्रारी आज दाखल झाल्या असून महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज १२६ तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या आहेत.


       मुंबई महापालिकेच्या माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे महिला व बालविकास विभाग आणि मुंबई महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम झाला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होती. महिला व बचत गटांना नोंदणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


              उद्या दिनांक ९ मे रोजी फोर्ट येथील ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) हा उपक्रम होणार आहे. महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


****



Monday, 8 May 2023

खजूर....खारिक..

 *... खजूर....खारिक..*


... लकवा झाला आहे, शरिर दुर्बल झाले आहे, क्षयग्रस्त झाले आहे, अश्या सर्वच रुग्णांकरता ,, खजूर,, हे फार मोठेच वरदान आहे..

. अचानक अंग शिथिल होउन, पँरालँसिसचा जर अँटँक आला असेल,. हातापायाला मुंग्या आल्या असतील तर,

..... बधिरता आलि असेल तर, दररोज चार ते पाच खजूर खावे.. महिन्याभरातच आश्चर्यजनक परिणाम दिसून रूग्ण खडखडित बरा होतो....

......... 

               दुसरा विकार म्हणजे.. ,, क्षयरोग,,.. छातित कफ दाटणे, अशक्त होणे, फुफ्फुसे निकामि होणे., 

 यावर . खजूरासारखे औषध नाहि..

.. खजूरात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक आहेत. जीवनसत्व . ,अ, बी, व.. ,सी,. हे विपूल आहे.. शिवाय चुना, फाँस्फरस, व लोह देखिल भरपूर आहै.

 ..... हे उत्तम पाचक आहे, याच्या सेवनाने पचनसंस्था

 बलवान होते. . एक चाटण नेहमि घेत राहा..

.. खजूर, सैंधव मीठ, लिंबाचा रस, मिरे, व सुंठ, पिंपळी हे घेउन याचि चटणि करून ति नेहमिच जेवणात ठेवा

.... याने अन्नपचन होते. आणि. अजिर्ण, अपचन, बद्धकोष्ठ, मूळव्याध, संग्रहणि असे आजार होत नाही....


......##संधिवात.. ##कंबरदुखी.... चाळिशीनंतर हे आजार विशेषतः स्रियांच्या मागे लागतात.. जीवन नकोसे होते.. अश्या वेळी मग.. पुढील औसध घरीच करा...👉... खजूर, पिंपळि, वेलचि, पांढरे चंदन, काकडीच्या बियांचा गर, धणे, पाषाणभेद, ज्येष्ठमधाचे चूर्ण, आवळा चूर्ण, शिलाजित, हे सर्व समप्रमाणात घ्या

...... व मग ईतकिच साखर घ्या..

...... खजूर व शिलाजित बाजूला काढुश. वेगवेगळे कुटा

... व नंतर सर्व एकत्रित करून कुटावे.. दररोज एक चमचाभर दूधासोबत घ्यावे. संधिवात समूळ जातो..


.... किंवा पाच खजूर बिया उकळून मग त्यात मेथि रात्रभर भिजवा सकाळी दोन्हि बारिक करून चावून खा. .##कंबरदूखि.. पूर्ण बरि होते...

..... बर्याच माता विचारतात कि त्यांच्या लहान बाळांचे वजन वाढत नाही. तेव्हा. एक कप तांदळाच्या धुवणात एक खजूरगर बारिक पिठासारखा वाटून मग हे मिश्रण दिवसातून तिन वेळा घ्यावे.. सुकलेली मूले धष्टपूष्ट , सशक्त होतात..


......## मूर्च्छा, हिस्टेरिया,.. अशा स्रियांनि आपल्या आहारात भरपुर खजूराचा वापर करावा.. महिन्याभरातच चांगला परीणाम दिसतो..

......##चर्मरोग... खजूर कींवा खारिक याच्या बिया जाळाव्यात मग याची याख व कापूर चांगल्या तुपात खलून मग पेस्ट बनवून ति नायटा, खरूज, व ईसब अशा ठिकाणि लावा. हे सर्व रोग मूळासकट बरे होतात..


##मूळव्याध... याच खजूराच्या बीया जाळून मगयाची धुरी मोडास( कोंबास) द्यावी. हा गळून पडतो..

.....##उष्णता... शरिरातिल अतिरिक्त उष्णतेमूळे चकँकर येणे, घाम येणे, डोळे लालवटणे, अंगाचि लाहि होणे, गळवे, बेंड, येणे, घामोळे, येणे, तहान तहान होणे

.. या सर्व त्रासावर, खजुर रात्रभर पाण्यात भिजवून मग सकाळी कुस्करून ते पाणि दिवसभर प्यावे. व या बिया उउगाळून याचा लेप डोळ्यांभोवति लावा..

.... किंवा घामोळ्यांवर लावा...

..... लगेच आराम पडतो..


... तेव्हा हा असा गुणकारि ..., खजूर,,... नक्किच आहारात ठेवावा...



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी....

 : गणेश चतुर्थी,अर्थात संकष्टी चतुर्थी......

सर्व. देवात पाहिले वंदन गणेशाला असते.नवीन काम सुरू करणे असो अथवा प्रवासाला निघालो असता आधी गणपतीची.आराधना करतात.अगदी नाटक सिनेमा कला दाखवणे असो आधी नमन गणेशाला असते.आधी गणेश पूजा करून च कार्याला सुरवात करतात गणेशाला हे मोठेपण कसे मिळाले तर ऋषी सांगतात गणपतीने पृथ्वी प्रदक्षिणा करण्या ऐवजी आई पार्वती माता आणि पिताशिव शंभू यांना हात जोडून विनम्र भावाने तीन प्रदक्षिणा घातल्या व पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे बक्षीस मिळवले त्या मुळे गजाननाला या बुध्दीच्या दैवताला प्रथम पूजेचा मन मिळाला सर्व.संकटातून,विघ्न तून पार पडावे.म्हणून पहिली आराधना श्री गणेशाची होते आधी वंदू तुज मोरया.म्हणून नमस्कार करून आधी पूजन होते.

या गजाननाच्या पहिला अवतार हा महोत्कट.हा आहे.त्याची कथा मोठी रंजक आहे.देवांतक,आणि नरांतक हे दोघे जुळे राक्षस भाऊ होते.शरीर सामर्थ्याच्या व बुध्दी सामर्थ्याच्या जोरावर ते शक्तिशाली बनले. व मग उन्मत्त होऊन प्रजेला गोर गरीब लोक,साधू संत यांना त्रास देवू लागले.छळू लागले.लोकांनीगणराया. चा धावा केला.संकट नाशक गणेशाने मग लोकांना या दुष्ट राक्षसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कश्यप ऋषी व देव माता अदिती याच्या पोटी माघ शुद्ध चतुर्थी ला दुपारच्या वेळी जन्म घेतला व या दुष्ट राक्षसांचा वध केला व प्रजेला अभय दिले.वयाच्या पाचव्या वर्षी या बालकाची मुंज झाली.त्यावेळी सर्व देव,दानव,मानव,ऋषी तेथे हजर होते.क्षत्रिय राजे होते.सर्वांना सन्मानाने बोलावले होते.प्रत्येकानी या महोत्कट ला,बाळाला निरनिराळ्या वस्तू भेट दिल्या.देवराज इंद्राने त्याला अंकुश दे वून विनायक हे नाव दिले.वडील. व गुरू असणाऱ्या कश्यप ऋषींनी वेद विद्येचे शिक्षण दिले.सर्व.देवांनी निरनिराळी शस्रे दिली मग या शूर महोत्तकटने काशी नगरीत जाऊन तेथील दुष्ट राजाला दुरा सद. ला जो भस्मासुराचा मुलगा होता त्याचा पाडाव.करून त्याला शरणं येण्यास लावून मग जीवदान दिले. व सन्मार्गावर आणले व काशीचा रक्षणकर्ता बनवले व काशी तील लोकांना राक्षसाच्या भया पासून सोडवले.हा पराक्रमाचा संघटना कौशल्याचा अवतार आहे म्हणून त्याला वंदन करावे.

[08/05, 20:01] Mahendra Gharat: तर गणेशाचा दुसरा अवतरशिव.पार्वतीच्या घरी होता.केदारनाथ ला जाताना गौरीकुंड नावाची एक जागा आहे.तेथे गरम पाण्याचे कुंड आहे तेथे पार्वती माता स्नानासाठी जाणार होत्या त्यांनी स्नान करताना कोणी त्रास देवी नये म्हणून स्वतःच्या अंगाच्या उटी ने बाळ गणेशाची मूर्ती बनवून मग ती सजीव करून त्याला दारात बसवले दारातून आत येणाऱ्या सर्वांना बाळ गणेश अडवत होते. शिवाला ही त्यांनी अजाण तेने अडवले आव्हान दिले रागावलेल्या शिवानी त्रिशूल ने बाळ गणेशाचे शिर तोडले पार्वती माता धावत बाहेर आल्या त्यांनी हे पहिले व खूप आक्रोश केला शिवाना विनवले बाळाला परत पहिल्यासारखे करण्याची विनंती केली.प्रसन्न होऊन शिव शंभूनी त्यांच्या साठी तप करणाऱ्या.आपल्या भक्ताचे शिर कापून गणेशाच्या शरीरावर लावले गजासुर सतत शिवाजवल राहायला मिळावे म्हणून जीव धरून तप करीत होता योग्य वेळी मी तुला माझ्या जवळ घेईन या शिवांनी दिलेल्या वचनानुसार गजसुर याचे डोके गणेशाला मिळाले वर शीवांनी वरद हस्त देवून ज्ञान व आशीर्वाद दिला. व गणेशाला पुन्हा जिवंत केले.सर्व.लोकांना तू विघ्णातुन संकटातून वाचव शिल.असे वरदान शिव महादेवांनी गणेशाला दिले.तुला शरण आलेल्या वर तू कृपा कर,त्यांना मदत कर त्यांची दुःखातून सुटका करून तू सुख कर्ता,दुःख हर्ता हो असे सांगितले व गणेश भगवान सुख कर्ता.दुःख.हर्ता होऊन सगळ्यांचे कल्याण करतात.अशी ही बुध्दीची शक्तीची प्रेमळ देवता आहे म्हणून प्रथम तिला वंदन करून पुढील काम करतात.हरी ओम अनुराधा कुलकर्णी

मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी - २० बैठकीच्या

 


 मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी - २० बैठकीच्पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा


            मुंबई, दि. ८ : जी - २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या.


            मुंबई येथे १५ ते १७ मे दरम्यान तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी बैठक घेतली. बैठकीत नवी दिल्लीतून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी घेतला.


            मंत्रालयात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागूल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते.


            मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी सांगितले की, बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय अधिकारी नियुक्त करावे. त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.


            केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी राज्य शासनाच्या वतीने अपेक्षित सहकार्य याबाबत माहिती दिली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्या.


            बैठकीस उद्योग विभागाचे सह संचालक सुरेश लोंढे, मुंबई महापालिका उपायुक्त मनीष वळंजू, विनायक विसपुते आदी उपस्थित होते.


*******

Featured post

Lakshvedhi